Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘तन्वी कोलते..आता मी तुला सोलते’; ‘एंटरटेन्मेंट क्वीन’ Rakhi Sawantची बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री!

मराठी बिग बॉसचं सहावं सीझन प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच करत आहे. सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया मिळवत या सीझनमधील सदस्यांनी देखील बाजी नक्कीच मारली आहे. अशातच आता बिग बॉसच्या घरातील वातावरण अधिक एन्टरटेनिंग करण्यासाठी ड्रामा क्वीन राखी सावंतची घरात एन्ट्री झाली आहे. सहाव्या सीझनची ती पहिली वाईल्ड काल्ड सदस्य ठरली असून घऱात जाताच तिने प्रत्येक सदल्याला फैलावर घ्यायला सुरुवात केली. (Marathi Big Boss Season 6)

दरम्यान, राखी सावंत या आधी देखील मराठी आणि हिंदी बिग बॉसमध्ये स्पर्धक आणि वाईल्ड कार्ड एन्ट्री करणारी सदस्य म्हणून सहभागी झाली होती. जिथे राखी आहे तिथे एन्टरटेंमेन्ट असणार यात शंकाच नाही. आणि आता मराठी बिग बॉसचं सहवं सीझनही तिच्या येण्यामुळे चांगलंच गाजणार हे नक्की. राखीने घरात आल्या आल्या सदस्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. तसेच, कायम हटके लूक करणारी राखी घरात नागीन अवतारात आली. (Rakhi Sawant)

सोशल मिडियावर तिच्या घरातील एन्ट्रीचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये राखी सावंतची घरात एन्ट्री होते. एंटरटेन्मेंटची लहर, घरात पसरणार राखीचा कहर…यावेळी राखीचा नागीन लूकही मजेशीर आहे. राकेश बापटला बघून राखी म्हणते…राSSकेSSश बाSSप’, त्यावर राकेश राखीला ‘ताई’ म्हणतो. नंतर राखी तन्वीला ‘तन्वी कोलते..आता मी तुला सोलते’ असं म्हणते. यावर एकच हशा पिकतो. आता राखी घरात कोणाकोणाला भिडणार, कुणाशी मैत्री करणार, कुणाशी वैर करणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : Netflix India 2026 : ‘इक्का ते ‘फॅमेली बिझनेस’; जाणून घ्या नेटफ्लिक्सवरील नव्या प्रोजेक्ट्सची लिस्ट

================================

दरम्यान, राखी सावंत शोबद्दल म्हणाली, “राखी जाणार आणि गेम पालटणार. माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं आहे. मी घरात गेल्यावर सगळ्यांचा आवाज गायब होतो. जेव्हा राखी सावंत घरात जाणार तिची मर्जी चालणार आहे मी घरात धम्माल करणार आहे. तुम्हाला माझे वेगवेगळे कॉस्च्युम्स, माझा गेम पाहायला मिळणार आहे. बिग बॉस प्लॅटफॉर्म सगळ्यांना नाही मिळत आपल्याला मिळाला आहे तर त्याचा उपयोग करून घ्या हे माझं म्हणणं आहे. रितेश देशमुख अमेझिंग आहेत आणि उत्तम अभिनेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला बिग बॉस मराठी चालतो आहे. मला खुप अभिमान आहे ते हा शो होस्ट करत आहेत. आपल्या मराठी लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी मी बिग बॉस मराठी करत आहे. (Marathi Big Boss and Rakhi Sawant)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!