Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss 19 चा फिनाले कधी? टॉप 5 स्पर्धकांमध्ये प्रणित मोरे पोहचला ‘या’ क्रमांकावर

‘Bigg Boss 19 ‘ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा 14 आठवड्यांचा प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सध्या शोच्या घरात टॉप 6 स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे आणि प्रत्येक स्पर्धकाच्या नजरेत ट्रॉफी आहे. विजेतेपद मिळवण्यासाठी सर्व स्पर्धक कठोर मेहनत घेत आहेत, आणि त्यांची स्पर्धा प्रेक्षकांना चांगलीच आकर्षित करत आहे.Bigg Boss 19 Finale)

Bigg Boss 19 Finale
Bigg Boss 19 Winner

‘बिग बॉस 19’च्या नवीन प्रोमोमध्ये, सूत्रसंचालक सलमान खानने ग्रँड फिनालेची तारीख जाहीर केली आहे. याप्रमाणे, सिझन 19 चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. कलर्स टीव्हीवरही हा एपिसोड रात्री 10.30 वाजता प्रसारित होईल. ज्यांच्याकडे जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन नाही, त्यांना कलर्स टीव्हीवर फिनाले पाहता येईल. सलमान खानने प्रोमोमध्ये सांगितले आहे, “7 डिसेंबरची रात्र सर्वांत ग्रँड असेल, कारण बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. विजेतेपद कोण पटकावणार आणि कोणाचा प्रवास संपुष्टात येणार, हे सर्व समोर येईल.”

Bigg Boss 19 Finale
Bigg Boss 19 Finale Winner

घरात सध्या 6 स्पर्धक आहेत ज्यात  गौरव खन्ना (Gaurav khanna), फरहाना भट्ट (Farhana Bhatt) , मालती चाहर (Malti Chahr), अमाल मलिक (Amal Malik), तान्या मित्तल (Tanya Mittal), आणि प्रणित मोरे (Pranit More) यांचा समावेश आहे. या फिनालेच्या आधी मिड वीक एविक्शन होण्याची जोरदार चर्चा आहे. जर हे खरे झाले, तर फिनालेपर्यंत फक्त 5 स्पर्धकच पोहोचू शकतील.( Bigg Boss 19 Finale)

==========================

हे देखील वाचा: अखेर ठरलं! प्रेक्षकांचा लाडका भाऊ Riteish Deshmukh चं करणार Bigg Boss Marathi 6 चे सूत्रसंचालन !

==========================

दरम्यान आता ‘बिग बॉस तक’ पेजने चौदाव्या आठवड्याच्या पॉप्युलॅरिटी रँकिंगची घोषणा केली आहे. या नव्या यादीत काही नवे स्पर्धक टॉप 5 मध्ये पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी गौरव पहिल्या क्रमांकावर होता, पण आता फरहाना भट्टने पहिला क्रमांक मिळवला आहे, ज्यामुळे गौरव दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तिसऱ्या क्रमांकावर प्रणित मोरे, चौथ्यावर अमाल मलिक, आणि पाचव्या क्रमांकावर तान्या मित्तल आहे. वाइल्ड कार्ड एंट्री घेणारी मालती चाहर या रँकिंगमधून बाहेर पडली आहे. बिग बॉस 19 च्या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात नेहमीच चुरस आणि उत्कंठा असते, आणि यंदा देखील प्रेक्षक या फिनालेसाठी खूप उत्साहित आहेत. आता, 7 डिसेंबर रोजी काय होईल आणि कोण विजेतेपद मिळवेल, याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.