
अमिताभ बच्चनच्या ‘दोस्ताना’ सिनेमात Starughan Sinha ची एन्ट्री कशी झाली?
यश जोहर यांनी 1978 साली आपल्या धर्मा प्रोडक्शन या बॅनरची स्थापना केली आणि पहिला चित्रपट निर्माण करायचे ठरवले. हा पहिलाच चित्रपट त्यांना धमाकेदार करायचा होता त्यामुळे इंडस्ट्री तील सर्व बेस्ट प्रॉडक्ट ते निवडत होते. त्या काळात सलीम जावेद यांच्या नावाचा जबरदस्त बोलबाला होता त्यामुळे स्क्रिप्ट आणि डायलॉग साठी सलीम जावेद यांची निवड झाली सिनेमाचा हिरो None other than अमिताभ बच्चन! चित्रपट होतात दोस्ताना! या सिनेमात आणखी एका हिरोची गरज होती कारण दोन मित्रांची कथा यात दाखवायची होती. हा सिनेमा एक trangular love action drama film होती.
यश जोहर यांनी दुसऱ्या नायकाच्या भूमिकेसाठी विनोद खन्नाची निवड केली. नायिका झीनत अमान. अमिताभ आणि विनोद खन्ना यांची त्या काळात चांगली ट्युनिंग दिसत होती. हेराफेरी, अमर अकबर अँथनी,परवरीश,खून पसीना ,मुकद्दर सिकंदर हे त्यांचे चित्रपट जबरदस्त चालले होते. यश जोहर यांनी या सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून राज खोसला यांची निवड केली. राज खोसला त्या काळात सर्वाधिक हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक अशी त्यांची ख्याती होती. अर्थात विनोद खन्ना आणि अमिताभ या दोघांना सांभाळणं तितकं सोपं नव्हतं पण राज खोसला यांनी शिताफीने सर्व सिच्युएशन हँडल करायचे ठरवले.

विनोद खन्ना राज खोसला यांना आपला गॉड फादर मानत होता. कारण त्यांच्या ‘मेरा गाव मेरा देश’(1971) या सिनेमाने त्याचा टोटल मेक ओव्हर झाला होता. कच्चे धागे , मै तुलसी तेरे आंगन की या त्यांच्या सिनेमाचा तो नायक होता. राज खोसला यांनी जेव्हा सिनेमाची स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली त्यात एका ठिकाणी त्यांच्या असे लक्षात आले की चित्रपटाची नायिका झीनत अमान विनोद खन्ना नाकारून अमिताभ सोबत जाण्याचा निर्णय घेते.
राज खोसला यांना हा निर्णय यासाठी पटला नाही की त्या काळात विनोद खन्ना सारख्या हँडसम व्यक्तीला कोणती मुलगी नाकारू शकते? सिनेमाच्या सिच्युएशन नुसार जरी ते योग्य असले तरी लॉजिकली त्यांना ते पटत नव्हते. प्रेक्षकांना त्यामुळे त्यांनी या सिनेमाचा दुसरा नायक बदलायचे ठरवले. आता त्यांच्या नजरे समोर शत्रुघ्न सिन्हा हे नाव आले. शत्रुघ्न सिन्हा यांनी राज खोसला यांच्या सोबत थेट कुठल्याही सिनेमात काम केले नव्हते पण राज खोसला प्रोडक्शन च्या ‘रास्ते का पत्थर’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा या दोघांच्या भूमिका होत्या!

पण आता काळ बदलला होता. शत्रुघ्न सिन्हा आता तो शत्रुघ्न सिन्हा राहिला नव्हता. अमिताभ बच्चनचा स्पर्धक म्हणून मीडिया मध्ये रंगवला जात होता. त्यामुळे दोघांच्या संबंधांमध्ये बऱ्या पैकी कटूता आली होती. पण राज खोसला यांनी मोठ्या कौशल्याने हा चित्रपट पूर्ण केला अमिताभ बच्चन सेट वर अगदी वेळेवर यायचे. पण शत्रुघ्न सिन्हा मात्र याबाबत उलट होते शिफ्ट सकाळी सातची असेल तर अमिताभ बच्चन सकाळी सहा वाजून 55 मिनिटांनी सेट वर हजर असायचे तर शत्रुघ्न सिन्हा दुपारी बारापर्यंत यायचे त्यामुळे राज खोसला यांना या सिनेमाच्या शूटिंग च्या वेळी खूप मनस्ताप सहन करावा लागला.
================================
हे देखील वाचा : Shatrughan Sinha : ‘हे’ पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष शत्रुघ्न सिन्हाला आपला मुलगा मानत!
================================
‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया’ या गाण्यात तर शत्रुघ्न सिन्हा पूर्णपणे अबसेंट होता त्यामुळे हे गाणं तुम्ही आज जेव्हा you tube वर पाहता तेव्हा जरी तिथे शत्रुघ्न सिन्हा दिसत असला तरी हा राज खोसला यांच्या एडिटिंग ची कमाल होती! ही गाणे रफीने गायले होते त्याला फिल्मफेअर चे नामांकन मिळाले होते. या सिनेमातील दोघांचे अनेक सीन्स वेगवेगळे चित्रित करून नंतर एकत्र संकलित केले गेले. Raj Khosla: The Authorized Biography या पुस्तकात या सर्व प्रकरणाचा खुलासा केला आहे. राज खोसला यांचा हा शेवटचा हिट सिनेमा ठरला. यश जोहर यांचा मुलगा कारण जोहर ने 2008 साली याच नावाचा एक सिनेमा बनवला होता. पण त्याचा जॉनर वेगळा होता.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी