Skip to content Skip to sidebar Skip to footer

बुरखाधारी Geeta Baliने शम्मीकपूरला दिले अनफरगेटेबल सरप्राईज!

अभिनेता शम्मी कपूर यांनी 1956 साली अभिनेत्री गीताबली हिच्या  सोबत लग्न केले.  गीताबली त्यावेळी टॉपची अभिनेत्री होती.  तर अभिनेता शम्मीकपूर हा तेंव्हा एक फ्लॉप स्टार होता.  1953 साली शम्मी कपूरचा पहिला चित्रपट ‘जीवन ज्योती’; रिलीज झाला होता त्यानंतर त्याचे ओळीने 18 चित्रपट फ्लॉप ठरले.  तो खूपच वैतागला होता.  पण अभिनेत्री गीता बाली हि  कायम त्याला धीर देत असायची. “ निराश होवू नकोस. एक दिवस तुझा सुद्धा येईल!” असं त्याला वारंवार सांगत होती. ‘मिस कोकाकोला’(1955) दरम्यान त्यांची मैत्री झाली.   

केदार शर्मा यांच्या रंगीन राते या चित्रपटाच्या वेळी दोघे प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 23 ऑगस्ट  1955 रोजी त्यानी मलबार हिल येथील बांगणगा मंदीरात जावून गुपचूप लग्न केले! लग्नानंतर गीता बालीने स्वतःला सिनेमापासून अलिप्त ठेवले.  या लग्नानंतर गीता बालीचा पायगुण म्हणा किंवा आणखी काही .. शम्मी कपूरचे रुपेरी भाग्य पालटले. 1957 साली त्याचा चित्रपट ‘तुमसा नही देखा’ हा सुपर डुपर हे झाला. सिनेमाने त्याला खऱ्या अर्थाने स्टार म्हणून उभे केले! नासिर हुसेन दिग्दर्शित या चित्रपटाने संपूर्ण भारतभर प्रचंड बिझनेस केला.

या सिनेमाचा प्रीमियर दिल्लीला होणार होता.  त्यासाठी शम्मीकपूर , नासिर हुसेन दिल्लीला चालले होते.  पण सोबत गीता बाली मात्र काही कारणाने त्यांच्यासोबत नव्हती.  त्यामुळे शम्मीकपूर खूपच सिरीयस होता नाराज होता मुंबईमध्ये हा सिनेमा प्रचंड हिट झाला होता.  त्याची गाणी (संगीत ओ पी नय्यर यांचे होते!)  संपूर्ण देशभर गाजत होती.  दिल्लीला या सिनेमाच्या प्रीमियरची प्रचंड हवा निर्माण झाली. या अशा महत्त्वाच्या क्षणी गीताबाली  आपल्या सोबत हवी होती असे त्याला वारंवार वाटत होते.  पण गीता मुंबईत राहिली होती.  फ्रंटीयर मेलने त्यांचा प्रवास चालू होता.

मात्र मुंबईत शम्मी कपूर वारंवार नाराजी च्या सूरात म्हणत होता “ यार आज आपल्या सोबत गीता बाली असायला  हवी होती!”  त्याने आपल्या सुटकेस मधून व्हिस्की काढली.  दोन तीन पेग  रिचवले.  त्यानंतर तर तो खूपच इमोशन झाला.  गीताच्या आठवणीने तो बेदम बेचैन झाला होता.  ट्रेनच्या दरवाज्या पाशी जावून तो  पुढे वाकला!! मागून  धावत जाऊन नासिर हुसेन ने त्याला मागे ओढले तेव्हा शम्मीकपूर म्हणाला ,” अशा या महत्त्वाच्या क्षणी माझी लाडकी  गीताबाली नाही तर या सेलीब्रेशन ला काय अर्थ आहे?? गीता इथे नाहीये… सगळं काही निरर्थक वाटतंय! ”

सकाळी कुठल्यातरी स्टेशनला गाडी थांबली. तिथल्या स्टेशन मास्तरने फर्स्ट क्लासच्या डब्यात घेऊन नासिर हुसेन ला सांगितले की,” आत्ता आम्हाला मुंबईहून एक फोन आला होता. याच गाडीच्या लेडीज कंपार्टमेंट मध्ये एक बुरखा धारी महिला आपली वाट पाहत आहे.  तिला जाऊन भेटा”. नासिर यांना आश्चर्य वाटले ते लेडीज कंपार्टमेंट मध्ये स्टेशन मास्तर सोबत गेले. तिथे एक बुरखा घातलेली  महिला त्यांची वाट पाहत होती. नासिर हुसेनला बघून तिने बुरखा वर केला तर ती गीता बाली होती! त्यांना आश्चर्य वाटले गीता वाली म्हणाली ,”हे सरप्राईज होते आणि हे आता आपल्याला शम्मीकपूरला द्यायचे आहे.  मी मुंबईपासूनच तुमच्या सोबत आहे.” नासिर हुसेन  प्रचंड खुश झाले ते गीताबाली ला घेऊन आपल्या फर्स्ट क्लासच्या डब्यात गेले. जिथे शम्मीकपूरचे पिणे चालूच होते. ते शम्मी कपूरला म्हणाले “ये मोहतरमा आपसे मिलना चाहती है!”  त्यावर शम्मीकपूर म्हणाला,” नही. मै किसी से मिलना नही चाहता”. तेव्हा बुरखा वर करत गीताबाली म्हणाली,” क्या आप मुझे भी मिलना नही चाहते?” गीता बालीला पाहून शम्मी कपूर खाडकन उभा राहिला. त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना. त्याने स्वत: ला चिमटा काढून खात्री करून घेतली. तो प्रचंड खुश झाला. एकही शब्द न बोलता त्याने गीता बालीला मिठी मारली. (Shammi Kapoor)

================================

हे देखील वाचा : Shammi Kapoor : शम्मी कपूर मधुबालावरील (एकतर्फी) प्रेमात अक्षरशः पागल झाला होता!

================================

गीता बाली त्याला म्हणाली,”  तुझ्या पहिल्या सुपरहिट सिनेमाच्या प्रीमियरला मी नसेल असे तुला कसे वाटले?  मला तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी हा उपदव्याप  केला!” शम्मीकपूर प्रचंड आनंदात कंपार्टमेंट अक्षरक्ष: नाचू लागला. पुढे दिल्ली, लखनौ, मेरठ,कानपूर  येथील प्रीमियर ला ते उपस्थित राहिले! वर्षानुवर्षे, शम्मी कपूरने स्वतः ही कहाणी मीडिया ला सांगितली. त्यांच्या आवाजात तोच ओलावा होता तेच प्रेम होतं . गीता बालीवरील त्यांचे प्रेम केवळ पती-पत्नीचे नाते नव्हते, तर दोन आत्म्यांमधील एक अतूट बंधन होते. आणि जेव्हा गीता बाली अकाली (1966) निघून गेली, तेव्हा शम्मी कपूरच्या आयुष्यातून ते हसरे आश्चर्य कायमचे नाहीसे झाले. पण बुरख्यामागे लपलेल्या हास्यासारखी तिची आठवण अमर राहीली. (Geeta Bali)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!