
Randeep Hooda आणि Lin Laishram झाले चिमुकलीचे आई-बाबा; गोड फोटो शेअर करत दिली गुडन्यूज !
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि त्याची पत्नी लिन लैशराम (Lin Laishram) यांच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. या दांपत्याला गोंडस कन्यारत्नाची प्राप्ती झाली असून ही आनंदाची बातमी स्वतः रणदीपने सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा रणदीप आता वडिलांच्या भूमिकेत पदार्पण करत असल्याने त्याच्यासाठी हा क्षण अत्यंत भावनिक आणि खास ठरला आहे. रणदीपने सोशल मीडियावर एक सुंदर फोटो पोस्ट करत ही गोड बातमी दिली. त्या फोटोमध्ये त्याचे वडील नवजात नातीला प्रेमाने हातात घेतलेले दिसतात. या क्षणाचे महत्त्व सांगताना रणदीपने अतिशय भावनिक शब्दांत कॅप्शन लिहिले आहे. “आज मी वडील झालो आणि तुझ्याबद्दल माझं कौतुक आणखी वाढलंय, बाबा. आणि सगळ्यात महत्त्वाचं – लिन, मला वडील बनवल्याबद्दल आणि आपल्या लहान मुलीला जगात आणल्याबद्दल धन्यवाद,” असे तो म्हणाला. या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटी मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.(Randeep Hooda Baby Girl)

रणदीप आणि लिन यांच्या आयुष्यातील हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी अतिशय साध्या आणि सुंदर शैलीत मॅटरनिटी फोटोशूट केले होते. त्या फोटोशूटमध्ये दोघांमधील प्रेम आणि नव्या आयुष्याच्या स्वागताची उत्सुकता स्पष्टपणे दिसत होती. सोशल मीडियावर ते फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते आणि चाहत्यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले होते.

रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम यांनी २९ नोव्हेंबर २०२३ रोजी लग्न केले. हा विवाह मणिपुरी परंपरेनुसार पार पडला होता आणि त्याची साधेपणामुळे खूप चर्चा झाली होती. पारंपरिक पोशाख, सांस्कृतिक विधी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा अत्यंत खास ठरला होता. लग्नानंतरही हे जोडपे त्यांच्या साध्या आणि प्रामाणिक आयुष्यशैलीमुळे चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे.(Randeep Hooda Baby Girl)
============================
============================
आता त्यांच्या आयुष्यात छोट्या परीच्या आगमनाने आनंद दुपटीने वाढला आहे. नवीन पालक म्हणून रणदीप आणि लिन यांच्यासाठी हा काळ खूप खास आणि भावनिक असणार आहे. त्यांच्या चाहत्यांना देखील या छोट्या सदस्याची झलक पाहण्याची उत्सुकता लागली आहे. सध्या सोशल मीडियावर या गोड बातमीची जोरदार चर्चा होत असून, सर्वजण या नव्या प्रवासासाठी या दांपत्याला मनापासून शुभेच्छा देत आहेत.