
मुलासाठी Vishakha Subhedar ढसाढसा रडली; सरकारपर्यंत व्हिडिओ पोहचताच अभिनेत्रीला आला थेट CMO कडून फोन
इराण आणि ईस्रायलच्या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगभर उमटताना दिसत आहेत या तणावपूर्ण घडामोडींमुळे जगभरात अस्वस्थतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मराठी मनोरंजन विश्वातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारी विनोदी अभिनेत्री Vishakha Subhedar सध्या वैयक्तिक संकटाला सामोरी जात आहे. तिचा मुलगा परदेश प्रवासादरम्यान कुवेतमध्ये अडकला असून गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सुरक्षित परतीची प्रतीक्षा सुरू आहे.अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) यांचा मुलगा अभिनय सुभेदार पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाला होता. प्रवासात कुवेत येथे त्याचा ‘ले-ओव्हर’ होता. मात्र त्या दरम्यान मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे काही देशांनी एअरस्पेस तात्पुरती बंद केली आणि अनेक उड्डाणे रद्द झाली. परिणामी अभिनयला कुवेतमध्येच थांबावं लागलं. सध्या एअरलाईन्सकडून त्याची हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच कुवेतमधील भारतीय दूतावासाने प्राथमिक मदत दिल्याची माहिती विशाखा यांनी दिली. तरीही परिस्थिती अनिश्चित असल्याने त्यांनी प्रशासनाकडे मदतीची विनंती केली आहे.(Vishakha Subhedar)

विशाखा सुभेदार यांनी एक भावनिक व्हिडिओ शेअर करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे विनंती केली आहे. ज्या पद्धतीने इतर देशांत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याच धर्तीवर कुवेतमध्ये अडकलेल्या नागरिकांनाही मदत करावी, अशी त्यांची मागणी आहे.अभिनय सुभेदार लंडनमधील Plymouth येथे ‘एम.ए. इन फिल्म मेकिंग’चे शिक्षण घेत आहे. पुढील शैक्षणिक टप्प्यासाठी तो रवाना झाला असताना अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा अडथळा निर्माण झाला.

दरम्यान , विशाखा यांचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी तातडीने हालचाली करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून (CMO) विशाखा यांच्याशी थेट संपर्क साधण्यात आला. त्यांच्या मुलाचा पासपोर्ट तपशील, प्रवासाची माहिती आणि सध्याची स्थिती याबाबत संपूर्ण माहिती गोळा करण्यात आली आहे. हे सर्व तपशील केंद्राच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवले जाणार असून, कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित सुटकेसाठी राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विशाखासोबत संपर्क साधत तिला धीर दिला आहे. (Vishakha Subhedar)
=================================
=================================
तसेच विशाखा सुभेदार यांच्या पोस्टनंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना धीर देत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सर्वांच्या प्रार्थना आणि प्रयत्नांमुळे अभिनय लवकरच सुखरूप परत येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.