Skip to content Skip to sidebar Skip to footer

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

आई-मुलींचं नातं हे शब्दांत मांडणं कठीण… कधी जिव्हाळ्याने भरलेलं, कधी मतभेदांनी दुरावलेलं… तरीही एकमेकांशी घट्ट जोडलेलं. अशाच गुंतागुंतीच्या, हळव्या आणि वास्तववादी नात्याचा वेध घेणाऱ्या ‘तिघी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भावनांचा आविष्कार अधिक ठळकपणे मांडणारा हा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.(Tighee Marathi Movie)

या ट्रेलरमध्ये एका घरातल्या तीन स्त्रियांचं आयुष्य अधिक ठळकपणे उलगडताना दिसतं. आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील मतभेद, छोट्या-मोठ्या भांडणांतून व्यक्त होणारा राग, न बोललेल्या अपेक्षा आणि तरीही प्रत्येक क्षणी जाणवणारा जिव्हाळा या सगळ्याचं प्रभावी चित्रण यात पाहायला मिळतं. तिघींच्या आयुष्यात वेगवेगळे संघर्ष आहेत. प्रत्येक जण  स्वतःच्या प्रश्नांशी झुंज देताना दिसतेय. मात्र आयुष्याच्या एका निर्णायक वळणावर त्या तिघी एकमेकींसाठी कशा उभ्या राहाणार, याची उत्सुकता ट्रेलर शेवटपर्यंत टिकवून ठेवतो.

‘आईचं घर. हजार आठवणी.’ ही टॅगलाईन ट्रेलरमध्येही ठळकपणे जाणवते. घर हे फक्त चार भिंतींचं नसून तिथे साठलेल्या आठवणी, तुटलेले संवाद आणि पुन्हा जुळणारे धागे यांचं प्रतीक ठरतं. तिघींच्या नात्यातील ताणतणाव आणि त्यामागची माया यांचा समतोल साधत हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणार आहे. (Entertainment News)

चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, “आई आणि मुलींचं नातं अनेक थरांनी बनलेलं असतं. कधी ते भांडणांतून व्यक्त होतं, कधी शांततेतून. ‘तिघी’मधून आम्ही या नात्याची खरी, प्रामाणिक बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रेक्षकाला यात स्वतःचं घर आणि स्वतःचं नातं दिसेल.”

================================

हे देखील वाचा : Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील दिग्गजांचा अपमान करतोय का?”

================================

या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ची कथा व दिग्दर्शन जिजिविषा काळे यांनी केलं आहे. निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे. आई–मुलींच्या नात्याकडे संवेदनशील आणि प्रगल्भ दृष्टीकोनातून पाहाणारा ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!