Skip to content Skip to sidebar Skip to footer

Chala Hava Yeu Dya: झी मराठीचा हिट शो ‘चला हवा येऊ द्या’ लवकरच नव्या रूपात येणार भेटीला!  

Chala Hava Yeu Dya:  मराठी टेलिव्हिजन विश्वात अनेक मालिका आणि कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवतात. मात्र काही कार्यक्रम हे केवळ लोकप्रियतेपुरतेच मर्यादित राहत नाहीत, तर ते प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक भाग बनतात. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा असाच एक कॉमेडी शो, ज्याने तब्बल १० वर्षं महाराष्ट्राला हसवलं आणि मनावर राज्य केलं. २०१४ साली सुरू झालेला हा कार्यक्रम २०२४ मध्ये थांबविण्यात आला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात, ‘तेच ते विनोद’ आणि ‘नवीन काही नाही’ अशा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन वाहिनीनं हा शो थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेक चाहते नाराज झाले. कलाकारांनी सोशल मीडियावरून भावुक पोस्ट करत प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.(Chala Hava Yeu Dya)

Chala Hava Yeu Dya

मात्र, ‘चला हवा येऊ द्या’ आता पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी माहिती समोर आली होती . झी मराठी वाहिनीवर  हा शो लवकरच नव्या अंदाजात पुन्हा सुरु होईल, अशी जोरदार चर्चा सुरू होती. अखेर झी मराठी वाहिनीने ‘ ‘चला हवा येऊ द्या’ च्या नव्या सीजनचा टीजर प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये ‘१० वर्ष ११३७ एपिसोड्स आणि ९ सीझननंतर कॉमेडीच वादळ पुन्हा येतयं’ अस सांगण्यात आलं आहे.  तसेच या टीझरमध्ये आता कॉमेडीचे नवे ‘डॉन’ निवडायचे म्हणून ऑडिशन होणार आहेत, ज्यामुळे शोचं स्वरूप काहीसं वेगळं, ताजं आणि रोमांचक पहायला मिळणार अस दिसत आहे. 

Chala Hava Yeu Dya

गेल्या काही दिवसांत झी मराठीनं स्वतःच्या ओळखीमध्ये मोठा बदल घडवला आहे. तब्बल २६ वर्षांनंतर वाहिनीच्या ब्रँडिंगमध्ये बदल करत ‘सदैव तुमची, झी मराठी’ हे नवे ब्रीदवाक्य घेऊन नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.  या नव्या प्रवासात ‘देवमाणूस’ आणि ‘कमळी’सारख्या नव्या मालिकांची सुरुवात होणार आहे.   (Chala Hava Yeu Dya)

=================================

हे देखील वाचा: ‘एक… दो… तीन’ ते मोहिनी पर्यंतचा प्रवास: Madhuri Dixit च्या स्टारडमचा खास किस्सा!

=================================

यासोबतच, ‘चला हवा येऊ द्या’सारखा लोकप्रिय हास्यकार्यक्रमही पुन्हा नव्याने परतणार असल्याने हास्यप्रेमी प्रेक्षकांसाठी हे वर्ष विशेष ठरणार आहे. या शोचं चित्रीकरण कधी सुरू होणार, किंवा तो प्रत्यक्ष प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार यासंदर्भात कोणतीही अधिकृत तारीख अजूनपर्यंत घोषित करण्यात आलेली नाही.