Skip to content Skip to sidebar Skip to footer

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मालिकेतुन प्रेक्षकांच्या आवडत्या ‘गोली’ ने घेतला निरोप

तारक मेहता का उल्टा चष्मा‘ ही मालिका तब्बल गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेल्या काही वर्षांत या मालिकेशी संबंधित अनेक जुन्या कलाकारांनी या मालिकेतुन निरोप घेतला पण अस जरी असल तरीही ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमधली एक आहे. आतापर्यंत तारक मेहता, डॉक्टर हाथी, मिस्टर अँड मिसेस सोढी, अंजली मेहता, टप्पू, सोनू अशा व्यक्तिरेखा मालिकेत रिप्लेस करण्यात आल्या आहेत, पण चाहते आज या मालिकेशी जोडले गेले आहेत. दरम्यान, आता शोचा आणखी एक जुना स्टार शोचा निरोप घेत आहे आणि तो म्हणजे सर्वांचा लाडका गोली उर्फ कुश शाह.(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत डॉ. हंसराज हाथी आणि कोमल हाथी यांचा मुलगा गुलाब कुमार उर्फ गोलीची भूमिका साकारणारा कुश शाह ने ही मालिका सोडली आहे. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर आला आहे ज्यात कुश सह मालिकेची टीम भावुक झाल्याच दिसून येत आहे. यात आपल्या भाषणात कुश म्हणतो की , ‘जेव्हा हा शो सुरू झाला आणि तुमची आणि माझी भेट झाली. मी खूप लहान होतो. तेव्हापासून तू मला खूप प्रेम दिलंस आणि या कुटुंबाने मला खूप प्रेम दिलं.’

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत जेठालालची आयकॉनिक व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते दिलीप जोशी ही कुश च्या निरोपाने भावुक झाले आहेत आणि यांनी तब्बल १६ वर्षांनंतर मालिका सोडलेल्या कुश शाहला भावनिक निरोप दिला आहे. कुश शहा या मालिकेत गोलीची भूमिका साकारत होता. कुश शहा टीएमकेओसीसह पहिल्या भागापासून या कार्यक्रमाशी संबंधित होते. आता तो पुढील शिक्षणासाठी न्यूयॉर्कला जाणार आहे, त्यामुळे त्याने १६ वर्षांनंतर हा शो सोडला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत जेठालाल आणि गोली की नौक झोक-झोक प्रेक्षकांना खूप आवडत होती. न बोलण्यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणे होत असत. त्यामुळे आता जेव्हा जेव्हा चाहते ही मालिका आता पाहतील  तेव्हा त्यांना या अभिनेत्याची खूप आठवण येईल आणि त्यांना जुना गोली आणि जेठा ची केमिस्ट्री नक्कीच आठवेल यात शंका नाही.(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

==============================

हे देखील वाचा: ‘Big Boss Ott 3’ च्या घरातून गाव की छोरी Shivani Kumari झाली बेघर; शो मधून कमावली ‘एवढी’ रक्कम

==============================

अभिनेता कुश शहाबद्दल अधिक जाणून घ्यायचे झाले तर कुश चा जन्म २९ जुलै १९९७ रोजी झाला. आता तो 27 वर्षांचा असून तो मुंबईचा रहिवासी आहे.आणि आता तो  पुढील शिक्षणासाठी परदेशात जात असून मीडिया रिपोर्ट्सनुसार कुश शहा १५ कोटींचा मालक आहे. त्याला महिन्याला दोन ते तीन लाख रुपये मिळतात अशी ही माहिती समोर आली आहे.