Skip to content Skip to sidebar Skip to footer

चंदन सा बदन चंचल चितवन….हे गाणे Saraswati Chandra सिनेमासाठी लिहिलेच नव्हते! 

साठच्या दशकाच्या मध्यावर दिग्दर्शक जगन शर्मा एक चित्रपट बनवत होते ‘भूल न जाना’. या चित्रपटाची गाणी इंदिवर , हरीराम आचार्य आणि गुलजार यांनी लिहिली होती . संगीत दान सिंग यांचे होते. या सिनेमाच्या गाण्याच्या रेकॉर्ड स मार्केट मध्ये आल्या होत्या  पण हा चित्रपट आर्थिक कारणामुळे बंद पडला त्यामुळे त्याची गाणी देखील मागेच पडली.  या चित्रपटासाठी इंदिवर यांनी एक गाणं लिहिलं होतं पण त्याचे  रेकॉर्डिंग राहिले  होते . हे गाणं इंदिवर यांनी आणखी तीन वर्षांनी एका चित्रपटासाठी वापरलं आणि एक सॉफ्ट रोमँटिक सॉंग म्हणून आज देखील हे गाणं प्रचंड लोकप्रिय आहे. यमन रागावरील हे त्यातील सध्या सात्विक आणि शुध्द हिंदी शब्दांमुळे गाणे तमाम प्रेमीकांचे आवडते प्रेम गीत आहे.  कोणतं होतं ते गाणं आणि काय होता  नेमका किस्सा?

1965 साली निर्माता दिग्दर्शक जगन शर्मा ‘भूल न जाना’ हा एक चित्रपट बनवत होते.  या चित्रपटासाठी इंदीवर यांनी काही गाणी लिहिली होती.  त्यांनी लिहिलेले एक गाणं जगन शर्मा यांनी बाजूला ठेवलं होतं.  त्याचे रेकॉर्डिंग बाकी होते.  परंतु त्याच काळात आर्थिक कारणाने हा चित्रपट डब्यात गेला आणि ते गाणं देखील जगन शर्मा यांच्याकडे राहिले. त्यानंतर तीन वर्षांनी इंदीवर कल्याणजी आनंदजी यांच्यासोबत एका चित्रपटावर काम करत होते. चित्रपट होता ‘सरस्वती चंद्र.’  या चित्रपटासाठी त्यांना ते गाणं हवं होतं म्हणून ते पुन्हा जगन शर्मा यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्या गाण्याची मागणी केली हे गाणं मिळवलं.  गाण्याचे ओरीजनल शब्द होते

‘मतवाले नयन जैसे नील गगन पंछी की तरह खो जाऊ मै

चंदन  सा बदन चंचल चितवन धीरे से तेरा ये मुसकाना..’

जेव्हा त्यांनी निर्माता दिग्दर्शक आणि त्यांच्या डिस्ट्रीब्युटर्सला हे गाणे दाखवायला गेले तेव्हा त्यांनी इंदीवर यांना सांगितलं ,” कुठल्या काळातले शब्द घेऊन आला आहात तुम्ही? आज काळ कुठच्या कुठे केला आहे आणि हे इतके शुद्ध प्राकृत हिंदी मधले गाणे कोण ऐकणार?”  पण  इंदीवर यांना आपल्या शब्दांवर भरोसा होता आणि कल्याणजी आनंदजी यांना देखील ते शब्द खूप आवडले होते . ते म्हणाले ,” यातील साधेपणा सात्विकपणा हेच याचे सौंदर्य स्थळ आहे”. इंदिवर यांनी थोडासा बदल केला नंतरच्या ओळी आधी घेतल्या आणि हे सुपरहिट गाणे तयार झाले. चंदन सा बदन चंचल चितवन  धीरे से तेरा ये मुस्काना  मुझे दोष न देना जग वालो हो जाऊ अगर मै दिवाना ..’ आज हे गाणं तब्बल साठ वर्षे झाली पण या गाण्याची खुमारी अजूनही कमी होत नाही.  यमन रागावरील हे गाणं मुकेश यांनी  इतक्या सुंदर रीतीने गायलेल आहे की आजही प्रत्येक संगीत मैफिलीचे सर्वांच्या आवडीचे गाणे आहे.

================================

हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

=================================

या चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय सुंदर बनले होते लता मंगेशकर यांच्या स्वरातील ‘ छोड दे सारी दुनिया किसी के लिये हये मुनासिब नही आदमी के लिये’ किंवा ‘फुल तुम्हे भेजा है खत मे फूल नही मेरा दिल है’  हे गाणं तमाम प्रेमिकांचे आवडते  प्रेम गीत झाले  होते त्या काळात प्रेम पत्र पाठवण्याची फॅशन होती तेव्हा बरेच प्रेमिका आपल्या पत्रातून हे गाणे लिहीत असत.  त्या काळातल्या कथा कादंबऱ्यांमध्ये देखील या गाण्याचा उल्लेख आढळतो. ‘मै तो भूल चली बाबूल का देस पिया का घर प्यारा लगे ‘ आणि ‘हमने अपना सब कुछ कहोया प्यार तेरा पाने को ..’ ही गाणी देखील मस्त जमून आली होती.  गोवर्धनदास त्रिपाठी यांच्या सरस्वतीचंद्र या कादंबरीवर हा चित्रपट होता. दिग्दर्शक होते गोविंद सरैय्या. अभिनेत्री नूतन आणि मनीष प्रमुख भूमिकेत होते! खरं तर भारतात रंगीत सिनेमा येऊन तोवर अर्धा वर्षे झाली होती पण हा चित्रपट कृष्णधवल होता तरी लोकांना तो खूप आवडला. या चित्रपटासाठी कल्याणजी आनंदजी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!