Skip to content Skip to sidebar Skip to footer

रणवीर सिंग नाही तर ‘हा’ अभिनेता ठरला खरा Dhurandhar!

Dhurandhar : The Revenge चित्रपट सध्या देशातच नाही तर जगभरात गाजतोय. अॅक्शन सीन्स, स्टोरी प्लॉट, अॅक्टिंग आणि सरप्राईजेस यामुळे प्रेक्षक खुर्चीवरुन उठूच शकत नाही. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं परफेक्ट कसब दिग्दर्शक आदित्य धर याला धुरंधर मध्ये जमलं आहे. चित्रपटाचा खरा हिरो आहे रणवीर सिंग… परंत, अभिनेते Rakesh Bedi यांच्या कॅरेक्टरचं आणि कामाचं खरं तर विशेष कौतुक सगळीकडेच होत आहे. त्याचं कारण काय ते जाणून घ्यायला पिक्चर थिएटरमध्ये बघा पण राकेश बेदी यांच्या करिअरवर एक नजर आपण टाकूयात… (Entertainment News)

रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपटात छोटे मोठे रोल्सकरत राकेश बेदी यांनी ४० वर्षांपेक्षा अधिक काळ बॉलिवूडमध्ये घालवला आहे. त्यांना पाहिलं की ‘श्रीमान श्रीमती’ या गाजलेल्या मालिकेतील दिलरुबा हेच त्यांचं पात्र डोळ्यांसमोर येतं. विनोदी भूमिका साकारणं हा त्यांचा खरं तर पिंड… पण ‘धुरंधर’ किंवा URI : The Surgical Strike चित्रपटात त्यांनी कॉमेडी आणि सीरीयस या दोघांचं मिश्रण करत प्रेक्षकांना कायमस्वरुपी लक्षात राहिल अशी भूमिका साकारली. आजही स्वत:ला रंगभूमीवरील कलाकार समजणारे राकेश बेदी इंजिनिअरिंगचा पेपर पाहून धुम ठोकून कसे पळाले आणि अभिनय क्षेत्रात आले याची कथा फारच इंटरेस्टिंग आहे. (Rakesh Bedi News)

राकेश यांचं मुळ दिल्लीतील करोल बाग मधलं… वडिल इंडियन एअरलाईन्समध्ये वैमानिक अभियंता होते त्यामुळे साहजिकच राकेश यांनीही इंजिनिअरिंग करुन पुढे आपलं करिअर घडवावं अशी घरच्यांची इच्छा होती. पण राकेश यांना रस होता अॅक्टिंगमध्ये.. शाळेत असलताना मोनो अॅक्टिंग स्पर्धांमध्ये ते भाग घेत. त्यांनी बऱ्याच स्पर्धाही जिंकल्या होत्या. परंतु, घरच्यांच्या इच्छेखातर त्यांनी इंजिनिअरिंगची एन्ट्र्न्स द्यायचा निर्णय घेतला पण पेपर पाहून ५ मिनिटांमध्येच ते तिथून पळून गेले आणि त्यांनी परत कधी शिक्षणाकडे वळून पाहिलं नाही.

अभिनयाची आवड जपण्याचा त्यांनी निर्णय केला आणि FTII मधून अभिनयात त्यांनी पदवी संपादन केली. रंगभूमीवर Massage या नाटकात त्यांनी तब्बल २४ पात्र साकारली होती… रंगभूमीमध्ये रमलेल्या राकेश यांनी दिल्लीत अंकुर आर्ट्स या नावाने थिएटर ग्रुप तयार केला आणि थिएटर करत शॉर्ट फिल्म्समध्येही त्यांनी कामं सुरु केली. पण तुम्हाला माहित आहे का? चित्रपटात त्यांना पहिला ब्रेक चक्क शोले चित्रपटाच्या निर्मात्यांमुळे मिळाला.

शोलेच्या निर्मात्यामुळे पलटलं नशीब

‘श्रीमान श्रीमती’मधील भूमिकेमुळे राकेश रातोरात प्रसिद्ध झाले. त्यांनी १९७९ साली ‘एहसास’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी खास संवाद साधताना या चित्रपटाचा खास शेअर केला होता. एफटीआयआयमधील फेअरवेल समारंभावेळी त्यांना ही ऑफर देण्यात आली होती. त्या कार्यक्रमाला Sholay चे निर्माते जेपी सिप्पी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘इव्हेंटमध्ये राकेश यांनी कच्छमधील लव्ह इन पॅरिस वॉर नावाच्या थिएटर प्रॉडक्शनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचा अभिनय पाहिल्यानंतर सिप्पी यांनी त्यांना सांगितले की ते एक चित्रपट बनवत आहेत आणि ते त्यांच्या कलाकारांपैकी एक आहे. तर असा राकेश यांना पहिला चित्रपट मिळाला.

================================

हे देखील वाचा : एकेकाळी काजोल आणि तब्बूचा स्पॉट बॉय होता Rohit Shetty, आज आहे कोट्यावधींचा मालक

================================

राकेश बेदी यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये कामं केली. याशिवाय लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केलं. ‘मेरा वो मतलब नही था’ या हिंदी पॉडकास्ट मालिकेचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलं. इतकंच नाही तर ‘ट्रिपल सीट’ या मराठी चित्रपटातही दिसले होते. ‘राम तेरी गंगा मैली’, ‘दिल है की मानता नहीं’, ‘गदर एक प्रेम कथा’, ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ आणि ‘कुली नंबर १’, ‘बहुरानी’, ‘इन्सानियत’, ‘चष्मे बद्दूर’, ‘येस बॉस’, ‘दुल्हन हम ले जायेंगे’, ‘बेटी नंबर १, ‘ओम जय जगदीश’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नाही तर लोकप्रिय मालिका ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’ या मालिकेतही राकेश यांनी काम केलं आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!