
संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची जोडी कशी जमली?
आयुष्यातील साथीदाराची जोडी भगवंत ठरवत असतो असे म्हणतात. सिनेमा संगीताच्या क्षेत्रातील संगीतकारांची जोडी देखील कदाचित तोच ठरवत असावा. कारण संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची जोडी कशी जमली याच याचा खूप इंटरेस्टेड असा किस्सा आहे. पन्नास च्या दशकाच्या मध्यावर एकदा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर मुंबईच्या रेडिओ क्लब वर गाणे गात होत्या.तिथे त्यांच्या साथीदारांमध्ये एक लहान वयाचा चुणचुणीत मुलगा अतिशय सुंदर मंडोलीन वाजवत होता. लता मंगेशकर यांना त्या लहान मुलाचे वादन खूप आवडले त्यांनी स्वतःहून त्या मुलाला जवळ बोलावून त्याची शाबासकी दिली.
यानंतर त्यांनी त्या मुलाची माहिती काढली तेव्हा असं कळाले की हा मुलगा अतिशय प्रतिभावान आहे पण गरीब घरातून तो आलेला आहे. लता मंगेशकर यांनी ताबडतोब त्या काळातील मोठ्या संगीतकारांना फोन करून त्या मुलाबद्दल सांगितले आणि त्याला तुमच्या संगीतात संधी द्या असे सांगितले. शंकर जयकिशन, जयदेव सचिन देव बर्मन यांना ताबडतोब त्यांनी फोन केला. हा मुलगा होता लक्ष्मीकांत कुडाळकर. जन्म 3 नोव्हेंबर 1937. अगदी लहान वयात पितृछत्र हरपले. अतिशय कठीण परिस्थितीत तीनचे बालपण गेले. त्यांनी संगीताचे प्रारंभिक संगीत शिक्षण ‘उस्ताद हुसेन अली’ तसेच बालमुकुंद इंदोरीकर यांच्याकडून मेंडोलिन वाद्य वाजवण्याचे शिक्षण घेतले.
=============
हे देखील वाचा : Mohammed Rafi यांच्या दिलदारपणाचे आणि लोकप्रियतेचे किस्से
=============
लता मंगेशकर यांचे धाकटे बंधू हृदयनाथ मंगेशकर (जन्म 25 ऑक्टोबर 1937) हे देखील संगीताच्या दुनियेत येऊ पाहत होते. लता मंगेशकर यांनी हृदयनाथ यांना लक्ष्मीकांत यांना सोबत घेऊन संगीत द्यायला सुरुवात कर असे सांगितले. हृदयनाथ-लक्ष्मीकांत असे नाव देखील ठरले! त्याचवेळी एक दुसरा एक लहान मुलगा व्हायोलिन वाजवत होता. अनेक संगीतकारंकडे व्हायोलिन चे वादन करत असे. हा मुलगा होता प्यारेलाल शर्मा. जन्म 3 सप्टेंबर 1940. त्याचे वडील रामप्रसाद शर्मा trampet वादक होते. प्यारेलाल वयाच्या आठव्या वर्षीच व्हायोलिन वाजवायला शिकले. व्हायोलिन वादनाच्या पुढील शिक्षणा साठी विलायतेला जायचे होते. याच काळात संगीतकार सचिन देव बर्मन यांचे पुत्र राहुल देव बर्मन (जन्म : 26 जून 1939) आपल्या वडलांना संगीतात सहाय्य करत होते. प्यारेलाल आणि आर डी बर्मन यांच्याशी विशेष मैत्री होती. पंचम तथा आर डी वर्मा हे देखील स्वतंत्र रित्या संगीताच्या दुनियेत प्रवेश करू इच्छित होते त्यामुळे पंचम आणि प्यारेलाल यांनी एकत्र येऊन संगीताच्या दुनियेत प्रवेश करतील असे वाटत होते.

पण नियतीच्या मनात काही वेगळं च होतं. हृदयनाथ – लक्ष्मीकांत ही जोडी काही जमू शकली नाही तसेच आर डी बर्मन- प्यारेलाल ही जोडी देखील जमू शकली नाही. फायनली जोडी जमली ती लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांची! बाबूभाई मिस्त्री यांच्या 1963 सालच्या ‘पारसमणी’ या चित्रपटापासून त्यांनी संगीताच्या दुनियेत प्रवेश केला. त्यांनी अनेक संगीतकारांकडे सहाय्यक म्हणून काम केले. स्वतंत्र संगीतकार झाल्या नंतर देखील त्यांनी इतर संगीतकारांकडे सहाय्यक म्हणून काम केले. ‘जब जब फूल खिले’(1966) आणि ;हिमालय की गोद मे; (1963) या चित्रपटासाठी त्यांनी कल्याणजी आनंदजी यांना सहाय्य केले. तर ‘भूत बंगला’(1965) या चित्रपटासाठी आर डी बर्मन यांना त्या काळात सर्व संगीतकारांमध्ये एक निरोगी स्पर्धा होती. ‘दोस्ती’(1964) या चित्रपटामध्ये हार्मोनिका वाजवण्यासाठी त्यांना एक वादकाची गरज होती पंचम एका पायावर तयार झाला आणि ‘जाने वालो जरा मुडके देखो मुझे ..’ या गाण्यांमध्ये त्यांनी हार्मोनिका वाजवला.

संगीतकार प्यारेलाल अतिशय सुंदर व्हायलेलो वाजवायचे. संगीतकार मदन मोहन यांच्याकडे ‘हकिकत’ या चित्रपटासाठी त्यांनी व्हायोलिन वाजवले होते. या चित्रपटातील एका गाण्यासाठी एकदा प्यारेलाल यांना बोलावले. प्यारेलाल त्या काळात खूप बिझी होते. एकतर ते स्वतः संगीतकार होते; शिवाय इतरांकडे ते व्हायोलिन वाजवायला जात असत. नेमकं त्या दिवशी रेकॉर्डिंगला ते उशिरा पोहोचले. लष्करी शिस्तीच्या मदन मोहन यांना हा उशीर अजिबात आवडला नाही त्यांनी सर्वांच्या समक्ष प्यारेलाल यांना खूप झापले! प्यारेलाल बिचारे मान टाकून घरी निघून गेले. दोन दिवस ते घराच्या बाहेर पडले नाही.
================================
================================
जेव्हा संगीतकार मदन मोहन यांना ही बातमी कळली तेव्हा ते स्वतः प्यारेलाल यांच्या घरी गेले आणि त्यांची माफी मागितली आणि त्यांना घेऊन ते रेकॉर्डिंग स्टुडिओ त आले. हकीकत या चित्रपटातील मै ये सोचकर उसके दर से उठा था..’ हे गाणं रेकॉर्ड झालं या गाण्यातील व्हायोलिन चे पिसेस आज देखील काळजात घर करतात त्या काळात प्रत्येक कलावंत हा सर्वोत्कृष्टच देत असल्यामुळे ते संगीत आज देखील आपल्या मनाला भावते. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी एकूण 750 चित्रपटांना संगीत दिले . साठ, सत्तर आणि ऐंशी च्या दशकातील ते आघाडीचे संगीतकार होते. त्यांना तब्बल सात वेळा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला तर 18 वेळेला नामांकन मिळाले! 25 नोव्हेंबर 1998 या दिवशी संगीतकार लक्ष्मीकांत यांचे निधन झाले.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी