Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’ चित्रपटातून ‘नक्षत्रांचे देणे’ या अजरामर गीताचं नवं रूप प्रेक्षकांसमोर

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रभर प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असताना, कथा आणि अभिनय यांच्यासोबतच चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींसाठी एक वेगळीच म्युझिकल ट्रीट ठरत आहेत. नुकतेच या चित्रपटातील गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्राचे देणे हे अजरामर गीत नव्या रूपात प्रदर्शित झाले आहे. आशा भोसले यांनी मूळ गायलेले हे गीत जावेद अली यांच्या भावस्पर्शी आवाजात नव्या स्वरूपात सादर झाले असून, आरती प्रभू यांच्या शब्दांना देवदत्त मनीषा बाजी यांच्या संगीताची साथ लाभली आहे.

‘दिवस तुझे हे फुलायचे’ हे यशवंत देव यांचे अजरामर गीत आजच्या काळात नव्या संवेदनशीलतेने सादर झाले आहे. मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांना कुणाल गांजावाला यांच्या परिपक्व आवाजाची साथ लाभली असून, सूरज धीरज यांच्या संगीतामुळे हे गाणे अधिकच भावपूर्ण झाले आहे. आई होण्याच्या प्रवासातील आनंद, हळवे क्षण आणि सासू-सुनेमधील प्रेमळ नातेसंबंध या गाण्यात अतिशय सुंदरपणे उमटतात.

‘डाव मोडू नको’ या सुधीर फडके आणि राम फाटक यांच्या अजरामर गाण्यालाही चित्रपटातून नवसंजीवनी मिळाली आहे. वैशाली सामंत यांच्या आवाजात सादर झालेले हे गाणे, घरातील गैरसमज, न बोललेल्या भावना आणि रुसवे-फुगवे यांचे हळवे प्रतिबिंब दाखवते. आधुनिक संगीतसाज असूनही मूळ भाव कायम ठेवण्यात यश आले आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यामते, ही गाणी केवळ प्रसिद्ध म्हणून घेतलेली नाहीत, तर त्या-त्या प्रसंगाला ती अत्यंत चपखल बसतात. काही भावना शब्दांपेक्षा संगीतामधून अधिक प्रभावीपणे व्यक्त होतात, आणि हेच या चित्रपटातील गाण्यांचे वैशिष्ट्य आहे. ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’ हा चित्रपट नात्यांची गोष्ट सांगतानाच, जुन्या अजरामर गीतांच्या नव्या मांडणीतून मराठी संगीतप्रेमींना एक समृद्ध आणि भावपूर्ण म्युझिकल अनुभव देतो.

झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर आणि सना शिंदे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा व संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. छायाचित्रण आणि संकलनाची जबाबदारी मयूर हरदास यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!