
Jhimma 3 : यावेळी ‘तिसराच’ आहे, नेमकं काय ?
महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोलेला, मैत्रीचा जल्लोष रंगवणारा आणि प्रत्येकाला ‘आपलीच गोष्ट’ वाटणारा ‘झिम्मा’चा प्रवास आता नव्या वळणावर येतोय… आणि या वेळी गोंधळ जरा जास्तच दिसतोय! मैत्री, नात्यांचा भावनिक स्पर्श आणि धमाल ट्रिप यांचं भन्नाट मिश्रण सादर करणाऱ्या Jhimmaआणि Jhimma 2ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवलं. ‘झिम्मा’ हा फक्त चित्रपतटापुरता मर्यादित न राहाता एक अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव बनला. आणि आता… त्या अनुभवाचा तिसरा भाग अधिकृतपणे समोर आला आहे!
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या वाढदिवसानिमित्त Jhimma 3 चं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून, त्याने सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडवली आहे. पुढील वर्षी म्हणजेच १ जानेवारी २०२७ मध्ये ‘झिम्मा ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’च्या (Krantijyoti Vidyalay – Marathi Madhyam) जल्लोषमय सोहळ्यात या चित्रपटाची घोषणा झाली होती आणि आता पोस्टरमुळे उत्सुकता आणखीच वाढली आहे.

दरम्यान. चित्रपटाचं पोस्टर पाहिल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येते, यावेळी काहीतरी वेगळं घडणार आहे! समुद्रकिनाऱ्यावर उभा असलेला सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar), त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ, आजूबाजूला भरपूर बॅग्स, सुटकेसेस, क्रिकेट बॅट आणि सूर्यफूल… त्यामुळे ही सहल आहे की काहीतरी अनपेक्षित ट्विस्ट? आणि यावेळी ‘तिसराच आहे!’ या ओळीत नेमकं काय लपलंय? असे प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले आहेत.

पहिल्या दोन भागांमध्ये मैत्रिणींचा ग्रुप प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. आता तिसऱ्या भागात त्या पुन्हा एकत्र येणार का, की या वेळी काही नवे चेहरे, नवी नाती या ग्रुपमध्ये सामील होणार? हे पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. चलचित्र मंडळी प्रस्तुत ‘झिम्मा ३’चं दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केलं असून निर्मिती क्षिती जोग यांनी केली आहे. विशेष म्हणजे क्रांतिज्योती विद्यालय नंतर परत एकदा नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात करत चलचित्र मंडळी ‘झिम्मा ३’ १ जानेवारी २०२७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.
================================
हे देखील वाचा : Dhurandhar आणि सतीश कौशिक यांचं कनेक्शन माहित आहे का?
================================
२०२१ मध्ये ‘झिम्मा’ रिलीज झाला होता. या चित्रपटाने भातात 13.3 Cr आणि जगभरात 15.7 Cr कमावले होते. तर, २०२३ मध्ये रिलीज झालेल्या ‘झिम्मा २’ ने देशात 10.62 Cr आणि जगभरात 12.60 Cr कमावले होते. आता Jhimma 3 बॉक्स ऑफिसवर किती धुमाकुळ घालणार आणि २५ कोटींचा टप्पा पार करेल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Jhimma Box Office Collection)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi