Skip to content Skip to sidebar Skip to footer

८३ र्षापूर्वी Asha Bhosle यांनी गायलेलं ‘ते’ गाणं आजंही आहे लोकप्रिय!

भारतीय संगीतसृष्टीतील ग्रेटेस्ट गायिका Asha Bhosle यांनी जवळपास ८० वर्ष आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे… घरातून गाण्याचा वारसा लाभलेल्या आशा भोसले यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासूनच गाणं गायला सुरुवात केली… त्यांनी गायलेलं पहिलं गाणं आजही ८३ वर्ष उलटून गेली तरी लोकप्रिय आहे… कोणतं आहे ते गाणं चला जाणून घेऊयात.. (Asha Bhosle first recorded song)

आशा भोसले यांनी १९४३ साली आलेल्या ‘माझं बाळ’ या चित्रपटातील चला चला नव बाळा हे पहिलं वहिलं गाणं पार्श्वगायिका म्हणून गायलं होतं… आजही हे मराठी गाणं लोकप्रिय आहे… त्यानंतर १९४८ साली त्यांनी ‘चुनरिया’ या चित्रपटातील सावन आया हे गाणं गाय हिंदीत एन्ट्री केली.. आणि १९४९ मध्ये ‘रात की रानी’ चित्रपटात पहिलं सोलो गाणं गात त्यांनी स्वत:चा ऑरा निर्माण करण्यास सुरुवात केली… आशा ताईंना खरी ओळख १९५३ साली आलेल्या ‘परिणीता’ चित्रपटातील गाण्यामुळे मिळाली ती आजवर अबाधित आहे…(Asha Bhosle Songs)

वयाच्या प्रत्येक टप्प्यात आशा भोसले यांनी गाणी गात प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं… ९१व्या वर्षी सैया बिना हे गाणं रेकॉर्ड करत त्यांनी नवा रेकॉर्डच आपल्या नावे केला होता… Age Is Just A Number ही म्हण तंतोतंत आशा भोसले यांच्यासाठीच तयार केली आहे हे त्यांनी प्रत्येकवेळी सिद्ध केलं आहे… नव्वदीतही आपल्या चिरतरुण आवाजाची मोहीनी लोकांवर त्या कायमच करत राहिल्या…

================================

हे देखील वाचा : रंगीला चित्रपटातील ‘ते’ गाणं Asha Bhosle यांनी वादक नसतानाही गायलं होतं!

================================

बरं, आशाताई या केवळ लोकप्रिय गायिका नसून एक यशस्वी बिझनेस वुमन देखील होत्या… त्यांचा स्वत:चा रेस्टॉरंटचा व्यवसाय होता आणि कर्ली टेल्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या रेस्टॉरंटची सैर प्रेक्षकांना करण्याची संधी मिळाली होती… दुबई आणि कुवेतमध्ये आशाझ या नावे त्यांचे रेस्टॉरंट असून तिथे पारंपारिक उत्तर-पश्चिम भारतीय खाद्यपदार्थ मिळतात… तसेच, अबुधाबी, दोहा, बहरीन इथेही त्यांच्या फुडचेन्स आहेत…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!