Skip to content Skip to sidebar Skip to footer

सनी देओलऐवजी विरारच्या छोकऱ्याला मिळाली होती Gadar : Ek Prem Katha ची ऑफर!

बॉलिवूडमध्ये असे काही ठराविक चित्रपट आहेत ज्यांची छाप आपल्या मनावर कायमची कोरली गेली आहे. असाच एक चित्रपट २००१ मध्ये आला होता तो म्हणजे ‘गदर : एक प्रेमकथा’ (Gadar : Ek Prem Katha)… सनी देओल आणि अमिषा पटेल यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस तुफान गाजवत भारतीयांची मनं जिंकली. चित्रपटातील प्रत्येक डायलॉग, सीन टाळ्या, शिट्ट्या मिळवणारेच होते. वडिल धर्मेंद्र (Dharmendra) असले तरी सनी देओलला इंडस्ट्रीत आपलं स्थान मिळवण्यासाठी ‘गदर’ चित्रपट फार महत्वाचा ठरला. पण तुम्हाला माहित आहे का सनीच्या (Sunny Deol) आधी या चित्रपटाची ऑफर विरारच्या छोकऱ्याला मिळाली होती. काय होता किस्सा जाणून घ्या…

तर, सुत्रांच्या माहितीनुसार सनी देओलपूर्वी गदरची ऑफर अभिनेता गोविंदा याला मिळाली होती. परंतु, एकाच कारणामुळे त्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट नाकारला होता. एका टीव्ही शोमध्ये गोविंदाने हजेरी लावली होती. या सेटवर गदरविषयी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतांना त्याने हा चित्रपट का नाकारला त्याचं कारण सांगितलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी गोविंदाला गदरची ऑफर मिळाली होती त्यावेळी त्याला चित्रपटातील काही सीन वादग्रस्त वाटले. आणि याच सीन्समुळे त्याने चित्रपटाला नकार दिला. (Govinda)

================================

हे देखील वाचा : Dhurandhar मराठीत बनला तर ८०च्या दशकातील ‘हे’ कलाकार असते प्रमुख भूमिकेत!

================================

गोविंदाने गदरला नकार दिल्यानंतर सनी देओलकडे तारासिंगची भूमिका आली आणि त्याने त्याच्या अभिनयाने चार चांद लावले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासित ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाने इतिहास रचला. देशात या चित्रपटाने ७६ कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं. प्रेम आणि देशभक्तीवर आधारित या चित्रपटाचा सीक्वेल ‘गदर २’ (Gadar 2 Movie) २०२३ मध्ये रिलीज झाला होता. (Bollywood Patriotic Movie)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!