
Abb Vithoba Bolu Lagla: गाजलेलं बालनाट्य पुन्हा एकदा रंगभूमीवर; अभिनेते Prabhakar More दिसणार नव्या अवतारात…
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की मुलांसाठी दर्जेदार बालनाट्यांचा हंगाम सुरू होतो. अशाच एका खास रंगभूमीवरील मेजवानीची चाहूल लागली आहे. लोकप्रिय बालनाट्य ‘अबब विठोबा बोलू लागला’ (Abb Vithoba Bolu Lagla)आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, यावेळी हे नाटक अधिक दमदार आणि आकर्षक रूपात रंगमंचावर उतरणार आहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पोट धरून हसवणारे अभिनेते प्रभाकर मोरे (Prabhakar More) आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. या नाटकात ते प्रथमच पुजाऱ्याच्या भूमिकेत रंगभूमीवर झळकणार असून, कोकणी शैलीतील विनोदी भूमिकांमधून बाहेर पडत त्यांनी प्रमाण मराठीतील संवादांची नवी आव्हानात्मक शैली स्वीकारली आहे. त्यांच्या या नव्या रूपामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.(Abb Vithoba Bolu Lagla Marathi Play)

या नाटकाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत गिरकर (Prashant Girkar) यांनी केले आहे. पारंपरिक कथेला आधुनिक रंगमंचीय सादरीकरणाची जोड देत, विनोदासोबतच सामाजिक संदेश देण्याचा सुंदर प्रयत्न त्यांनी या नाटकातून केला आहे. मुलांना हसवत-हसवत जीवनमूल्यांचा संदेश देणारे हे नाटक पालकांनाही विचार करायला भाग पाडते. या बालनाट्याचे पुढील प्रयोग विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. १६ एप्रिल रोजी काशिनाथ घाणेकर नाट्यगृह (Kashinath Ghanekar Natyagruha) येथे, १७ एप्रिलला प्रबोधन ठाकरे ऑडिटोरियम (Prabodhankar Thackeray Auditorium) येथे, तसेच शिवाजी मंदीर (Shivaji Mandir) येथे नाटकाचे प्रयोग होणार आहेत. याशिवाय, महाराष्ट्रभर विविध शहरांत आणि विशेषतः कोकणातही याचे प्रयोग आयोजित केले जाणार आहेत.

प्रभाकर मोरे यांनी सांगितले की, “प्रमाण भाषेत बोलणं माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. इतकी वर्षं कोकणी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर हा बदल सोपा नव्हता. त्यामुळे या नाटकासाठी मला अधिक वेळ देऊन मेहनत घ्यावी लागली. पण त्या प्रक्रियेत खूप काही नवीन शिकायला मिळालं.”(Abb Vithoba Bolu Lagla Marathi Play)
============================
============================
आजच्या काळात मुलं मोबाईल आणि स्क्रीनमध्ये गुरफटत चालली आहेत. अशा वेळी वास्तवाशी त्यांना पुन्हा जोडण्याचा, नात्यांची जाणीव करून देण्याचा आणि संस्कारांचा संदेश देण्याचा सुंदर प्रयत्न या नाटकातून केला आहे. ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे बालनाट्य फक्त लहान मुलांसाठीच नाही, तर मोठ्यांनाही आनंद आणि प्रेरणा देणारं ठरेल.