
Virosh Wedding: Rashmika-Vijay च्या रिसेप्शनला प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाची हजेरी; समोर आलं खास कनेक्शन!
Rashmika Mandanna आणि Vijay Deverakonda यांच्याबाबत सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. उदयपूरमध्ये अतिशय खासगी पद्धतीने झालेल्या त्यांच्या लग्नानंतर हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या ग्रँड रिसेप्शनमुळे अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. या कार्यक्रमात बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक मोठी नावं दिसली; मात्र एका मराठी दिग्दर्शकाच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या रिसेप्शनला मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) यांनी देखील हजेरी लावली होती. त्यांच्या उपस्थितीमुळे सोशल मीडियावर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की मराठी दिग्दर्शक आणि साऊथ सुपरस्टार्स यांच्यात नेमकं कनेक्शन काय? मात्र यामागचं कारण त्यांच्या आगामी चित्रपटाशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे.(Virosh Wedding)

आदित्य सरपोतदार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या Thama या हॉरर-कॉमेडी चित्रपटात रश्मिका मंदानाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या सिनेमात Ayushmann Khurrana देखील प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रसिद्ध Maddock Horror Comedy Universe चा भाग असल्याचं सांगितलं जात आहे. रश्मिकासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना आदित्य सरपोतदारने तिच्या मेहनतीचं आणि डेडिकेशनचं खूप कौतुक केलं होतं. तो म्हणाला होता, “रश्मिका अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रोफेशनल अभिनेत्री आहे. सलग 12 तासांच्या शूटिंगदरम्यानही ती थकली आहे अशी कोणतीही तक्रार करत नाही. कोणताही सीन असो ती पूर्ण तयारीनिशी सेटवर येते आणि शांतपणे आपलं काम पूर्ण करते.”

रिसेप्शननंतर आदित्य सरपोतदारने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत विरोशलाला शुभेच्छा दिल्या. आदित्यने पोस्टमध्ये लिहिलंय, “रश्मिका आणि विजय तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्ही दोघे एकत्र खूप सुंदर दिसता. आयुष्यातील प्रत्येक गोंधळाच्या क्षणी एकमेकांसाठी शांततेचा आधार बना आणि कायम एकमेकांचे सर्वात मोठे पाठीराखे राहा… तुम्हा दोघांनाही खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद”. (Virosh Wedding)
=============================
=============================
आदित्य सरपोतदारच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक लोकप्रिय चित्रपट दिले आहेत. उलाढाल, सतरंगी रे, नारबाची वाडी, क्लासमेट, फास्टर फेणे आणि झोंबिवली यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी मुंज्या, काकुडा आणि थामा सारख्या चित्रपटांद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या प्रवासामुळे मराठी दिग्दर्शक आणि बॉलिवूड-साऊथ कलाकारांमधील सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचंही पाहायला मिळत आहे.