Skip to content Skip to sidebar Skip to footer

Dashavatar World Television Premier: ‘या’ दिवशी टेलिव्हिजनवर ‘दशावतार’ पाहता येणार ! 

मराठी चित्रपटसृष्टीत 2025 मध्ये विशेष ठसा उमटवणाऱ्या ‘दशावतार’ (Dashavatar) या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर खोल छाप सोडली. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांच्या प्रभावी अभिनयामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता एक भावनिक आणि सांस्कृतिक अनुभव ठरला. चित्रपटगृहात मोठे यश मिळवल्यानंतर आता हा सिनेमा घरबसल्या पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 21 डिसेंबर 2025 रोजी झी मराठी वाहिनीवर ‘दशावतार’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार असून संध्याकाळी 7 वाजता हा सिनेमा प्रसारित केला जाणार आहे. लोककला, श्रद्धा आणि आजच्या वास्तवाचा सुंदर संगम असलेली ही कथा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. चित्रपटाची कथा कोकणातील पारंपरिक दशावतारी कलाकार बाबुली मेस्त्री यांच्या आयुष्य भोवती फिरते. वैयक्तिक वेदना, गावावर आलेले संकट, अन्यायाविरुद्ध उभा राहण्याची जिद्द आणि सत्याचा शोध या सगळ्या प्रवासातून बाबुली मेस्त्रीचा शेवटचा ‘दशावतार’ उलगडत जातो. लोककलेची समृद्ध परंपरा आणि आधुनिक जीवनातील संघर्ष यांचा भावपूर्ण मेळ या चित्रपटात पाहायला मिळतो.(Dashavatar World Television Premier)

Dashavatar World Television Premier
Dashavatar Movie

दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतच महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदलकर, सुनील तावडे, रवी काळे आणि लोकेश मित्तल यांनीही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकाराने आपल्या व्यक्तिरेखेला वेगळी ओळख दिल्यामुळे कथा अधिक परिणामकारक झाली आहे. या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या निमित्ताने झी मराठीने एक खास उपक्रम साकारला आहे. वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांनी पारंपरिक दशावतारी अवतार साकारत या लोककलेला अनोखी मानवंदना दिली आहे. ‘लक्ष्मी निवास’मधील सिद्धू, जयंत, संतोष आणि वेंकी, ‘तारिणी’मधील केदार, ‘वीण दोघातली ही तुटेना’मधील रोहन, ‘सावळ्याची जणू सावली’मधील सारंग आणि ‘कमळी’मधील हृषी हे कलाकार विविध दशावतारी रूपांत प्रेक्षकांसमोर आले.

Dashavatar World Television Premier
Dashavatar Movie

या सगळ्या कलाकारांची रंगभूषा सुप्रसिद्ध दशावतारी कलाकार दादा राणे कोनस्कर आणि उदय राणे कोनस्कर यांनी केली. गेली 34 वर्षे दशावतारी रंगभूमीवर कार्यरत असलेल्या या कोनस्कर बंधूंनी आजवर 7000 हून अधिक प्रयोगांत विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे हा उपक्रम अधिक खास आणि संस्मरणीय ठरला. (Dashavatar World Television Premier)

=================================

हे देखील वाचा: Gotya Gangster Movie Trailer: चाळीतून गँगस्टरपर्यंतचा भन्नाट प्रवास दाखवणाऱ्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित !

=================================

लोककलेचा सन्मान, भावनिक कथा आणि दमदार अभिनय यांचा संगम असलेला ‘दशावतार’ आता टीव्हीवर अनुभवण्यासाठी सज्ज आहे. 21 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर हा खास अनुभव नक्की पाहायला विसरू नका.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!