Skip to content Skip to sidebar Skip to footer

Zara Hatke Zara Bachke: विकी-सारा च्या धमाकेदार सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का? 

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान स्टारर ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा पहिलाच सिनेमा आहे ज्यात विकी आणि सारा हे दोन्ही स्टार्स एकत्र दिसणार आहेत. नुकतीच चित्रपटाची महत्वाची गोष्ट समोर आली, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. अखेर ‘जरा हटके जरा बचके’  या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर समोर आला आहे, ज्याला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेलरची सुरुवात विकी आणि सारा अली खानच्या लग्नापासून होते. चित्रपटात विक्की कपिल नावाच्या मुलाची भूमिका साकारत आहे, तर सारा अली खान सौम्या नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. सुरुवातीला विकी आणि सारामध्ये रोमँटिक केमिस्ट्री दाखवण्यात आलेली आहे मात्र नंतर हळूहळू ट्रेलरमध्ये एक धक्कादायक ट्विस्ट येताना पाहायला मिळतो.(Zara Hatke Zara Bachke Trailer)

पहिल्या सीनमध्ये जिथे विकी आणि सारामध्ये खूप प्रेम आहे, तिथेच पुढच्या सीनमध्ये दोघेही शत्रूप्रमाणे भांडताना दिसत आहेत. दोघांमधील भांडण नंतर इतकं वाढतं की हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचतं आणि घटस्फोटा पर्यंत गोष्ट येते. कौटुंबिक विनोदी चित्रपट ‘जरा हटके जरा बचके’ २ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. २ मिनिटे २० सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये घटस्फोटासाठी आतुर असलेल्या विकी आणि सारा अली खानची अनोखी स्टोरी दाखवण्यात आली आहे. मात्र ट्रेलर पाहिल्यावर दोघांमध्ये काही तरी खिचडी शिजतेय अस दिसतय. कारण एकीकडे दोघेही प्रेमात पडताना दिसतात तर घरच्यांसमोर ते भांडताना दिसत आहेत. 

Zara Hatke Zara Bachke Trailer
Zara Hatke Zara Bachke Trailer

दिनेश विजन यांच्या मॅडॉक स्टुडिओजनिर्मित ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जून २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी या चित्रपटाचे नाव ‘लुका छुपी २’ असे असेल अशी चर्चा होती. लुका छुपी हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला होता, ज्यात कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत होते.(Zara Hatke Zara Bachke Trailer)

===================================

हे देखील वाचा: The Kerela Story सिनेमातील अभिनेत्री अदा शर्माने अपघातानंतर दिली प्रतिक्रिया 

===================================

विकी कौशलचा या आधीचा चित्रपट ‘गोविंदा नाम मेरा’ हा देखील एक कॉमेडी चित्रपट होता. ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांना त्याच चित्रपटाची आठवण होते. ‘जरा हटके जरा बचके’ व्यतिरिक्त विकी कौशल सॅम बहादूर मध्ये दिसणार आहे. तर सारा अली खान सध्या ‘मेट्रो’मध्ये आदित्य रॉय कपूर सोबत दिसणार आहे. याशिवाय ती मर्डर मुबारक आणि ए मेरे वतन के लोगों या चित्रपटात झळकणार आहे.