Skip to content Skip to sidebar Skip to footer

Big Boss ott 3 च्या घरातील ‘वडापाव गर्ल’-चंद्रिका दीक्षितचा प्रवास अखेर संपला!

बिग बॉस ओटीटी 3  दिवसेंदिवस नवनवीन गोष्टींसाठी चर्चित येताना पहायला मिळत आहे. रोज बिग बॉस ओटीटी च्या घरात काही ना काही होत आहे ज्याचा परिणाम सोशल मिडिया आणि कलाकारांच्या चाहत्यांवर दिसून येतोय. आता ‘बिग बॉस ओटीटी ३’ला तीन आठवडे पूर्ण झाले असून या आठवड्यात ‘वडापाव गर्लचंद्रिका दीक्षित गेरा चा शोमधील प्रवास संपला आहे. नीरज गोयत, पायल मलिक, पाउलोमी दास आणि मुनीषा खटवानी यांच्यानंतर शोमधून बाहेर पडणारी ती पाचवी स्पर्धक आहे. शोमधून बाहेर पडण्यापूर्वी चंद्रिका दीक्षितला वीकेंड का वार एपिसोडमध्ये होस्ट अनिल कपूरच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. या मालिकेतील तिचा प्रवास खूपच नाट्यमय असला तरी ‘वडापाव गर्ल’ने तिच्या शोमध्ये येण्याचा हेतू पूर्ण केल्याचे दिसून येत आहे.(Chandrika Dikshit Big Boss Ott)

Chandrika Dikshit Big Boss Ott
Chandrika Dikshit Big Boss Ott

कृतिका मलिक आणि विशाल पांडे यांच्या मुद्द्याचे भांडवल स्वत:च्या फायद्यासाठी करण्यासाठी अनिल कपूर यांनी चंद्रिकावर क्लास घेतला. आता या शोमध्ये तिला गुदमरल्यासारखे होत असल्याचे तिने सांगितले होते, या प्रकरणी तिला फटकारही करण्यात आले होते. आता रविवारी वीकेंड का वार एपिसोडमध्ये या शोमधील तिचा प्रवास संपल्याची घोषणा करण्यात आली. आणि ही बातमी ऐकून अनेक युजर्स खूप खूश झाले आहेत. ‘या शोमध्ये काहीतरी चांगलं घडलं!’ असे ही मत अनेकांनी मांडले आहे.

Chandrika Dikshit Big Boss Ott
Chandrika Dikshit Big Boss Ott

सोशल मीडियावर दाखवलेली आपली इमेज मोडून काढण्यासाठी आणि लोकांसमोर आपलं खरं रूप दाखवण्यासाठी चंद्रिका दीक्षित गेरा या शोमध्ये दाखल झाली होती. मात्र, ढोंगी आणि पुरुषद्वेषी असे लेबले लावून ती घराबाहेर पडली आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये विशाल पांडेने कृतिका मलिकबद्दल केलेल्या कमेंटला विशाल पांडेची व्यक्तिरेखा दिल्याबद्दल चंद्रिका दीक्षित गेरा हीला फटकारण्यात आले होते.(Chandrika Dikshit Big Boss Ott)

===================================

हे देखील वाचा: Bigg Boss OTT 3 मध्ये रोमॅंटीक होताना दिसले अरमान आणि कृतिका; सोशल मिडीयावर फोटो व्हायरल

===================================

चंद्रिका दीक्षित ‘वडापाव गर्ल’ म्हणूनही ओळखली जाते. ती दिल्लीत रस्त्यावर वडापाव विकते, पण अनेक वादामुळे ती चर्चेत असते. सोशल मीडियावर तिला ‘डोगला‘ म्हटल जात होत पण आटा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३‘चे होस्ट अनिल कपूरही तिला डोगला म्हणाले आहेत.