Skip to content Skip to sidebar Skip to footer

Dhurandhar 2 चित्रपट २००० कोटींचा टप्पा पार करणार?

आदित्य धर दिग्दर्शित Dhurandhar : The Revenge १९ मार्च २०२६ रोजी जगभरात रिलीज झाला. १८ मार्चपासूनच खरं तर या चित्रपटाचे Paid Preview Show सुरु झाले आणि प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद देत रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) ‘धुरंधर २’ ला देखील डोक्यावर घेतलं. जसकिरत सिंग रंगी ते हमजा हा त्याचा प्रवास आता जगभरातील चित्रपटप्रेमींना वेड लावणारा ठरला असून पहिल्याच दिवशी ‘धुरंधर २’ (Dhurandhar 2) १०० कोटींचा टप्पा पार करेल हे भाकित खरं ठरलं आहे. जाणून घेऊयात पहिल्याच दिवशी ‘धुरंधर २’ ने किती कमाई केली आणि कोण-कोणत्या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे. (Bollywood Latest News)

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, देशात ‘धुरंधर २’ ने पहिल्याच दिवशी १०२.५५ कोटी कमावले आहेत, ज्यात पेड प्रीव्ह्युची कमाई ४३ कोटी असून हा आकडा १४५.५५ कोटींपर्यंत पोहोचला आहे. तसेच, जगभरात हा आकडा २३६ कोटी इतका झाला आहे. तसेच, या चित्रपटाच्या तमिळ वर्जनने १.१६ कोटी, तेलुगू वर्जनने २.१२ कोटी कमावले आहेत. विशेष म्हणजे ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘धुरंधर’ने पहिल्या दिवशी २८ कोटींची कमाई करत ओपनिंग केली होती. आणि आता ‘धुरंधर २’ ने थेट चौपट कमाई फक्त पहिल्या दिवशीच केली आहे. (Dhurandhar 2 Box Office Collection)

बॉलिवूडमध्ये आजवर साऊथ कलाकारांसोबतच सलमान, शाहरुख आणि आमिर खानच्या चित्रपटांनी जगभरातील बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. आता या यादीत रणवीर सिंगच्या चित्रपटाची एन्ट्री झाली असून त्याने सगळ्याचं खान्सना मागे टाकलं आहे. रणबीर कपूरच्या Animal ने (२०२३) पहिल्या दिवशी ५४.७५ कोटी, शाहरुख खानच्या Jawan ने (२०२३) ६५ कोटी, Pathaan ने (२०२३) ५५ कोटी, Stree 2 ने (२०२४) ५१ कोटी कमावले होते. “कभी कभी तो लगता है अपुनीच भगवान है” या डायलॉगप्रमाणे रणवीरने बॉलिवूडवर आपली पकड मजबूत केलेलील दिसून येत आहे. (Bollywood’s Top first day collection movies)

दरम्यान, अवघ्या काहीच दिवसांत धुरंधर २ देशात बॉक्स ऑफिसवर १००० कोटींपर्यंत नक्कीच पोहोचेल. ‘धुरंधर १’ ने ५०० कोटींचा टप्पा देशात १५-१६ दिवसांत पार केला होता. परंतु, ‘धुरंधर २’ चा स्पीड पाहता ५०० कोटींचा आकडा ३-४ दिवसांत नक्कीच पार होईल असं चित्र सध्यातरी दिसत आहे. आदित्य धरच्या (Aaditya Dhar) ‘धुरंधर २’ ने खरंच बॉलिवूडमध्ये इतिहास रचला आहे. ८०० कोटी क्लब बॉलिवूडमध्ये सुरु करणारी ही फ्रेंचायझी लवकरच भारतात १००० कोटी क्लबही सुरु करेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. बॉलिवूडमध्ये ८०० कोटींचा पहिला क्लब, पेड प्रीव्ह्युमध्ये जवळपास ५० कोटींची कमाई आणि पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा पार करत ‘धुरंधरने २’ ने जो रेकॉर्ड तयार केला आहे तो पाहता आता जगभरात आमिर खानच्या Dangal चित्रपटाचा २००० कोटींचा रेकॉर्ड रणवीरचा हा चित्रपट मोडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. (Dhurandhar 2 movie records)

================================

हे देखील वाचा : एकेकाळी काजोल आणि तब्बूचा स्पॉट बॉय होता Rohit Shetty, आज आहे कोट्यावधींचा मालक

================================

धुरंधर २च्या आणखी काही माईलस्टोन्सवर एक नजर टाकूयात. ‘धुरंधर २’ ने Kalki 2898 AD च्या देशातील आणि जगातील पहिल्या दिवसाच्या कलेक्शनलाही मागे टाकलं आहे. ‘कल्की’ने १९१ कोटी जगभरात आणि ९५ कोटी देशात कमवत ओपनिंग केली होती. आणि आता ‘धुरंधर २’ यशच्या KGF – Chapter 2 चं कलेक्शन सरपास करण्याच्या मागे आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ‘धुरंधर २’ आता भारतात पहिल्याच दिवशी तुफान कमाई करणाऱ्या ऑफिशिअली ५ टॉप हाईएस्ट चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. Pushpa 2 (१६४.२५ कोटी), RRR (१३३ कोटी), Bahubali 2 (१२१ कोटी), आणि KGF – Chapter 2 (११६ कोटी).

‘धुरंधर २’ मध्ये रणवीर सिंग, अर्जून रामपाल, आर. माधवन, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जून, सौम्या टंडन, गौरव गेरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रणवीर सिंगच्या करिअरमधील ‘धुरंधर’ ही फ्रेंचायझी माईलस्टोन नक्कीच ठरली आहे. Band Baja Baarat या चित्रपटापासून सुरु झालेला रणवीर सिंगचा अॅक्टिंगचा प्रवास Dhurandhar पर्यंत येऊन पोहोचला आहे. येत्या काळात रणवीर फरहान अख्तर दिग्दर्शित Don 3 मध्येही झळकणार असं सांगितलं जात आहे. त्यामुळे बॉलिवूडची पुढची काही वर्ष रणवीर सिंगची असणार यात शंका नाही. (Ranveer Singh Upcoming Movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!