Skip to content Skip to sidebar Skip to footer

Big Boss Marathi 6 :  रितेश देशमुखने तन्वीला दाखवला आरसा!

बिग बॉस मराठीचं सहावं पर्व सध्या तुफान गाजतंय. राखी सावंत हिच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीने घरातील सदस्यांच्या नाकात दम झाला होताच पण आता दिवसागणिक इतर सदस्यही आपला गेम पालटताना दिसत आहेत. राखी जेव्हा घरात आली होती तेव्हा काटा ग्रुपसोबत तिची मैत्री झाली होती. पण आता त्याच ग्रुपमधील तन्वी कोलते सोबत आयुषवरुन तिचं भांडण झालं. ‘बिग बॉस’च्या घरात आयुष व तन्वी लव्ह अँगल आणण्याचा प्रयत्न करत आहेत असं स्टेटमेंट रुचिताने काही दिवसांपूर्वी केलं होतं. यावरुन राखी आणि तन्वीमध्ये वाद झाला होता. आता या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने कॅप्ट्न तन्वीची चांगलीच शाळा घेतली आहे.

आयुष-तन्वीच्या मैत्रीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. एका वक्तव्यावरून इतका मोठा वाद करण्याची गरज नव्हती असा सल्ला देत रितेश देशमुखने तन्वीला आरसा दाखवला आहे. रितेश भाऊच्या धक्क्यावर म्हणाला, “तन्वी कोलते मुद्दा एवढा खेचते की सर्वांना Bore करते. तुम्ही नेहमी समोरच्याला ‘प्रतिसाद’ देत नाही तर ‘प्रतिक्रिया’ देत राहतात. राखी यांनी स्टेटमेंट केलं होतं की, आयुष तुमचा बॉयफ्रेंड आहे…यावरून तुम्ही लगेच ट्रिगर झालात आणि नंतर आरडाओरडा, आवाज…प्रेक्षकांच्या कानाला प्रचंड त्रास झाला.”

दरम्यान, रितेशने तन्वीला सगळ्या चुका दाखवताच तिचे डोळे पाणावले. तिला अश्रू अनावर झाले होते…हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलमय की, “भाऊ एकदम बरोबर बोलले तन्वीला याची गरज होती”, “तन्वीला हा सल्ला देण्याची खूप गरज होती… योग्य केलं”, “मस्त बोललात भाऊ”, “तन्वी Dominating वागलीये बरं झालं बोललात”, “तन्वी खरंच खूप जोरात ओरडते बरं झालं गरजेचं होतं”, “अजून झापा तिला”.

================================

हे देखील वाचा : …जेव्हा Priyanka Chopra अभिजित सावंतची तारीफ करते!

================================

आता भाऊच्या धक्क्यानंतर आयुष आणि तन्वीचा टॉपिक घरात बंद होणार की अजून वादाची ठिणघी पडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसेच, या आठवड्यात राखी सावंत, राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे आणि रोशन भजनकर यांच्यापैकी घरातून बाहेर कोण जाणार याकडेही सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!