
Dilip Kumar & Rajesh Khanna : कधीही एकत्र न आलेले सुपरस्टार!
अभिनेता दिलीप कुमार (Dilip Kumar) आणिराजेश खन्ना (Rajesh Khanna) हे दोघेही सुपरस्टार कालावधी वेगळा असला तरी दोघांचा स्टारडम जबरदस्त होता. दिलीप कुमार सत्तरच्या मध्यापर्यंत नायकाच्या भूमिका करत होते त्यानंतर त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून काम करणे सुरू केले. राजेश खन्ना यांचा चित्रपटात प्रवेश साठच्या मध्यात झाला. सत्तरच्या मध्यापर्यंत राजेश खन्ना सुपरस्टार पदावर होता. त्यानंतर भलेही अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सुपरस्टार बनले असले तरी राजेश खन्नाचा रुतबा काही कमी झाला नव्हता. दिलीप कुमार आणि राजेश खन्ना यांनी एकत्र काम कधीच केले नाही, तसा कुठल्या निर्मात्याने या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न देखील केल्याचे ऐकू येत नाही. पण राजेश खन्ना दिलीप कुमारचे जबरदस्त फॅन होते. त्यांच्या रोमँटिक आणि गंभीर भूमिका ते फॉलो करत होते.
या दोघांनी बलेही एकत्र काम केले नसले तरी त्यांच्यातील संबंध खूप चांगले होते. सायरा बानू यांनी एका मुलाखतीत या दोघांच्या संबंधाबद्दल बरीच माहिती दिली. हे दोघेही काँग्रेसची राजकीय विचारसरणी मांडणारे व्यक्ती होते. पंडित नेहरू यांच्या काळापासूनच दिलीप कुमार काँग्रेस विचारसरणीचे होते. निवडणुकीच्या दरम्यान ते अनेकदा काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला देशभर जात असे. अभिनेता राजेश खन्ना यांनी देखील 90 च्या दशकामध्ये राजकारणात प्रवेश केला आणि दिल्ली लोकसभा मतदारसंघातून ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून देखील आले. काँग्रेसला आणखी एक स्टार प्रचारक राजेश खन्नाच्या रूपाने मिळाला, त्यामुळे राजेश खन्ना आणि दिलीप कुमार हे दोघे भारतातील निवडणुकांमध्ये काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी एकत्र फिरत. बऱ्याचदा त्यांचा मुक्काम एकाच हॉटेलमध्ये असे त्यामुळे दोघांची वेळ खूप चांगली जवळीक होती.

11 डिसेंबर 2011 या दिवशी दिलीप कुमारच्या वाढदिवसाला राजेश खन्ना त्याची पत्नी डिंपल कपाडिया सोबत शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. त्यावेळी राजेश खन्ना यांची तब्येत खूपच खराब झाली होती, ओळखू येणार नाहीत इतके ते अशक्त झाले होते. पण आपल्या लाडक्या अभिनेत्याला आणि मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते दिलीप कुमारच्या बंगलावर गेले. दिलीप कुमार यांनी त्यांचे खूप चांगले स्वागत केले, दोघांच्या खूप चांगल्या गप्पा झाल्या राजेश खन्ना त्यावेळेला म्हणाले की,”आज मी खुश आहे कारण डिंपल कपाडिया परत माझ्या घरात परत आली आहे!” दिलीप कुमार आणि राजेश खन्ना एकमेकांचा हात हातात घेऊन खूप वेळ गप्पा मारत होते. राजेश खन्नासाठी तो खूप आनंदाचा क्षण होता. दिलीप सुध्दा राजेशच्या घरी डिमपल परत येण्याने खूश झाले होते.

दिलीप सायराच्या वैवाहिक जीवनात 1982 साली ‘आस्मा’ नावाचे वादळ आले होते. आस्मा हैद्राबादची विवाहित महिला होती, जिला तीन अपत्ये होती. दिलीपला सायरापासून मूल होत नव्हते अशी एक लंगडी सबब या दुसऱ्या निकाहच्या समर्थनात सांगितली जात होती. खरं तर सायरा 1969 साली pregnant होती पण mis carriage झाले. अर्थात आस्मा प्रकरण फार काळ चालले नाही. दिलीप पुन्हा सायराकडे आले. आस्मा सोबत लग्न करायला दिलीपच्या बहिणीनी त्याला भरीस पडले होते. अभिनेत्री सायरा बानू (Saira Bano) आणि राजेश खन्ना यांच्यात खूप चांगले संबंध होते. परंतु गंमत म्हणजे या दोघांनी एकही सिनेमा केला नाही. या दोघांनी एकत्र काम करण्याचा दोनदा योग आला होता.
================================
हे देखील वाचा : हँडसम शशी कपूरला पाहून तरुण शर्मिला टागोर त्याच्यावर लट्टू झाली होती!
================================
पहिल्यांदा चित्रपट होता ‘छोटी बहू’ पण दोन दिवसांचे चित्रीकरण झाल्यानंतर सायरा आजारी पडली आणि तिला उपचारासाठी परदेशात जावे लागले त्यामुळे सायराच्या जागी शर्मिलाची (Sharmila Tagore) वर्णी लागली. या नंतर ‘रेशम कि डोरी’ या सिनेमासाठी या दोघा ना साईन केले होते, पण पुन्हा सायराचे आजारपण आणि राजेश खन्ना टू मच बिझी असणे यामुळे राजेश या सिनेमातून बाहेत पडला आणि इथे धर्मेंद्रची (Dharmendra) एंट्री झाली . अभिनेत्री सायरा बानो यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत राजेश खन्ना बद्दल खूप चांगले मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले,”राजेश खन्नाला माझ्या भूमिकांबद्दल कायम आदर असायचा. ते कायम माझ्या चित्रपटातील कामाबद्दल बोलत असायचे. मला देखील राजेश खन्नाचा सुपरस्टार पदाचा ऑरा पाहायला मिळाला होता. He was first superstar of Indian cinema. He was Handsome and humble”
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी