Skip to content Skip to sidebar Skip to footer

अमरीश पुरी यांनी Smita Patil यांच्या कानाखाली का मारलं होतं?

एकेकाळी बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांसोबत एका मराठी अभिनेत्रीने स्क्रिन शेअर करत लोकांना वेड लावलं होतं… प्रत्येक भूमिकेत आपली अभिनयाची अविट छाप उमटवण्याचं कौशल्य त्या अभिनेत्रीत होतं… दुर्दैवाने फार लवकर तिने या जगाचा निरोप घेतला… जर का आज ती हयात असती तर श्रीदेवी, हेमा मालिनी यांच्या यादीत नक्कीच तिचं नाव असतं… आणि ती म्हणजे Smita Patil… अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, राज बब्बर यांच्यासह अनेक अभिनेत्यांसोबत स्मिता यंनी काम करत त्यांच्या तोडीस तोड अभिनय केला होता.. आज आपण त्यांचा असा एक इंटरेस्टिंग किस्सा जाणून घेऊणार आहोत ज्यात बॉलिवूडचे ग्रेट खलनायक Amrish Puri यांनी चक्क स्मिता यांच्या कानशिलात लगावली होती… काय होता तो किस्सा जाणून घेऊयात…

बॉलिवूडमध्ये ८०-९०च्या दशकात जितका नायक लोकप्रिय होता तितकाच खलनायक देखील होता… अमरीश पुरी यांनी लीड रोल म्हणजे मेन हिरोची भूमिका कधीच केली नसली तरी त्यांनी साकारलेले खलनायक हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहेत.. स्मिता पाटील आणि अमरीश पुरी यांचा हा किस्सा 1977 मध्ये आलेल्या Bhumika या चित्रपटाचा आहे.. यात दोघांनी स्क्रिन शेअर करत प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव दिला होता… (Bollywood Movies)

‘भूमिका’ या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान एक सीन सुरु होता आणि त्यावेळी अमरीश पुरींनी स्मिता यांच्या कानाखाली मारली होती… झालं असं की, या चित्रपटात एक सीन होता जिथे अमरीश पुरी स्मिता पाटील यांना बाहेर जाण्यापासून थांबवत असतात. परंतु, स्मिता त्यांचं ऐकत नसतात… आता दोघेही मुरलेले कलाकार असल्यामुळे प्रत्येक सीन हा दमदार आणि खरा वाटावा याच ताकदीने काम करत होते…त्यामुळे अमरीश यांनी दिग्दर्शक Shyam Benegal यांना ते सीनसाठी स्मिता यांच्या खरोखरीच कानाखाली मारु शकतात असं विचारलं… तेव्हा दिग्दर्शकांनी स्मिता अर्ध्यातच शूटिंग सोडून जातील या भीतीने आधी नाही म्हटलं होतं. पण, नंतर त्यांनी यासाठी होकार दिला. त्यानंतर अमरीश यांनी खरोखर त्या सीनमध्ये स्मिता पाटील यांना कानशिलात लगावली होती. (Amrish Puri & Smita Patil)

सीन सुरु झाला आणि अमरीश व बेनेगल यांच्यात ठरल्याप्रमाणे अमरिश यांनी स्मिता यांच्या खरोखर कानाखाली मारली ज्याची त्यांना काहीच कल्पना नव्हती... परंतु, या सीनदरम्यान स्मिता यांची जी प्रतिक्रिया होती ती कॅमेऱ्यात कैद झाली. या सीन नंतर असं म्हटलं गेलं की स्मिता यांना फार शॉक बसला होता… सगळेच सेटवर आश्चर्यचकित झाले होते… परंतु, चित्रपटाचे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी खूप विचार करून तो सीन ओके केला होता. सीनमध्ये तर अमरीश यांनी स्मिता यांना मारलं, पण त्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी स्मिता अमरीश यांच्या अंगावर धावून गेल्या होत्या आणि हे सगळं पाहून अख्खं युनिट हसत होतं… (Smita Patil Unknown Facts)

