Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bol Bol Rani Marathi Movie Teaser: थरारक टीझरने उभे केले प्रेक्षकांच्या मनात प्रश्न; ‘बोल बोल राणी’ १० जुलैपासून प्रदर्शित!

सिड विंचुरकर दिग्दर्शित आणि निर्मित ‘बोल बोल राणी’ (Bol Bol Rani) हा आगामी मराठी थ्रिलर चित्रपट आता प्रेक्षकांच्या समोर येण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली असून तो १० जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या काही सेकंदांच्या व्हिडिओने प्रेक्षकांच्या मनात थरार, उत्सुकता आणि रहस्याचा जबरदस्त संगम निर्माण केला आहे. या टीझरमध्ये खुर्चीत बसलेली एक तरुणी, तिचे हात बांधलेले दिसतात, पार्श्वभूमीवर घोंगावणारं रहस्यमयी संगीत ऐकू येते आणि अचानक बंदुकीतून गोळी सुटते. या दृश्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.  “नेमकं घडलंय तरी काय?”, “ही मुलगी कोण आहे?”, “गोळी कुणासाठी आहे?” आणि “या सर्व रहस्यामागे काय सत्य दडलं आहे?” असे प्रश्न चर्चेत येऊ लागले आहेत.(Bol Bol Rani Marathi Movie Teaser)

Bol Bol Rani Marathi Movie
Bol Bol Rani Marathi Movie 2026

चित्रपटातील कथानक थोडक्यात उलगडत नसतानाही व्हिडिओने अस्वस्थ करणारी शांतता आणि थरारक वातावरण प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याचे दाखवले आहे. या चित्रपटात पंधरा वर्षांनंतर सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर यांसारखे तीन तगडे कलाकार एकत्र दिसणार आहेत. त्यांच्यासोबत संभाजी ससाणेही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे, ज्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. निर्माता आणि दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणतात की, “थ्रिलर म्हणजे फक्त भीती दाखवणे नाही, तर प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करून शेवटपर्यंत त्यांना अस्वस्थ ठेवणे. ‘बोल बोल राणी’चा हा व्हिडिओ या प्रवासाचा पहिला टप्पा आहे. प्रत्येक आवाज, प्रत्येक शांतता आणि प्रत्येक दृश्यामागे एक अर्थ आहे. प्रेक्षकांनी हा थरार अनुभवण्यासाठी सज्ज राहावे.”

Bol Bol Rani Marathi Movie
Bol Bol Rani Marathi Movie 2026

चित्रपटाचे निर्माते अपूर्वा मोतीवाले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली आहेत. यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा हे सहनिर्माते असून तपन विचारे, यश राम शाहानी, आयुष कृप्लानी हे असोसिएट निर्माता आहेत. संगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचे असून, त्यांनी चित्रपटाला रहस्यमयी आणि थरारक वातावरण देणारा संगीतबद्ध अनुभव दिला आहे.(Bol Bol Rani Marathi Movie Teaser)

=============================

हे देखील वाचा: Randeep Hooda आणि Lin Laishram झाले चिमुकलीचे आई-बाबा; गोड फोटो शेअर करत दिली गुडन्यूज !

=============================

‘बोल बोल राणी’ हा चित्रपट तगडी स्टारकास्ट, रहस्यमयी कथानक आणि वेगळ्या मांडणीमुळे सध्या प्रेक्षक आणि चित्रपटप्रेमी यांच्यात चर्चेचा विषय बनला आहे. १० जुलै रोजी प्रेक्षकांना या थ्रिलरचा थरार अनुभवता येणार असून, चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यात दडलेला अर्थ आणि रहस्य प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवेल.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!