
रंगीला चित्रपटातील ‘ते’ गाणं Asha Bhosle यांनी वादक नसतानाही गायलं होतं!
भारतीय चित्रपट आणि संगीतसृष्टीतील अजरामर नाव म्हणजे पद्मविभूषण Asha Bhosle… ज्येष्ठ गायक, संगीतकार दीनानाथ मंगेशकरांचे स्वरसंस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झाले आणि संगीत क्षेत्राला एक अशी गायिका मिळाली जिने कायम वर्सटाईल गाणी गाण्यास प्राधान्य दिलं… ज्या काळात आर.डी बर्मन, किशोर कुमार एका वेगळ्या शैलीत गाणी गात होते, त्याचवेळी आशाताईंनी त्यांच्या गाण्याची पद्धत आत्मसात करत आपली वेगळी स्टाईल निर्माण केली आणि वयाच्या नव्वदीतही ती कायमची जपली… वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचं असं अकाली निधन खरंच प्रत्येक संगीत प्रेमीला धक्का देणारं आहे.. आज त्यांच्या आठवणीत हिंदीतील एका अशा अजरामर गाण्याचा किस्सा जाणून घेऊयात जे गाणं आशा भोसले यांनी वादकांशिवाय रेकॉर्ड केलं होतं…(Asha Bhosle Passed Away)
तर हा किस्सा आहे रामगोपाल वर्मा दिग्दर्शित Rangeela (१९९५) चित्रपट तयार होत असतानाचा… झालं असं की आशाताई चेन्नईला रंगीला चित्रपटातील एका गाण्याचा रेकॉर्डींगसाठी गेल्या होत्या… बंर चित्रपटाला संगीत दिलं होतं ग्रेट A.R.Rehman यांनी… तर, गाण्याच्या रेकॉर्डींसाठी त्या स्टुडिओत गेल्या असल्या असं लक्षात आलं की एकही वादक हजर नाही… आता वादक नाही मग रेकॉर्डींग करायचं कसं? त्यातच जे गाणं रेकॉर्ड करायचं होतं ते एका वेगळ्या मूड आणि शैलीत गायचं होतं, त्यामुळे संगीतच नसेल तर गाणार कसं असा प्रश्न आशाताईंना पडला.. पण इतक्या वर्षांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे आशाताईंनी वादकांशिवायच ते गाणं गायलं आणि ते गाणं होतं “तनहा तनहा यहां पे जीना. यह कोई बात है….” (Bollywood iconic song from rangeela movie)

कालांतराने जेव्हा रंगीला चित्रपटातील “तनहा तनहा यहां पे जीना. यह कोई बात है….”(Urmila Matondkar) या गाण्याची ध्वनीचित्रफित रेकॉर्ड झाली तेव्हा आपलंच गाणं जे आपण वादकांशिवाय रेकॉर्ड केलं होतं त्याला रेहमान यांनी संगीताची जोड देत किती अप्रतिम तयार केलं आहे हे पाहून आशाताई आश्चर्यचकित झाल्या होत्या.. आणि प्रत्येक मुलाखतीत त्या रंगीला चित्रपटातील या गाण्याचा किस्सा आवर्जून शेअर करायच्या… (Unknown Facts About Asha Bhosle)

आशा ताईंची आणखी एक आठवण… जसं Lata Mangeshkar यांनी गाण्यासह एका चित्रपटात अभिनय केला होता अगदी त्याचप्रमाणे आशा भोसले यांनी देखील महेश कोडियाल दिग्दर्शित ‘माई’ (२०१३) या चित्रपटात शीर्षक भूमिका साकारली होती. या चित्रपटात राम कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ज्यावेळी आशाताईंनी ही भूमिका साकारली होती तेव्हा त्यांचं खरं वय होतं ७९ वर्ष आणि चित्रपटात त्यांनी ६४ वर्षांच्या अल्मायझर झालेल्या बाईची भूमिका साकारली होती… त्यामुळे गायन असो किंवा अभिनय प्रत्येक कलेत आशाताई पारंगत होत्या हे त्यांनी पावलोपावली सिद्ध केलं आहे… (Asha Bhosle acted in movie)
================================
हे देखील वाचा : संगीताची आशा मावळली… ज्येष्ठ गायिका Asha Bhosle यांचं निधन
================================
आशाताईंच्या अजरामर गाण्यांची खरं तर यादी कधीच संपणार नाही… पण तरीही चुरा लिया है तुमने (यादों की बारात), दम मारो दम (हरे राम हरे क्रिष्णा), पिया तु अब तो आजा (कारवांन), इन आखों की मस्ती (उमराव जान), आजा आजा मै हु प्यार तेरा (तिसरी मंझिल), दिवाना हुआ बादल (कश्मिर की कली), आओ हुजूर तुमको (किस्मत), हंगामा हो गया (अनहोनी), कजरा मोहब्बत वाला (किस्मत) अशी अनेक हिंदीतील गाणी त्यांनी गायली आहेत… तसेच, बुगडी माझी सांडली गं, जांभूळ पिकल्या झाडाखाली, बाई मी पतंग उडवीत होते अशी अनेक मराठीतील गाणीही आशाताईंनी आपल्या सुरांनी अजरामर केली आहेत.. (Asha Bhosle songs)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi