Skip to content Skip to sidebar Skip to footer

Gotya Gangster Teaser:  दिग्दर्शक राजेश पिंजानी यांचा अखेरच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित;  प्रथमेश परब साकारणार महत्वाची भूमिका ! 

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांच्या अखेरच्या चित्रपटाचा अनोखा टीजर नुकताच लाँच करण्यात आला आहे. ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाचा टीजर, अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील गाणे ‘गोट्या भाय’ वर आधारित आहे, जो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाची एक आगळी-वेगळी शैली आणि खुसखुशीत संवाद प्रेक्षकांसाठी एक आकर्षक अनुभव ठरणार आहे. हा चित्रपट २६ डिसेंबर २०२५ रोजी नाताळच्या सुट्टीत प्रदर्शित होणार आहे. ‘गोट्या गँगस्टर’ हा एक मनोरंजनाचा भरपूर डोस असलेला चित्रपट असणार आहे, ज्यामध्ये विनोदी प्रसंग, धमाल आणि भन्नाट संवादांचे मिश्रण पाहायला मिळणार आहे.(Gotya Gangster Teaser)

Gotya Gangster Teaser
Gotya Gangster Marathi Movie

चित्रपटाची निर्मिती अन्नपूर्णा प्रॉडक्शन्सकडून केली आहे. अन्नपूर्णा बिरादार, राजेश्री बिरादार, संदीप बिरादार हे या सिनेमाचे निर्माते आहेत, तर चित्रपटाची प्रस्तुतकर्ता आणि सहनिर्माता ऋतुजा पाटील आणि शिव लोखंडे आहेत. अससोसिएट निर्माता म्हणून शिवाकांत तिवारी यांचा देखील महत्त्वाचा सहभाग आहे. राजेश पिंजानी यांची ही निर्मिती एक अविस्मरणीय अनुभव देईल, कारण या चित्रपटात उत्कृष्ट स्टारकास्ट आहे. प्रवीण तरडे, प्रथमेश परब, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, विनोद वणवे, ऐश्वर्या शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात मायानगरी मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची गोष्ट उलगडत आहे. त्या मित्रांच्या आयुष्यात घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांमुळे ते किडनॅपिंग च्या संकटात सापडतात. 

Gotya Gangster Teaser
Gotya Gangster Marathi Movie

याच दरम्यान, मुंबई सोडून दुबईला पळून गेलेला डॉन चिमण भाई अचानक मुंबईत परततो आणि त्या नंतर अनेक विनोदी आणि धमाल प्रसंग सुरू होतात.राजेश पिंजानी यांचे ‘बाबू बँड बाजा’ या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता. त्यांच्या या यशानंतर, त्यांच्या पुढील चित्रपटांबद्दल प्रेक्षकांची मोठी अपेक्षा होती. ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटावर देखील असाच मोठा दबाव होता, पण दुर्भाग्यवश, राजेश पिंजानी यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे ‘गोट्या गँगस्टर’ हा त्यांच्या दिग्दर्शनाचा शेवटचा चित्रपट ठरला आहे.(Gotya Gangster Teaser)

==============================

हे देखील वाचा: सूरज बरोबर सतत करवली म्हणून मिरवणारी Janhvi Killekar लग्नानंतर थेट हॉस्पिटलमध्ये दाखल !

==============================

चित्रपटाची कथा, संवाद, दिग्दर्शन आणि अभिनय हे सर्व एकाच ठिकाणी घालून हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना एकदम वेगळा अनुभव देईल. २६ डिसेंबरला प्रदर्शित होणारा ‘गोट्या गँगस्टर’ हा चित्रपट राजेश पिंजानी यांच्या कलेला एक आदरांजली ठरणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!