Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’ स्पर्धकाचा प्रवास संपणार !

Bigg Boss Marathi 6 च्या पर्वात आता खेळ निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करताना दिसतो आहे. दर आठवड्याला एक स्पर्धक घराबाहेर पडत असल्यामुळे घरातील वातावरण अधिकच तापत चालले आहे. रणनीती, गटबाजी आणि वैयक्तिक गेम या सगळ्यांची कसोटी लागते आहे. या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेत फक्त चार सदस्य आले होते. तन्वी कॅप्टन असल्यामुळे ती सुरक्षित होती. प्रभू (Prabhu)आणि अनुश्री (Anushri Mane) यांच्याकडे पॉवर की असल्याने ते दोघेही सेफ झाले. त्यामुळे रोशन भजनकर, राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे आणि राखी सावंत हे चार जण डेंजर झोनमध्ये होते. सातव्या आठवड्यात यांच्यापैकी कोणाचा प्रवास संपणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6 Update
Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka

अखेर घराबाहेर जाणाऱ्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. रोशन भजनकरचा (Roshan Bhanjankar) सातव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील प्रवास इथेच थांबला आहे. रोशनचे एव्हिक्शन अनेकांसाठी धक्कादायक ठरले. कारण त्याला बाहेरून चांगला पाठिंबा मिळत असल्याची चर्चा होती. त्यामुळे तो अचानक घराबाहेर पडल्याने चाहत्यांमध्ये प्रश्न निर्माण झाले. मात्र गेमच्या दृष्टीने पाहिल्यास काही प्रेक्षकांना हा निर्णय योग्यही वाटत आहे.

Bigg Boss Marathi 6 Update
Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka

स्वतःचा ठसा उमटवणारा स्वतंत्र गेम न खेळणे रोशनला महागात पडल्याचे बोलले जात आहे. सुरुवातीपासूनच तो गटाच्या रणनीतीवर अवलंबून असल्याचे दिसून आले. रूचिता आणि विशाल जे ठरवत होते, त्यानुसार रोशनचा खेळ पुढे सरकत होता. वैयक्तिक भूमिका ठामपणे मांडण्यात तो कमी पडला आणि याचाच फटका त्याला बसल्याची चर्चा रंगली आहे.(Bigg Boss Marathi 6)

==============================

हे देखील वाचा: मालिका विश्वातली प्रेक्षकांची आवडती गौरी-जयदीपची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट…

==============================

यंदाच्या सीझनमध्ये पहिल्यांदाच शनिवारी एलिमिनेशन होणार आहे. ‘भाऊचा धक्का’ संपताना रितेश भाऊ घरातून बाहेर जाणाऱ्या स्पर्धकाचे नाव अधिकृतरित्या जाहीर करणार आहेत. मात्र त्याआधीच रोशन एलिमिनेट झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, या सीझनमध्ये लवकरच नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची माहितीही समोर येते आहे. त्यामुळे घरातील समीकरणे पुन्हा एकदा बदलणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. आगामी भागांमध्ये कोणते नवे ट्विस्ट आणि ड्रामा पाहायला मिळणार, हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!