Skip to content Skip to sidebar Skip to footer

Vishakha Subhedar यांचा मुलगा अभिनय अखेर मायदेशी परतला!

अमेरिका, इस्राएल आणि इराणमधील संघर्षामुळे आखाती भागातील अनेक देशांत तणाव वाढला आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम प्रवाशांवरही झाला असून विमानसेवा विस्कळीत झाली आहे. अशा काळात काही भारतीय नागरिक कुवेतमध्ये अडकले होते, त्यात मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार (Actress Vishakha Subhedar) यांचा मुलगा अभिनव सुभेदार (Abhinay Subhedar)देखील होता.जो कुवेतमध्ये ट्रान्झिट करत असताना अचानक सुरू झालेल्या तणावामुळे अडकला. अभिनव कुवेतमध्ये थांबल्यानंतर, इराणकडून कुवेतवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोका निर्माण झाला. परिणामी कुवेतचे आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आणि अनेक उड्डाणे रद्द झाली. अभिनयसह काही भारतीय नागरिक तिथे अडकले, ज्यामुळे तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी मदतीची मागणी केली होती. त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज ठाकरे (Raj Thackery) यांच्याकडे मदतीची विनंती केली.(Vishakha Subhedar)

Vishakha Subhedar Son
Vishakha Subhedar

यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन करून विशाखा सुभेदार यांना आश्वस्त केले की त्यांचा मुलगा सुरक्षित परत आणला जाईल. भारतीय नागरिकांना भारतात आणण्यासाठी सौदी अरेबियामार्गे रियाधद्वारे मार्ग आखण्यात आला. व्हिसा प्रक्रियेत काही अडथळे आले असतानाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर विदेश मंत्रालयातील अधिकारी असीम महाजन यांनी या प्रक्रियेला गती दिली.

Vishakha Subhedar Son
Vishakha Subhedar

अखेर अभिनय सुभेदारसह सुमारे ३० महाराष्ट्रीयन नागरिकांना सौदी अरेबियाचा व्हिसा मिळाला. त्यांनी सुमारे ७०० किलोमीटरचा रस्त्याचा प्रवास करून रियाध गाठला आणि तिथून ९ मार्च रोजी रात्री ११:१० वाजता मुंबईकडे उड्डाण केले. १० मार्च रोजी पहाटे ३ वाजता हे सर्व प्रवासी सुरक्षितपणे मुंबईत दाखल झाले. या संपूर्ण प्रक्रियेत कुवेतमधील भारतीय दूतावासाने महत्त्वाची भूमिका बजावली.(Vishakha Subhedar)

=============================

हे देखील वाचा: Apurva Gore Wedding: शुभमंगल सावधान! ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात; समोर आले लग्नसोहळ्याचे फोटो…

==============================

अभिनव सुभेदारसह इतर नागरिक सुरक्षितपणे भारतात परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. युद्धजन्य परिस्थितीतही भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारी प्रयत्न यशस्वी ठरल्याने सर्वांसाठी एक समाधानकारक शेवट ठरला.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!