Skip to content Skip to sidebar Skip to footer

Riteish Deshmukhच्या गाजलेल्या चित्रपटाचा तब्बल २० वर्षांनी येणार सीक्वेल!

सध्या मराठी असो किंवा हिंदी रितेश देशमुखची चित्रपटांची गाडी सुसाट सुटली आहे. २०२५ मध्ये ‘रेड २’ (Raid 2) मध्ये खलनायकाची भूमिका साकारत त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांना अचंबित केलं. आता लवकरच त्याच्या २० वर्षांपूर्वी आलेल्या एका चित्रपटाचा सीक्वेल येणार आहे. नुकत्याच त्याच्या हाऊसफुल्ल चित्रपटाचा पाचवा भाग देखील आला होता. आणि आता त्यापाठोपाठ त्याच्या आणखी एका गाजलेल्या विनोदी चित्रपटाचा सीक्वेल येणार असल्यामुळे चाहते उस्तुक आहेत. (Riteish Deshmukh Movies)

२००६ मध्ये रिलीज वेगळीच कथा थोडी विनोदी अंगाने सादर करण्यात आली होती. तो चित्रपट म्हणजे ‘मालामाल विकली’ (Malamal Weekly). या सुपरहिट चित्रपटाचा तब्बल २० वर्षांनी सीक्वेल येणार असून यामध्ये बॉलिवूडचे दिग्गज विनोदी कलाकार एकत्र दिसणार आहेत. प्रियदर्शन यांनी बॉलिवूडमध्ये कॉमेडी चित्रपटांची एक वेगळीच लाट आणली होती. आणि त्यांच्या अनेक गाजलेल्या दिग्दर्शनापैकी हा एक चित्रपट. मिळालेल्या माहितीनुसार  सीक्वलमध्ये जुन्या चित्रपटातील मुख्य त्रिकूट म्हणजेच परेश रावल (लिला राम), रितेश देशमुख (कन्हैया) आणि राजपाल यादव (बाजी) पुन्हा एकदा पडद्यावर धुमाकूळ घालताना दिसणार आहेत. (Entertainment News)

चित्रपटात परेश रावल, रितेश देशमुख आणि राजपाल यादव यांचं तुफान विनोदाचं टायमिंग प्रेक्षकांना अनुभवता आलं होतं. आणि आता पुन्हा एकदा तीच जादू, गोंधळ पाहायला मिळणार आहे. २०२१ नंतर प्रियदर्शन आता बॉलिवूडमध्ये परतले असून बॅक टू बॅक सुपरहिट कॉमेडी चित्रपट ते प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. याशिवाय प्रियदर्शन आणि अक्षय कुमार ही जोडी ‘भूत बंगला’ (Bhoot Bangala) चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. (Bollywood Comedy Movies by Priyadarshan)

================================

हे देखील वाचा : Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला घरखर्च; कोरलंय ६ राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव!

================================

तर, रितेश देशमुख याचा एकीकडे ‘मालामाल विकली’ चित्रपट ऑन बोर्ड जाणार आहेच. पण त्यासोबतच ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome To The Jungle) हा चित्रपटही येणार आहे. शिवाय, मराठीतील पहिला बिग बजेट चित्रपट ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) देखील तो दिग्दर्शित करणार असून हा ऐतिहासिक चित्रपट मराठीसह हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतही रिलीज होणार आहे. त्यामुळे येता काळ हा रितेशसाठी लकी नक्कीच ठरणार आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!