Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली; ७ कोटींचा लिलाव, घरात रंगला भन्नाट खेळ!

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सध्या नाट्य, भावना आणि मनोरंजनाचा जबरदस्त संगम पाहायला मिळतो आहे. प्रत्येक दिवस नवा ट्विस्ट घेऊन येतोय. कालपर्यंत काटाच्या गटासोबत ठामपणे उभी असलेली राखी, आज मात्र विशालच्या टीमसोबत अधिक वेळ घालवत असल्याचे चित्र दिसत आहे. या बदलामुळे घरातील समीकरणेही झपाट्याने बदलताना दिसत आहेत. आज प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधील एक धक्कादायक क्षण म्हणजे राखीने स्वतःच स्वतःचे केस कापणे. स्वतःलाच शिक्षा देण्याच्या तिच्या या निर्णयामुळे घरातील वातावरण काही काळासाठी गंभीर आणि तणावपूर्ण बनते. मात्र दुसऱ्या प्रोमोमध्ये या तणावावर फुंकर घालण्यासाठी विशालने एक भन्नाट आयडिया काढल्याचे दिसते.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Update

या प्रोमोमध्ये विशाल राखीच्या केसांच्या तुकड्यांचा लिलाव पद्धतीने बोली लावताना दिसतो आणि घरातील सदस्यही त्यात उत्साहाने सहभागी होतात. बोलीची सुरुवात सागरकडून होते. तो राखीच्या केसांसाठी एक रुपये ५० पैशांची बोली लावतो. त्यानंतर प्रभू दोन रुपयांची बोली लावतो. पुढे दीपाली १०० रुपयांची बोली लावते. खेळ इथेच थांबत नाही. सुरांची राणी प्राजक्ता थेट १० हजारांची बोली लावते. त्यानंतर अनुश्री दहा लाख एकशे एक रुपयांची बोली लावते. ते पाहून राखी सावंत आनंदाने उठते आणि अनुश्रीची पप्पी घेते. तेव्हाच राकेश ७ कोटी रुपयांची बोली लावतो. हे ऐकून राखी अधिकच खुश होते आणि राकेशकडे जाते, मात्र राकेश स्पष्ट करतो की ही बोली अनुश्रीने लावलेल्या रकमेवर आहे.

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Update

असा हा धमाल, थोडा भावनिक आणि थोडा विनोदी रंगतदार खेळ घरात रंगताना दिसतो. बिग बॉसने हा प्रोमो शेअर करत “राखीच्या केसांची लागली बोली…” असा कॅप्शन दिला आहे. कमेंट्समध्येही प्रेक्षकांनी या प्रसंगाची जोरदार मजा घेतल्याचे दिसते.(Bigg Boss Marathi 6)

==============================

हे देखील वाचा: Super Duper Marathi Movie Teaser:  ३ एप्रिलला रंगणार कौटुंबिक जल्लोष; सुपर डुपर चा धम्माल टीजर लॉन्च !

==============================

दरम्यान, त्याच भागात आधी राखीने उदास मनस्थितीत स्वतःला शिक्षा म्हणून केस कापले होते. आता या घटनेनंतर घरातील नवे समीकरण कसे तयार होणार? पुढे कोणता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार? यासाठी बिग बॉस मराठीचे आगामी भाग नक्कीच अधिक उत्सुकता वाढवणारे ठरणार आहेत.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!