Skip to content Skip to sidebar Skip to footer

Dhurandhar : The Revenge ची अवघ्या ४ दिवसांत ऐतिहासिक सेंच्युरी; ‘दंगल’लाही टाकलं मागे

सगळीकडे सध्या Ranveer Singh याच्या Dhurandhar : The Revenge चित्रपटाचीच जोरदार चर्चा आहे. खरंच या चित्रपटाने बॉलिवूडचा चेहरा मोहराच पार बदलून टाकलाय. बॉलिवूडमध्ये आजवर बरेच स्पा चित्रपट आले, परंतु रिअल स्पाय चित्रपट कसे असतात हे यशराज फिल्म्सना आदित्य धरने त्याच्या या चित्रपटातून दाखवून दिलं. १९ मार्च २०२६ रोजी जगभरात रिलीज झालेल्या ‘धुरंधर २’ चित्रपटाने अवघ्या ४ दिवसांत बॉलवूडमध्ये History क्रिएट केली आहे. रिलीजच्या पहिल्या वीकेंडलाच ‘धुरंधर’ने देशात 454.12 Cr ची कमाई केली आहे. इतकंच नाही तर जगभरात ही कमाई 691.32 Cr वर पोहोचली आहे. जाणून घेऊयात धुरंधरने आणखी किती रेकॉर्ड्स केले आहेत. (Dhurandhar 2 Box Office Collection)

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ ही फ्रेंचायझी २०२५ नंतर आता २०२६ चं हे वर्ष दणाणून सोडणार आहे. ‘धुरंधर’ने २०२५ मध्ये 800 Cr Club क्लब बॉलिवूडमध्ये सुरु केला. आणि त्यानंतर आता २०२६ मध्ये एकाच दिवशी १०० कोटींच्या पुढे कमाई करणारा धुरंधर : द रिव्हेंज हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार धुरंधर २ ने पेड प्रीव्ह्युतून 43 Cr, रिलीजच्या पहिल्या दिवशी 102.55 Cr, दुसऱ्या दिवशी 80.72 Cr, तिसऱ्या दिवशी 113 Cr, चौथ्या दिवशी 114.85 Cr कमवत आत्तापर्यंत ४५४.१२ कोटींची कमाई केली आहे. आणि आता नक्कीच पाचव्या दिवसाची कमाई पकडून हा चित्रपट अवघ्या ५ दिवसांत देशात ५०० कोटी क्रॉस करेल हे नक्की झालं आहे. (Dhurandhar 2 cross 500 cr worldwide)

बरं, ‘धुरंधर २’ ने बॉलिवडमधला खान्सच्या चित्रपटांना तर मागे टाकलं आहेच. शिवाय, साऊथ चित्रपटांनाही तगडी टक्कर दिली आहे. इतर कोणत्या चित्रपटांना ‘धुरंधर २’ सरपास करणार हे जाणून घेण्याआधी आपण Dhurandhar (2025) च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनसोबत ‘धुरंधर २’ (2026) ची तुलना करूयात. तर, ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘धुरंधर’ने पहिल्या दिवशी 33.60 Cr कमवत ओपनिंग केली होती. पुढे दर दिवशी हा आकडा ५० कोटींपर्यंत जात होता पण तो १०० कोटी झाला नव्हता. त्यामुळे ‘धुरंधर २’ ने आपल्याच चित्रपटाचा रेकॉर्ड मोडून अवघ्या ४ दिवसांत 500 Cr च्या जवळपास पोहचण्याचा विक्रम केला आहे. जिथे ‘धुरंधर’ने पहिल्या वीकेंडला 207.25 Cr कमावले होते तिथे Dhurandhar 2 ने पहिल्याच वीकेंडला डब्बल कमाई केली आहे. (Dhurandhar box office collection)

सद्य स्थितीला, ‘धुरंधर २’ साऊथमधल्या मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकण्याच्या तयारीत आहे. Bahubali 2 : The Conclusion पेक्षा देखील बॉक्स ऑफिसवरहा चित्रपट उत्तम कामगिरी करत आहे. बाहुबली २ ने पहिल्या वीकेंडच्या शनिवारी 90 Cr आणि रविवारी 83 Cr कमावले होते. तिथे आता धुरंधर २ ने बाजी मारुन Prabhas याच्या ‘बाहुबली २’ चित्रपटाला पहिल्या वीकेंडला मागे टाकलं आहे. (Dhurandhar vs Bahubali 2)

जागतिक पातळीवरील कमाईच्या ‘धुरंधर २’ ने केलेल्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटाने Gadar 2 (६९१ कोटी), Jailer (६०७.०३ कोटी आणि Saalar (६१४.६ कोटी) यांच्या कमाईला मागे टाकलं आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एकाच दिवसात १०० कोटी पार करणारा, पहिल्याच वीकेंडला ५०० कोटी कमावणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. आता अजून यापुढे धुरंधर २ कोणकोणत्या चित्रपटांना कलेक्शनमध्ये गार करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Bollywood Massive Box Office Collection by Dhurandhar 2)

थांबा… थांबा… ‘धुरंधर २’ ची कामगिरी इथवरच संपत नाही. तर, आमिर खान याच्या Dangal (2016) चित्रपटाने 387 Net Collection केलं होतं ते देखील सरपास केलं आहे. तसेच, Salman Khan च्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचं लाईफटाईम कलेक्शन 320.34 Cr (Net Collection) आणि 444.92 Cr (Gross Collection) होतं ते देखील रणवीरने पार केलं आहे. आता Dangal Movie Worldwide कलेक्शन जे 2000 Cr आहे ते धुरंधर २ पार करु शकेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागंल आहे. (Dhurandhar 2 vs Dangal)

================================

हे देखील वाचा : Dhurandhar 2 चित्रपट २००० कोटींचा टप्पा पार करणार?

================================

दरम्यान, ‘धुरंधर २’ मध्ये रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत असून अर्जून रामपाल, आर माधवन, संजय दत्त, Rakesh Bedi, सारा अर्जून यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. इतकंच नाही तर या चित्रपटात प्रेक्षकांसाी बरेच सरप्राईजेस देखील आहेत. त्यामुळे आता २०२५ प्रमाणेच २०२६ हे वर्ष देखील Ranveer Singh याचंचं असणार यात आता प्रेक्षकांना तिळमात्र शंका उरली नाही. (Ranveer Singh Movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!