Skip to content Skip to sidebar Skip to footer

Aai Tuljabhavani मालिकेत नवा ट्विस्ट! मांढरदेवी महात्म्याच्या नव्या दैदीप्यमान दैवी पर्वाचा होणार आरंभ

कलर्स मराठीवरील लोकप्रिय पौराणिक मालिका ‘आई तुळजाभवानी (Aai Tuljabhavani)’ आता प्रेक्षकांसाठी आणखी एक भव्य आणि थरारक पर्व घेऊन येत आहे. “मांढरदेवी महात्म्य” या नव्या अध्यायातून श्रद्धा, शक्ती आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणादायी कथा उलगडणार आहे. या पर्वामुळे मालिकेच्या कथानकाला एक वेगळंच दैवी आणि नाट्यमय वळण मिळणार असून, प्रेक्षकांना एक वेगळा आध्यात्मिक अनुभव देण्याची तयारी करण्यात आली आहे.(Aai Tuljabhavani Serial)

Aai Tuljabhavani Serial
Aai Tuljabhavani Serial

या नव्या कथानकात एका अशा गावाची गोष्ट दाखवली जाते, जे असुरी शक्तींच्या सावटाखाली अडकलेलं आहे. गावातील लोक भीतीने गप्प झालेले आहेत आणि आशेचा किरणही दिसत नाही. अशा कठीण परिस्थितीत एक सामान्य पण धाडसी स्त्री मांडाबाई भीतीला न जुमानता उभी राहते. तिच्या आयुष्यातील वेदना आणि संकटं असूनही तिची श्रद्धा ढळत नाही. लाख्यासुराच्या अत्याचारांमुळे गाव उद्ध्वस्त झालेलं असताना, मांडाबाई मात्र हार न मानता देवीपर्यंत पोहोचण्याचा निर्धार करते.देवापर्यंत आपली हाक पोहोचावी म्हणून ती दुर्गम डोंगर चढण्याचा धाडसी प्रवास सुरू करते. हा प्रवास केवळ शारीरिक नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक लढाही आहे. तिच्या निश्चयाने आणि भक्तीने देवीची शक्ती जागृत होते. आई तुळजाभवानी (Tuljabhavani) तिच्या आर्त हाकेला प्रतिसाद देते आणि त्या दैवी शक्तीचा अंश मांडाबाईमध्ये सामावतो. एका साध्या स्त्रीचं रूपांतर एका प्रचंड शक्तिशाली रूपात होतं जिथे श्रद्धा आणि शक्ती एकत्र येतात.

Aai Tuljabhavani Serial
Aai Tuljabhavani Serial

या पर्वात मांढरदेवी (Mandhardevi) आणि आई तुळजाभवानी (Tuljabhavani) यांच्या दैवी शक्तींचा संगम दाखवण्यात येणार आहे. या दोन शक्तींच्या एकत्रित लढ्यामुळे असुरी शक्तींना कसं आव्हान दिलं जातं, हे प्रेक्षकांना रोमहर्षक पद्धतीने अनुभवायला मिळेल. कथा केवळ थरारक नाही, तर ती मनाला स्पर्श करणारी आणि प्रेरणा देणारी आहे.(Aai Tuljabhavani Serial)

===============================

हे देखील वाचा: Picture Boys Teaser: पिक्चर बॉईज येत आहेत राडा करायला; ‘या’ दिवशी होणार रिलीज होणार सिनेमा !

===============================

‘आई तुळजाभवानी (Aai Tuljabhavani)’ ही मालिका सुरुवातीपासूनच भक्ती, श्रद्धा आणि चमत्कारांच्या कथा सांगत आली आहे. देवी आपल्या भक्तांच्या आयुष्यात कशी साथ देते, संकटातून मार्ग कसा दाखवते, हे या मालिकेतून प्रभावीपणे दाखवलं जातं. नव्या “मांढरदेवी महात्म्य” पर्वातून हीच परंपरा अधिक भव्य स्वरूपात पुढे नेली जाणार आहे. एकंदरीत, या नव्या अध्यायातून प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नाही, तर श्रद्धेची ताकद आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणाही मिळणार आहे. भक्ती आणि शक्ती यांचा संगम दाखवणारा हा पर्व निश्चितच प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरेल.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!