
Dhurandhar 2 : बजेट 250 कोटी, कमाई 3000 कोटींच्या पार!
रणवीर सिंग याच्या Dhurandhar 2 चित्रपटाने न भूतो न भविष्यती असा भन्नाट रेकॉर्ड बॉक्स ऑफिसवर केला आहे… बॉलिवूडच्या स्पाय चित्रपटांचा चेहरा मोहराच पार आदित्य धरने बदलून टाकला आहे… हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘धुरंधर’ हा पहिला चित्रपट आहे ज्याच्या पहिल्या पार्टने ८०० कोटी क्लब बॉलिवूडसाठी खुला केला. त्यानंतर दुसऱ्या पार्टने डायरेक्ट १००० कोटींचा क्लब सुरु केला… इथवरच चित्रपटाचा रेकॉर्ड थांबत नाही… चला जाणून घेऊयात चित्रपटाची कमाई आणि रेकॉर्ड्स.. (Ranveer Singh Movie)
मुळात चित्रपटाचं बजेट होतं 250 Cr आणि चित्रपटाने भारतात १००० कोटींच्या पुढे आणि वर्ल्डवाईड १५०० कोटींच्या पुढे कमाई करत बजेटची वसूली कधीच केली आहे, पहिल्याच दिवशी जवळपास केली असं म्हटलं तर हरकत नाही… कारण, धुरंधर २ ने पहिल्या दिवशी (हिंदी भाषेत) 240 Cr कमावले होते… तसेच, एकाच दिवसात एकाच भाषेत 100 Cr कमावण्याचा पराक्रम देखील याच चित्रपटाने केला आहे…(Dhurandhar 2 box office records)

२०२५ आणि २०२६ हे वर्ष ‘धुरंधर’मय खऱ्या अर्थाने झालं आहे… कारण, एकाच फ्रेंचायझीने मिळून १००० कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. इतकंच नाही तर परदेशात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट देखील ठरला आहे… तसेच, Ranveer Singh आणि Aditya Dhar यांच्या फिल्मी करिअरमधील हे दोन्ही चित्रपट १००० कोटींची कमाई करणारी पहिली फ्रेंचायझी ठरले आहेत… (Entertainment News)

आता जरा Dhurandhar आणि Dhurandhar : The Revenge या दोन्ही पार्ट्सच्या कमाईवर एक नजर टाकूयात… धुरंधर (२०२५) चित्रपटाने 840.20 Cr (India Net), 1007.85 Cr (india gross), 299.50 Cr (overseas), 1307.35 Cr (worldwide)कलेक्शन केलं आहे. तर, धुरंधर २(२०२६) चित्रपटाने 1083.65 Cr (india net), 1297.50 Cr (india gross), 414.50 Cr (overseas), 1712 Cr (worldwide). त्यामुळे दोन्ही पार्ट्सची मिळून एकूण कमाई 1923.85 (india net), 2305.35 Cr (india gross), 714 Cr (overseas), 3019.35 Cr (worldwide) इतकं massive कलेक्शन आत्तापर्यंत केलं आहे…
================================
हे देखील वाचा : अमरीश पुरी यांनी Smita Patil यांच्या कानाखाली का मारलं होतं?
================================
आता जरा बॉलिवूडला धुरंधर सारखा तगडा आणि ऑलटाईम ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक Aditya Dhar बद्दल जला जाणून घेऊयात… दिग्दर्शनासोबत आदित्यने lyricist म्हणूनही इंडस्ट्रीत काम केलं आहे…आदित्यने बॉलिवूडमध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून सुरुवात केली होती… तसेच, काबूल एक्सप्रेस, हाल-ए-दिल, डॅडी कूल या चित्रपटांसाठी त्याने गाणी देखील लिहिली आहेत… २०१९ मध्ये त्याने URI : The Surgical Strike हा पहिला directorial debut चित्रपट केला आणि पहिल्याच फटक्यात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलं… आता यानंतर आदित्य कोते नवे प्रोजेक्ट्स आपल्या भेटीला आणणार याची खरं तर उत्सुकता अधिक वाढली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ‘धुरंधर’ सारखी यशस्वी फ्रेंचायझी दिल्यामुळे आता त्याच्याकडून अपेक्षा फारच वाढल्या आहेत… ‘धुरंधर’ फ्रेंचायझीमध्ये रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Dhurandhar movie starcast)

Dhurandhar 2 मधलं ‘हे’ गाणं चक्क रिलीजच्या एक दिवसापूर्वी झालेलं रेकॉर्ड!
‘धुरंधर’ मध्ये Shararat गाणं गात ज्या गायिकेने लोकांना मंत्रमुग्ध केलं ती गायिका आहे Jasmine Sandlas. जॅस्मिन एक अमेरिकन-भारतीय सिंगर आहे. ‘धुरंधर २’ मध्ये जॅस्मिन आणि गायक सतिंदर सरताज यांनी गायलेलं Jaiye Sajana गाणं. चित्रपटातील या Emotional गाण्याला प्रेक्षकांची फार पसंती मिळाली आहे. सोशल मीडियावर गाण्याचे रिल्स देखील व्हायरल झाले असून Youtube वर 5 मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज या गाण्याने मिळवले आहेत. पण हे सपरहिट गाणं रिलीजच्या १ दिवसाआधी तयार केलं गेलं होतं आणि याचा खुलासा गायिका जॅस्मिन हिने तिच्या मुलाखतीत केला आहे. (Bollywood News)

जॅस्मिन म्हणाली की, “ज्या दिवशी चित्रपटाचा म्यूझिक अल्बम लाँच केला गेला, त्याच दिवशी Jaiye Sajanaहे गाणं तयार केले गेलं. मी पहाटे 4 वाजता शाश्वत सचदेवासोबत स्टुडिओमध्ये होती, आम्ही या गाण्याची रेकॉर्डिंग करत होतो आणि तोपर्यंत चित्रपटाचा एक अल्बम प्रदर्शित केला जात होता. आणि सोशल मिडियावर जे व्हिडिओ व्हायरल झाले की आम्ही स्टेजवर गाणं सादर करतोय, त्याच दिवशी ते गाणं रेकॉर्ड केलं होतं”… (Jaiye Sajana song making behind the story)
================================
हे देखील वाचा : रंगीला चित्रपटातील ‘ते’ गाणं Asha Bhosle यांनी वादक नसतानाही गायलं होतं!
================================
पुढे जॅस्मिन असं देखील म्हणाली की, “या गाण्याचा काही भाग तीन महिन्यांपूर्वीच लिहून रेकॉर्ड केला होता. पण संपूर्ण गाणं शेवटीच तयार झालं. खरं तर ज्यावेळी संपूर्ण म्युझिक अल्बम रेडी होता तेव्हा हे गाणं हिट होईल की नाही किंवा प्रेक्षकांचा काय प्रतिसाद असेल याबद्दल आम्हाला काहीच आशा नव्हती. पण आता फक्त भारतात नाही तर जगभरात हे गाणं सुपरहिट झालं आहे”. (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi