
Dilip Kumar चा डबलरोल असलेला पहिला सिनेमा : राम और श्याम
7 एप्रिल 1967 रोजी दिलीप कुमारचा ‘राम आणि श्याम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमाच्या लिस्ट मध्ये दुसऱ्या क्रमांका वर होता. (पहिल्या क्रमांकावर मनोजकुमारचा ‘उपकार ‘ हा सिनेमा होता) हा दिलीपकुमारचा डबल रोल असलेला पहिला चित्रपट होता. (दिलीप ने तीन सिनेमात डबल रोल केले होते यानंतर दास्तान आणि किला या सिनेमात दुहेरी भूमिका होत्या तर 1976 च्या ‘बैराग’ या सिनेमात ट्रिपल रोल होता!) ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार यांनी त्यांच्या कॉमिक सेन्स ने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांचा विनोदी अभिनय इतका उत्कृष्ट होता की त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा चित्रपट एका तेलुगू चित्रपटाचा रीमिक्स होता. हा १९६४ च्या तेलुगू चित्रपट ‘रामुडू भीमुडू’ चा हिंदी रीमेक होता. या तेलगू सिनेमात (नंतर आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री झालेले) एन टी रामाराव प्रमुख भूमिकेत होते ‘राम आणि श्याम’ या चित्रपटा ची निर्मिती तेलगू प्रमाणेच बी नागी रेड्डी यांनी केली होती तर दिग्दर्शन तापी चाणक्य यांचे होते.
१९६७ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याच्या काळातील बिग बजेट चित्रपटांपैकी एक होता. त्याचे शूटिंग १९६४ मध्ये सुरू झाले आणि रिलीज होताच त्याने अनेक रेकॉर्ड मोडले. या चित्रपाटाची नायिका आधी वैजयंती माला असणार होती. तिच्यावर काही रील्स चे शूट देखील झाले होते पण नंतर ती बाहेर पडली आणि तिथे वहिदा रहमान ची वर्णी लागली. या सिनेमातील दुसऱ्या नायिकेसाठी माला सिन्हा शी संपर्क साधला होता पण सेकंड लीड भूमिका असल्याने तिने नाकारली. अर्थात याचा माला ला नंतर पश्चाताप झाला कारण ती समाजात होती तेवढी काही छोटी भूमिका नव्हती. दिलीप सोबत काम करण्याची संधी माला ने गमावली. पुढे आयुष्यभर ती दिलीपसोबत काम करू शकली नाही.

या चित्रपटाचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे निरुपा रॉय. निरुपा रॉय ही दिलीप कुमारच्या मोठ्या बहिणीची भूमिका करते, पण खऱ्या आयुष्यात दिलीप कुमार तिच्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठे होते. या चित्रपटामुळे मुमताजची कारकीर्द बदलली. तिला चित्रपटात सहाय्यक भूमिका मिळाली आणि तिचा अभिनय इतका चांगला होता की तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा नामांकन मिळाला. या चित्रपटानंतर तिची कारकीर्द पूर्णपणे बदलली आणि ती एक प्रमुख नायिका बनली. अभिनेता महमूद यांनी तिचे नाव सुचवले होते. मुमताज आणि दिलीपकुमार यांच्यात तब्बल २५ वर्षांचे अंतर होते. या भूमिकेसाठी आधी सायरा बानू चा देखील विचार झाला होता असे म्हणतात. पण दिलीप समोर ही खूपच लहान दिसेल असे सर्वांना वाटले. पण नंतर आशा काही गोष्टी घडल्या की हा सिनेमा सेट वर असताना च दिलीप आणि सायरा यांचा निकाह झाला!
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दिलीप कुमारने शामच्या भूमिकेत धमाल आणली. यातील दोन्ही भूमिका राम आणि श्याम प्रेक्षकांना आवडल्या. हा सिनेमा म्हणजे complete Entertainment package होता. भोळा, भित्रा राम आणि डॅशिंग हीरो श्याम या दोन्ही भूमिकात दिलीपने आपल्या अभिनयाचे रंग भरले. खलनायक प्राणच्या डेंजर चाबकाचा सामना करणे असो किंवा त्याला स्वतःच्या औषधाचा एक जबरदस्त डोस देणे असो, दिलीप ने त्याच्या या नटखट दुहेरी भूमिकेतील अभिनयाने प्रेक्षकांना निहायत खूष केले. यातील हाय व्हॉल्टज ड्रामा मध्येगाणी मस्त होती. त्यातील गीत संगीताने मजा आणली. आई है बहारे लेके जुल्म सितम, आज की रात मेरे दिल की सलामी ले जा, बालम तेरी प्यार की ठंडी आग में जलते जलते, मै हू साकी तू है शराबी शराबी.. ही गाणी सुंदर बनली होती.
शकील बदायुनी यांनी लिहिलेले ‘आज की रात मेरे दिल की सलामी ‘ हे गाणे त्यांचे अखेरचे गीत ठरले. हे गाणे लिहिल्यानंतर काही दिवसातच त्यांचे निधन झाले. हा चित्रपट सीता और गीता , चालबाज, किशन कन्हैय्या , जुडवा या सारख्या दुहेरी भूमिका असलेल्या विनोदी चित्रपटांसाठी एक आदर्श नमुना बनला.पंधरा व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला तीन नामांकने मिळाली, ज्यामध्ये दिलीप कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. वहिदा रहमान यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि मुमताज यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी नामांकन मिळाले.

१९६८ साली आलेला ‘राजा और रंक’ हा चित्रपट देखील मार्क ट्वेनच्या ‘द प्रिन्स अँड द पॉपर’ (१८८१) या कादंबरीवर आधारीत होता. हीच साहित्य कृती यापूर्वी ‘राजू पेडा’ (१९५४) या तेलुगू चित्रपटासाठी वापरण्यात आली होती. ट्वेनच्या कादंबरीतून तेलुगू चित्रपट ‘रामुडू भीमडू’ (१९६४), त्याचा तमिळ रिमेक ‘एंगा वीट्टू पिल्लई’ (१९६५) आणि त्याचा हिंदी रिमेक ‘राम और श्याम’ (१९६७) देखील होता. तेलुगू चित्रपटाचे रूपांतर मल्याळममध्ये ‘अजयनुम विजयनुम’ (१९७६) आणि कन्नडमध्ये ‘मोजुगरा सोगासुगारा’ (१९९५) या नावानेही करण्यात आले होते. या चित्रपटांचा आधार – दोन समान जुळ्या मुलांचे वेगळे वाढणे आणि पूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्त्वे तयार होणे आणि नंतर जागा बदलणे – हे इतर चित्रपटांमध्ये देखील वापरले गेले.
================================
हे देखील वाचा : Rakesh Roshan: पित्याच्या गाण्याच्या चालीतून बनवले ‘हे’ सुपर हिट गीत!
================================
‘सीता और गीता’ (1972) आणि ‘चालबाज’ (1989), तेलगू चित्रपट ‘गंगा मंगा’ (1973) आणि तामिळ चित्रपट ‘वाणी रानी’ (1974) या हिंदी चित्रपटांनी महिला मध्यवर्ती पात्रांसाठी हा फॉर्म्युला वापरला. श्रीदेवीचा ‘चालबाज’ याच जॉनरचा होता. कन्नडमध्ये ‘राणी महाराणी’ (1990) म्हणून रिमेक करण्यात आला. या जॉनरचे अनेक सिनेमे भारताच्या विविध भाषेत बनले. कन्नड चित्रपट ‘भाले जोडी’ (1970), त्याचा तेलुगु रीमेक ‘बुल्लेम्मा बुल्लोडू’ (1972), आणि त्याचा हिंदी रिमेक जितेंद्रचा ‘जैसे को तैसा’ (1973). तमिळ चित्रपट ‘थूनगाथे थांबी थुंगाथे’ (1983) आणि हिंदी चित्रपट हिंदी रिमेक ‘किशन कन्हैया’.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी