Skip to content Skip to sidebar Skip to footer

Umesh Kamat-Priya Bapat यांची ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग!

नात्यांचा गुंता, प्रेमातील गोडवा आणि थोडीशी नोकझोक सांगणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट सध्या ॲमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग ठरत आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटीवरही या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ज्यांना हा चित्रपट चित्रपटगृहात पाहाता आला नाही, त्यांना आता ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर पाहाता येईल. नात्यांमधील समज, मतभेद, विश्वास आणि जिव्हाळा या सगळ्यांचा सुंदर मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळतो. आधुनिक काळातील नात्यांकडे नव्या दृष्टीने पाहाणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आपलासा वाटत आहे.

प्रिया बापट आणि उमेश कामत या रिअल लाईफ कपलची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावली आहे आणि या चित्रपटातही त्यांच्या नात्यातील गोड-तिखट प्रसंगांनी प्रेक्षकांना भावनिक केले आहे. त्यांच्या सोबत गिरीश ओक, निवेदिता सराफ, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयाने चित्रपट अधिक प्रभावी झाला आहे.

दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ” ‘बिन लग्नाची गोष्ट’ आपल्याच आजूबाजूच्या नात्यांचे प्रतिबिंब आहे. नात्यातील मतभेद, एकमेकांवरील विश्वास आणि एकत्र प्रवास हे या चित्रपटात आम्ही दाखवले आहे. ॲमेझॉन प्राईमवर चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होतो आहे.”

================================

हे देखील वाचा : नाना पाटेकरांनी असं काय म्हटलं की Ajit Pawar चक्क लाजले होते…

================================

गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाची कथा समीर कुलकर्णी यांची आहे. तर दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!