Skip to content Skip to sidebar Skip to footer

Gotya Gangster Movie Trailer: चाळीतून गँगस्टरपर्यंतचा भन्नाट प्रवास दाखवणाऱ्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित !

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’ (Gotya Gangster) प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला असून, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमधूनच या चित्रपटाची धमाल, विनोद आणि रंजक कथानकाची झलक पाहायला मिळते. मुंबईच्या एका चाळीत राहणाऱ्या गोट्या नावाच्या तरुणाची आणि त्याच्या दोन मित्रांची ही कथा आहे. साधं आयुष्य जगणाऱ्या या मित्रांना काही अनपेक्षित घटनांमुळे गुन्हेगारीच्या वळणावर जावं लागतं. परिस्थिती अशी निर्माण होते की त्यांना किडनॅपिंगसारखा गंभीर निर्णय घ्यावा लागतो. त्यातच अनेक वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईला गेलेला कुख्यात डॉन चिमण भाई अचानक शहरात परततो आणि कथेला वेगळंच वळण मिळतं. यानंतर सुरू होते विनोदी प्रसंगांची, भन्नाट संवादांची आणि अखंड धमालची मालिका. (Gotya Gangster Movie Trailer)

Gotya Gangster Movie Trailer
Gotya Gangster Movie 2025

अन्नपूर्णा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती अन्नपूर्णा बिरादार, राजेश्री बिरादार आणि संदीप बिरादार यांनी केली असून, ऋतुजा पाटील आणि शिव लोखंडे यांनी चित्रपट सादर केला आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा स्वतः राजेश पिंजानी यांनी सांभाळली आहे. चित्रपटात प्रवीण तरडे, प्रथमेश परब, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, विनोद वणवे, ऐश्वर्या शिंदे आणि मुकुंद वसुले यांसारख्या दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय दिल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होतं.

‘बाबू बँड बाजा’ या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या राजेश पिंजानी यांच्याकडून चित्रसृष्टीला खूप अपेक्षा होत्या. मात्र, ‘गोट्या गँगस्टर’ प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यामुळे हा चित्रपट त्यांचा शेवटचा ठरला आहे.(Gotya Gangster Movie Trailer)

========================================

हे देखील वाचा: अभिनेत्री Madhavi Nimkar पुन्हा झळकणार खलनायिकेच्या भूमिकेत !

========================================

२६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणारा ‘गोट्या गँगस्टर’ हा चित्रपट केवळ मनोरंजन नाही, तर एका संवेदनशील दिग्दर्शकाला दिलेली भावपूर्ण श्रद्धांजलीदेखील आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा चित्रपट एक खास अनुभव ठरणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!