स्मिता पाटील यांचा आणखी एक किस्सा जाणून घेऊयात… ज्येष्ठ अभिनेत्री Aruna Irani यांनी एका कार्यक्रमात स्मिता यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या मैत्रीबद्दल आणि त्यांच्या अभिनाबद्दल भाष्य केलं होतं… अरुणा म्हणाल्या होत्या की, एका चित्रपटात स्मिता आणि त्यांनी मोलकरणीचा रोल केला होता… रंगभूमीवर तालीम केलेल्या स्मिता प्रत्येक भूमिकेत परफेक्ट शोभायच्या… स्मिता परफेक्ट मोलकरीण दिसत होती… त्या चित्रपटाच्या शुटींगनंतर आणखी एका चित्रपटासाठी अरुणा आणि स्मिता दुसऱ् सेटवर गेल्या जिथे स्मिता महाराणीची भूमिका साकारत होत्या.. अरुणा यांना आधी वाटलं की स्मिता महाराणी कशा दिसतील? त्यांचं रुप, रंग आणि एकूणच बॉडी लॅंग्वेज महाराणीच्या रोलसाठी सूट होणार नाही… मात्र, ज्यावेळी महाराणीच्या गेटअपमध्ये स्मिता यांनी एन्ट्री केली तेव्हा उपस्थित लोकांसोबत अरुणा देखील त्यांच्याकडे एकटक पाहात राहिल्या… यावरुनच स्मिता पाटील या अभिनयाच्या क्वीन होत्या हे खरंच सिद्ध होतं… (Aruna Irani & Smita Patil)

================================

हे देखील वाचा : Amrish Puri : हिंदीच्या ग्रेटेस्ट खलनायकाची सुरुवात मराठीपासून झाली होती!

================================

बॉलिवूडमध्ये टॉपच्या हिरोंमध्ये अर्थाने आपलं अढळ स्थान निर्माण करणाऱ्या स्मिता पाटील होत्या… हिंदीतील त्यांच्या काही उल्लेखनीय चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ‘भूमिका’, ‘चक्र’, ‘मिर्च मसाला’, ‘मंथन’, ‘अर्थ’, ‘अर्ध सत्य’, ‘वारीस’, ‘नमक हलाल’, ‘राजा शिव छत्रपती’, ‘निशांत’, ‘बाजार’, ‘बदले की आग’, ‘हादसा’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी कामं केली… या व्यतिरिक्त अन्वेशने (कन्नड), Akaler Sandhane (बंगाली), Saal Solvan Chadya (पंजाबी), Chidambaram (मल्याळम) या वेगवेगळ्या भाषांमध्येही त्यांनी कामं केली होती.. (Smita Patil Movies)

अमरीश यांनी १९६१ मध्ये रंगभूमीवरुन आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती… बरं तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की एक पंजाबचा मुलगा मुंबईत हिरो बनण्यासाठी आला होता आणि त्याने चक्क हिंदी नाही तर मराठी चित्रपटातून पहिली भूमिका साकारली होती.. १९७१ सालच्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या चित्रपटात अमरीश पुरींनी रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्यामुळे अमरीश पुरींना पहिला ब्रेक हा मराठी चित्रपटातून मिळाला आणि इथूनच त्यांच्या अभिनयाचा श्रीगणेशा झाला.. रंगभूमी आपली कर्मभूमी आहे असं समजणारे अमरीश पुरी विजय तेंडूलकर यांना नाटककारांचा राजा असं म्हणायचे.. त्यामुळे मराठी कलेशी त्यांचं नातं फार पूर्वीपासूनच घट्ट होतं हे नक्कीच यातून दिसतं..

बॉलिवूडचे आयकॉनिक व्हिलन अशी ओळख निर्माण करणाऱ्या अमरीश पुरी यांनी ४५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आजही त्यांची प्रत्येक पात्र त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. ‘ऐतराज’, ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’, ‘हलचल’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘बादशाह’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली आहेत. (Amrish Puri movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!