Skip to content Skip to sidebar Skip to footer

Zeenat Aman हिच्या जीवनातील काळा अध्याय!

सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात बॉलीवूड मध्ये अभिनेत्री झीनत अमान हिचा मार्केट व्हॅल्यू खूपच  वाढला होता. अनेक हिट चित्रपटांची ती नायिका होती. याच काळात तिचे अभिनेता संजय खान सोबत अफेअर चालू होते. संजय खान ऑल रेडी विवाहित होता पण 30 डिसेंबर 1978 या दिवशी झीनतमान ने  संजय खान सोबत निकाह केला होता.  पण या वैवाहिक आयुष्याने कुणालाच आनंद मिळाला नाही. मिळालं ते फक्त दुःख आणि दु:ख. झीनत अमानला तर अपमान, मारहाण आणि अवहेलना वाट्याला आली. बॉलीवूड मधील हा एक काळा अध्याय होता.  

या काळात झीनत संजय खानच्या ‘अब्दुल्ला’ या चित्रपटात भूमिका करत होती. या सिनेमाचं शूट पूर्ण झाल्यानंतर झीनत बी आर चोप्रा यांच्या ‘इंसाफ का तराजू’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी लोणावळा येथे आलेली होती.  या चित्रपटात दीपक पराशर आणि राज बब्बर यांच्या प्रमुख  भूमिका होत्या. काळ्या अध्यायाची सुरुवात ३ नोव्हेंबर १९७९ या दिवशी झाली. त्या दिवशी दुपारी चार वाजता संजय खानने झीनतला फोन करून सांगितले की,”आपल्याला ‘अब्दुल्ला’ या चित्रपटाचे रिशूट करायचे आहे. त्यासाठी चार दिवस तुझ्या तारखा हव्या आहेत. आपल्याला पुन्हा जैसलमेर राजस्थान येथे जायचे आहे. तेव्हा झीनंत अमान म्हणाली,”आता हे कसे शक्य आहे? माझे ऑलरेडी शूटिंग सुरू झाले आहे.  सेट लागलेला आहे.  या परिस्थितीत मी चार दिवस सुट्टी काढू शकत नाही.“  

झीनत अमानच्या या वक्तव्याने संजय खानचा इगो दुखावला. तो प्रचंड चिडला आणि झीनतला शिव्या देऊ लागला तो म्हणाला, ”’इंसाफ का तराजू’चे शूटिंग हा एक बहाना आहे. तुझी लोणावळ्यामध्ये रंगरलिया चालू आहे ते माझ्या कानावर आले आहे. हा तमाशा बंद कर आणि चुपचाप तू मुंबईला निघून ये.”  झीनंत असले विकृत आरोप ऐकल्यानंतर रडू लागली आणि म्हणाली ,”तू माझ्याबद्दल असा विचार कसा करू शकतोस? आपण पती-पत्नी आहोत. एकमेकांवर विश्वास पाहिजे.”  पण संजय खान ऐकायला तयार नव्हता.  शेवटी झीनत अमानने फोन खाली ठेवला. आणि रडत रडत ती बी आर चोप्रा यांच्याकडे गेली. त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. चोप्रा यांनी तिला मुंबईत जाऊन संजय खानला भेटून घे असा सल्ला दिला.

झीनत आपली हेअर ड्रेसर फ्लोरी हिला घेऊन लोणावळ्यातून बाहेर पडली. रात्री नऊ वाजता ती  मुंबईतल्या घरी  पोहोचल्यावर तिला असे कळाले की संजय खान मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये एका पार्टीमध्ये बिझी आहे. झीनत ताज हॉटेलला जाऊन पोहोचली. तिथे संजय खान एका प्रायव्हेट सूटमध्ये एका पार्टीमध्ये मशगुल होता. ऑलरेडी तो खूप पिलेला होता. झीनतला पाहिल्यानंतर तोआणखी चिडला आणि तिला म्हणाला ,”तू इथे आता कशाला आली आहेस?”. त्यावर झीनत म्हणाली,” मला तुझ्याशी थोडा वेळ बोलायचे आहे!” असे म्हणून ते दोघे शेजारच्या रूममध्ये गेले. पण थोड्या वेळातच झीनत अमानच्या ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. तिची हेअर ड्रेसर फ्लोरी त्या रूममध्ये शिरली तर तिथे तिला संजय खान अतिशय क्रूरपणे झीनत अमानला मारत आहे असे दिसले.

विशेष म्हणजे संजय खानची बायको देखील तिथे होती.  झीनत असहाय्य होती तरी आपल्या पद्धतीने बचाव करत होती पण संजय खान यांच्यातील पशु जागा झाला होता. त्याने झीनतला रक्त बंबाळ होईपर्यंत मारले तिची हेअर ड्रेसर फ्लोरी बाहेर जाऊन पार्टीच्या लोकांना म्हणाली, “तुम्ही काही तरी मध्यस्थी करा आणि झीनंतला वाचवा”. पण कोणीही जागेवरून हलले नाही. फ्लोरिने शेवटी सिक्युरिटीला बोलावले आणि झीनतची सुटका केली.  झीनतच्या डोळ्याला इजा झाली होती. ओठ फाटले होते. अंगावर सर्वत्र मारहाणीच्या खुणा होत्या. तिला उभे देखील राहता येत नव्हतं. पुढचे आठ दिवस ती दवाखान्यात ऍडमिट होती.

================================

हे देखील वाचा : Zeenat Aman : ऐसे ना मुझे तुम देखो…’या रोमँटिक गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!

================================

झीनतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरने एका फिल्मी मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले होते की, अतिशय क्रूरपणे तिच्यावर मारहाण झाली होती पण एवढे होऊन तिने पोलीसांत तक्रार केली नाही. कारण ती म्हणाली की, माझं संजय खानवर अतोनात प्रेम होतं. शेवटी झीनंत अमानने ३०  नोव्हेंबर १९७९ या दिवशी संजय खान पासून घटस्फोट घेतला. झीनतचे करिअर मात्र या प्रकारानंतर पुन्हा उभारले नाही.  वैवाहिक जीवनातील ती सुखी कधीच होऊ शकली  नाही. यानंतर तिने मजहर खान (‘शान’ फेम) याच्यासोबत लग्न केले पण हे लग्न देखील फारसे यशस्वी झाले नाही. आज झीनत अमान ७६ वर्षाची आहे.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!