
Bhushan Pradhan ने सिक्रेटली केला साखरपूडा; अनुषाचं आहे का गौराई?
गेल्या वर्षापासून मराठी आणि हिंदीतील कलाकार एका पाठोपाठ लग्नबंधनात अडकत आहेत… काही दिवसांपूर्वीच Gaurav More याने अचानक भयानक डारकेक्ट लग्न झाल्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.. खरं तर आपल्या लाडक्या सेलिब्रटींच्या पर्सनल लाईफमध्ये काय सुरु आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता असते… आणि आता तीच उत्सुकता अधिक शिगेला पोहोचवली आहे Bhushan Pradhan याने… सोशल मिडियावर थेट लग्नाच्या तारखेची पोस्टच त्याने केली आहे.. आता त्याच्या आय़ुष्यातली गौराई नेमकी आहे तरी कोण हा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे… (Bhushan Pradhan Engagement)
भूषण प्रधान याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मुलीचा चेहरा न दाखवता हातात हात घेऊन फोटो शेअर केला आहे… फोटोमध्ये त्यानं त् मुलीला मिठी मारलेली दिसत असून दोघांच्याही रिंग फिंगरमध्ये अंगठी दिसतेय. यामुळे कन्फर्म भूषणने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. शिवाय त्या पोस्टमध्ये ‘२४.७.२०२६’ ही तारीख लिहत ‘सेव्ह द डेट’ असंही लिहिलंय. तसेच, अगदी लहान अक्षरात ‘आमच्या आयुष्याच्या नवीन सुरुवातीचे साक्षीदार व्हा’ असंही लिहिलं आहे. त्यामुळे आपला लाडका भूषण प्रधानही बोहल्यावर चढला असून फार युनिक आणि सिक्रेटली त्याने लग्नाची तारीख जाहिर केली आहे… (Entertainment News)

दरम्यान, मध्यंतरीच्या काळात सोशल मिडियावर आणि कार्यक्रमांमध्ये अभिनेत्री Anusha Dandekar आणि भूषण प्रधान यांचं एकत्रित वावरणं, फोटो शेअर करणं प्रेक्षकांच्या मनात शंका निर्माण करत होते… दोघे एकमेकांना डेट करत आहेत अशाची चर्चा रंगल्या होत्या… त्यामुळे आता त्याची होणारी बायको अनुषा आहे की नाही हे जाणून घेण्याची लोकांची तडफड आता शिगेला पोहोचली आहे हे नक्की… (Marathi Celebrity Marriage)
अनुषा आणि भूषणबद्दल सांगायचं झालं तर दोघांनी ‘जुनं फर्निचर’ या मराठी चित्रपटात एकत्र काम केलं होतं.. चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. आणि त्यानंतर दोघांचे एकत्र फोटो पाहून दोघे डेट करत असल्याच्या चर्चा दूरदूरपर्यंत पोहोचल्या होत्या… त्यावेळी अनुषाच्या वाढदिवसानिमित्त भूषणने केलेली पोस्ट खास चर्चेत होती.. त्याने लिहिलं होतं की. “हॅपी बर्थडे नुश.. तू खूप प्रेरणादायी, कधीही न थांबणारी आणि सुंदर शक्ती आहेस. आज आपण फक्त तुझा वाढदिवस साजरा करत नाही आहोत तर तुझ्यासारख्या अतुलनीय व्यक्तीला साजरं करत आहोत. अशी व्यक्ती जी आव्हानांचा सामना करते, न घाबरता पुढे जाते आणि सगळीडे प्रेम, प्रकाश पसरवते.” (Anusha Dandekar & Bhushan Pradhan)

या पोस्टमध्ये त्याने एक रिल पोस्ट करत कॅप्शनमध्ये त्याने पुढे असं देखील लिहिलं होतं की, “हे रील सिद्ध करतं की ट्रेंडिंग चॅलेंजेसमध्ये कितीही वेळा अपयशी झालो तरी आपण त्या क्षणांमधूनही आनंद शोधतो. समोर येणाऱ्या प्रत्येक अडखळ्यातूनही आपण अविस्मरणीय वाट काढतो. भूषणने शेवटी लिहिलेलं three taps nush.” याचा अर्थ होतो I love you in secret. त्यामुळे तेव्हा भूषण याने जाहिरपणे पण जास्त काही कळू न देता प्रेमाची कबूली दिली होती असं लोकांनी म्हटलं होतं.. (Bhushan Pradhan Affair)
================================
हे देखील वाचा : Dhurandhar 2 : बजेट 250 कोटी, कमाई 3000 कोटींच्या पार!
================================
भूषण प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, २०११ मध्ये ‘पारंबी’ या चित्रपटातून भूषणने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं… त्यानंतर ‘सतरंगी रे’, ‘कलाकार’,’मी आणि यु’, ‘टाईमपास’, ‘मिस मॅच’, ‘टाईमपास २’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘अजिंक्य’, ‘आम्ही दोघी’, ‘लग्न कल्लोळ’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये तो दिसला आहे…चित्रपटांसोबतच भूषणने ‘घे भरारी’, ‘पिंजरा’, ‘कुंकू’, ‘चार चौघी’, ‘ओळख’, ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकांमध्येही कामं केली आहेत… तर, ‘गोंद्या आला रे’, ‘कोडनेम’ या वेब सीरीजमध्ये आणि हॅम्लेट या नाटकातही तो झळकला होता… आता येत्या काळात लाईफ अपडेटनंतर तो नव्या प्रोजक्टची काय अपडेट देणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे… (Bhushan Pradhan movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi