
ट्रकच्या मागे लिहिलेल्या ओळीतून तयार झालेलं Salman Khan याचं रोमॅंटिक गाणं!
बॉलिवूडमध्ये जितका मुव्ही हिट तितकीच त्यातली गाणी सुपरहिट हा फंडा फिक्स आहे. बरं Emraan Hashmi याला जरा अपवाद आहे, कारण त्याचे चित्रपट जरी यश मिळवू शकले नसले ती त्याची प्रत्येक गाणी तरुणाईला तोंडपाठ आहेत. तर, एकीकडे Action ने भरपूर किंवा विनोदी चित्रपटांची ९०च्या दशकात लाट आली होती तिथे Sooraj Barjatya यांनी फॅमेली ओरिएन्टेड चित्रपटाची सुरुवात केली आणि प्रेक्षक त्यात हरवूनच गेले. एकत्र बसून चित्रपट पाहणं ही संकल्पना Rajshri Productionने पुन्हा एकदा रुजवली. आणि त्याच्याच एका चित्रपटातील रोमॅंटिक गाण्याचा खास किस्सा आपण आज जाणून घेऊयात. (Bollywood Family Oriented Movies)
९०च्या काळातलं एक सुपरहिट रोमॅंटिक गाणं चक्क ट्रकच्या मागे काही लाईन्स लिहिल्या होत्या त्यावरुन तयार झालं होतं हे तुम्हाला कदाचित माहित नसेल. त्यात Salman Khan लीड हिरो होता आणि त्याची हिरोईन होती Bhagyashree. आता तो चित्रपट कोणता हे कळला असेलच. हो ‘Maine Pyaar Kiya’. यातलं ‘आजा श्याम होने आई’ हे गाणं कसं तयार झालं याची इंटरेस्टिंग गोष्ट आहे. १९८९ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला. तरुणाईत हा मुव्ही हिट ठरला. सलमान आणि भाग्यश्री यांच्या या डेब्यु चित्रपटाने बॉक्स ऑफिस तर गाजवलंच पण ही नवी जोडीदेखील लोकांना फार आवडली. (Debut Movie Of Salman Khan)

तर किस्सा असा आहे की, चित्रपटातलं ‘आजा शाम होने आई’ हे गाणं ट्रकवर लिहिल्या चारोळीतून तयार झालं. या गाण्याचे संगीतकार राम लक्ष्मण त्यांच्या गाडीतून प्रवास करत असता समोरच्या ट्रकवर त्यांना ‘तू चल, आई मैं आई’ या ओळी लिहिलेल्या दिसल्या. लागलीच त्यांनी दिग्दर्शक सूरज बडजात्या यांना या ओळींवर गाणं तयार करण्याचं सुचवलं. खरं तर आधीच चित्रपटासाठी नऊ-दहा गाणी तयार झाली होती आणि आणखी गाण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती, पण त्यांनी नवीन गाण्याचा आग्रह धरला. (Entertainment)
आधी ‘आजा रात होने आयी’ अशा गाण्याच्या ओळी असणार होत्या. पण ट्रकवरील त्याच ओळी ठेवून गाणं लिहिलं गेलं. बरं आणखी एक गंमत म्हणजे आधी गाण्याची ट्यून तयार झाली आणि नंतर देव कोहली यांनी त्यावर आधारित एक गाणं तयार केलं. या गाण्याला एसपी बालसुब्रह्मण्यम आणि Lata Mangeshkar यांनी आपल्या आवाजाने चार चांद लावले. आजही आजा श्याम होने आई हे गाणं ९०च्या दशकातील किड्सच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहे यात तिळमात्र शंका नाही.

सुरज बडजात्या दिग्दर्शित ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट १९८९ मध्ये रिलीज झाला होता. जवळपास १ कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाने तेव्हा जगभरात ४५ कोटी आणि देशात २८ कोटींचं कलेक्शन केलं होतं. विशेष म्हणजे त्या दशकातला सर्वाधिक कमाई करणारा तो एक चित्रपट ठरला होता. शिवाय सलमान आणि भाग्यश्री यांचा तो पहिलाच चित्रपट त्यांना बॉलिवूडमध्ये नवी ओळख आणि जागा निर्माण करुन देणारा ठरला होता. (Maine Pyaar Kiya Box Office Collection)
================================
हे देखील वाचा : रणवीर सिंग नाही तर हा अभिनेता ठरला खरा Dhurandhar!
================================
‘मैने प्यार किया’ या चित्रपटासोबत सुरज यांनी ‘हम आपके है कोन!’, ‘हम साथ साथ है’, ‘विवाह’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘उंचाई’ असे सुपरहिट चित्रपट देत बॉलिवूडमध्ये एक नवा ऑडियन्स तयार केला. त्यांच्या प्रत्येक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपलं स्थान निर्माण केलंच शिवाय राहूल या Shah Rukh Khan याला मिळालेल्या रोमॅटिंक हिरोच्या ओळखीसोबतच सलमान खान याला Prem ही देखील ओळख मिळाली. (Salman Khan Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi