Skip to content Skip to sidebar Skip to footer

Gayatri Datar ने अखेर दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा; रोमॅंटिक व्हिडिओ शेअर करत दिली गोड बातमी

मराठी मनोरंजन विश्वात गेल्या काही महिन्यांत अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या बातम्या चर्चेत राहिल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी 3’ फेम जय दुधाणे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील यांचे लग्न, तसेच ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम ज्ञानदा रामतीर्थकरचे साखरपुडा, यामुळे चाहत्यांमध्ये लग्नाच्या चर्चेला जोर मिळाला. आता या यादीमध्ये आणखी एक नाव जोडले जात आहे ते आहे अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar).

Gayatri Datar
Gayatri Datar Pre Wedding Video

गायत्री दातार, जिने ‘तुला पाहते रे’ (Tula Pahate Re) मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे, नेहमीच तिच्या अभिनयामुळे चर्चेत राहते. मात्र, सध्या ती अभिनयापुरती मर्यादित नाही, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यातील रोमँटिक गोड बातमीनेही प्रेक्षक आणि चाहत्यांना उत्सुक केले आहे.२५ डिसेंबरच्या दिवशी गायत्रीने सोशल मीडियावर एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती समुद्रकिनारी एका तरुणासोबत आनंदाचे क्षण साजरे करताना दिसते. व्हिडिओसोबत तिने लिहिलंय,”भेटा अशा व्यक्तीला, जो आयुष्यभरासाठी माझा ‘सांता’ असणार आहे!”यासोबतच तिने #engaged आणि #love हॅशटॅग्सही वापरून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवली आहे.

Gayatri Datar
Gayatri Datar Pre Wedding Video

गायत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव श्रीकांत चावरे (Shrikant Chavare) आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत IIT मुंबईचा पदवीधर असून, तांत्रिक शिक्षण घेतल्यानंतरही त्याला कलेची प्रचंड आवड आहे. तो एक उत्तम फोटोग्राफर आहे आणि खऱ्या अर्थाने अस्सल मुंबईकर आहे. गायत्री आणि श्रीकांत यांची केमिस्ट्री व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून गायत्रीच्या प्रेमाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता होती, पण जोडीदार कोण आहे, हे अद्याप स्पष्ट नव्हते. आता गायत्रीने रोमँटिक व्हिडिओ शेअर करून पडदा हटवला आहे. यामुळे प्रेक्षकांना आणि चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली आहे.

===========================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6 Promo: ‘आपण शब्द दिला की मागे नाही हटत’ म्हणत रितेश भाऊसोबत धडाकेबाज नवा प्रोमो रिलीज 

===========================

गायत्री दातारच्या प्रेमाची ही घोषणा मराठी मनोरंजनविश्वात आनंदाची बातमी ठरली आहे. गेल्या काही महिन्यांतील सेलिब्रिटी विवाह आणि साखरपुड्यांच्या यादीत आता तिचं नावही जोडलं गेलं आहे. चाहत्यांच्या मनात आता उत्सुकता आहे की या जोडीचा पुढचा टप्पा कधी येईल आणि विवाह सोहळा कसा असेल.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!