
Dhurandhar आणि सतीश कौशिक यांचं कनेक्शन माहित आहे का?
आदित्य धर दिग्दर्शित Dhurandhar : The Revenge हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे. पहिल्या सीनपासून ते अगदी शेवटच्या एन्ड स्लाईडची क्रेडिट्स लिस्ट वाचेपर्यंत थिएरमधून पाय निघततच नाही. चुकून ‘धुरंधर २’ ची घोषणा केली तर? किंवा काही स्पेशल आपण मिस केलं तर याची हुरहूर लागतेच. पण या सगळ्यात पिक्चर पाहायला जर का तु्म्ही गेला असाल तर आदित्य धरने दिवंगत ग्रेट अभिनेते Satish Kaushik आणि त्यांच्या पत्नीचे आभार मानले आहेत. आता ते नेमकं का? याचं कारण जाणून घेऊयात… (Bollywood Latest News)
रणवीर सिंगच्या करिअरमधला धुरंधर हा बेस्ट चित्रपट ठरला यात शंकाच नाही. पण तुम्हाला माहित आहे का धुरंधर हे खरं नाव आदित्य धर याचं नसून त्याचे ऑफिशिअल राइट्स हे सतीश कौशिक यांच्याकडे होते. धुरंधर हे नावं कौशिक यांनी कॉपिराईट केलं होतं अशी माहिती त्यांचे मित्र आणि अभिनेते Anupam Kher यांनी नुकतीच सोशल मिडियावरुन सगळ्यांसमोर मांडली होती. आदित्यने ते नाव कौशिक कुटुंबाकडून विकत घेतलं आणि त्यांचे आभार मानले. आणि या कारणामुळेच विशेष आभारच्या स्लाईडमध्ये मिस्टर अॅण्ड मिसेस कौशिक यांचे दिग्दर्शक आणि टीमने खास आभार मानले आहेत.

सतीश कौशिक यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ८०च्या दशकात त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. ‘चक्रा’, ‘वो सात दिन’, ‘मंदी’, ‘सागर’, ‘ठिकाना’, ‘जलवा’, ‘काम लक्खन’, ‘स्वर्ग’, ‘जमाई राजा’, ‘मेरे सपनों की रानी’, ‘बडे मिया छोटे मिया’, ‘हम आपके दिल में रहते है’, ‘रास्कल्स’, ‘बागी ३’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी कामं केली आहे. तसेच, मरणोत्तर त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शन केलेला ‘कागज २’ चित्रपट २०२४ मध्ये रिलीज झाला होता. अभिनयासोबतच सतीश यांनी चित्रपट डिरेक्ट देखील केले होते.

Aaditya Dhar आणि Ranveer Singh या जोडीने खऱ्या अर्थाने बॉलिवूडला रिअल स्पाय चित्रपट दिला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चित्रपटात रणवीरने जीव ओतून काम केलंय हे प्रत्येक सीनला आपल्याला दिसतं. बऱ्याचदा अॅक्शन सीन्स किंवा कलाकारांचे काही लूक VFX ने साकारले जातात. या चित्रपटातही रणवीर सिंगचा एक खास लूक सुरुवातीला VFX आहे असाच सगळ्यांचा समज झाला होता. मात्र, रणवीरचा तो Ghost Look रिअल असल्याचा आता एक व्हिडिओ समोर आला आहे. तासंतास बसून किलोभर मेकअप आणि प्रोस्थेटिक्सचा वापर करुन त्याचा तो Ghost लूक डिझाईन केला गेला होता. धुरंधरमध्ये रणवीरच्या अभिनयाचं तर कौतुक केलं गेलंच पण त्यासोबतच त्यासाठी त्याने केलेली तयारी देखील विशेष उल्लेखनीय आहे.
दरम्यान, धुरंधर २ चित्रपटाने भल्या भल्या कलाकारांच्या चित्रपटांना धुळ चारली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार पेड प्रीव्ह्यू आणि पहिल्या दिवशी चित्रपटाने 145 Cr, दुसऱ्या दिवशी 83 Cr, तिसऱ्या दिवशी 117 Cr आणि चौथ्या दिवशी 121 Cr कमवत देशात एकूण 466 Cr इतकी कमाई केली आहे. तर, जगात 761 Cr कमवत अवघ्या ४ दिवसांत 1000 Cr कडे ‘धुरंधर २’ ने वाटचाल सुरु केली आहे.

रणवीर सिंग याला इंडस्ट्रीतील काही नामवंत लोकांनी खरं तर त्याच्या सुरुवातीच्या काळात Judge केलं होतं. करण जोहरने एका मुलाखतीत बॅण्ड बाजा बारात चित्रपटावेळी जेव्हा त्याने रणवीरला पाहिलं होतं तेव्हा हा असा हडकूळा आणि जराही लूक्स नसलेला पोरगा बॉलिवूडमध्ये एन्ट्री कशी करु शकेल आणि आपलं अस्तित्व कसं निर्माण करु शकेल यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मात्र, आज त्याच रणवीर सिंगने अख्ख बॉलिवूड हादरवलं आहे. येत्या काळात Don 3 चित्रपटातही तो दिसणार असून अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यानंतर तो डॉन चित्रपटाची लेगसी सुरु ठेवेल यात आता जराही शंका उरली नाही.
================================
===============================
धुरंधर : द रिव्हेंज चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर रणवीर सिंग याने हमजा आणि जसकिरत अशी दोन पात्र साकारली असून ते इंडियन स्पाय दाखवला आहे. याव्यतिरिक्त आर माधवन, राकेश बेदी, सौम्या टंडन, अर्जून रामपाल सारा अर्जून यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi