Skip to content Skip to sidebar Skip to footer

Netflix India 2026 : ‘इक्का ते ‘फॅमेली बिझनेस’; जाणून घ्या नेटफ्लिक्सवरील नव्या प्रोजेक्ट्सची लिस्ट

दरवर्षी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि सगळेच ओटीटी प्लॅटफॉर्म्स करत असतात. अशातच जगातील सर्वात मोठं स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालं आहे. जाणून घेऊयात कोणते नवे चित्रपट, सीरीज येत्या वर्ष भरात रिलीज होणार आहेत. (Netflix 2026)

सैफ अली खान आणि प्रतिक गांधी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘हम हिंदुस्थानी’ (Hum Hindusthani) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात भारतातील पहिल्या निवडणूकीची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राहूल ढोलकिया यांचं दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटात दिपक डोब्रियाल, सारिका यांच्यासह बऱ्याच कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका असणार आहेत.

सिद्धार्थ पी मल्होत्राच्या ‘इक्का’ (Ikka) या चित्रपटात ओटीटीवर पहिल्यांदाच सनी देओल डेब्यु करणार असून यात अक्षय खन्ना देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. एका मर्डरचं इनवेस्टिगेशन करत ही कथा एका वेगळ्याच स्तराला जाणार आहे. यात दिया मिर्झा, तिलोत्तमा शोम, संजिदा शेख यांच्या महत्वाच्या भूमिका असणार आहेत.

दुसरा शो आहे, अनिल कपूर आणि विजय वर्मा स्टारर शो ‘फॅमिली बिझनेस’ (Family Business). हंसल मेहताचं दिग्दर्शन असणाऱ्या या शोमध्ये नेहा धुपिया, रेहा चक्रवर्ती, अनंत नाग, टिना देसाई, रोहन मेहरा अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे.

================================

हे देखील वाचा : Divya Shinde : बिग बॉसच्या घरातील सदस्यांना थेट जीवे मारण्याची धमकी, घरातून तिचीच केली हकालपट्टी

================================

माधुरी दीक्षित, तृप्ति डिमरीचा कॉमेडी थ्रिलर मां-बहन हा चित्रपटही लवकरच नेटफ्लिक्सवर येणार आहे. तसेच, मिस मॅच्ड सीझन ४, सैफ अली खान आणि रसिका दुग्गलची कर्तव्य, राजकुमार राव आणि सान्या मल्होत्राची टोस्टर सुद्धा याचवर्षी रिलीज होईल. तापसी पन्नूचा चित्रपट ‘गांधारी’ (Gandhari), कोंकणा सेन शर्माची फिल्म ‘अक्यूस्ड’ (Accused) सुद्धा याचवर्षी रिलीज होणार आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!