Skip to content Skip to sidebar Skip to footer

Dhurandhar 2 चा रिलीजपूर्वीच रेकॉर्ड; ‘ओ रोमिओ’च्या फर्स्ट डे कलेक्शनपेक्षा अॅडवान्स बुकिंगमध्येच केली बक्कळ कमाई

Dhurandhar ची नशा उतरत नाहीच तोवर आता Dhurandhar 2 च्या ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. २०१५ मध्ये रिलीज झालेल्या आदित्य धर दिग्दर्शित धुरंधरने देशात ८५० कोटींचा बॉक्स ऑफिसवर टप्पा पार करत नवा इतिहास रचला. रणवीर सिंगच्या या स्पाय थ्रिलर चित्रपटाने बॉलिवूडकरांनाही थक्क केलं आहे. या चित्रपटाने रिलीज होण्याआधीच नवा रेकॉर्ड देखील आपल्या नावे केला आहे. रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) अभिनय कारकिर्दितील हा १००० कोटी गाठणारा चित्रपट असेल का? जाणून घेऊयात प्रेक्षकांची झोप उडवणाऱ्या धुरंधर २ च्या रेकॉर्डबद्दल…

१९ मार्च २०२६ रोजी ‘धुरंधर २ : द रिवेंज’ (Dhurandhar 2 : The Revenge) जगभरात रिलीज होणार आहे. ७ मार्चला ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये Book My Show वर या चित्रपटाच्या जवळपास ८७ हजार तिकिटींची विक्री झाली होती. त्यानंतर ९ मार्चपर्यंत हा आकडा जवळपास १.५ लाखांच्या पुढे गेला होता. आणि आता १० तारखेपर्यंत ही आकडेवारी थेट १८ कोटींपर्यंत पोहोचली असल्याची माहिती मिळत आहे. भारतातच सुसाट तिकीट विक्री झाल्यामुळे हा चित्रपट धुरंधरचा देखील बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडित काढून १००० कोटींपर्यंत ही आकडेवारी नेणार असा अंदाज वर्तवला जात आहे. (Dhurandhar 2 advance booking)

तसेच, काही मिडिया रिपोर्ट्सनुसार ‘धुरंधर २’ च्या पेड प्रीमियर शोसाठी देशभरात सुमारे ३ लाखांच्या पुढे तिकीटांची विक्री झाली असून यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना रिलीजपूर्वीच जवपास २५ कोटींचा फायदा झाल्याची माहिती मिळत आहे. यापैकी हिंदी वर्जनला लोकांचा अधिक प्रतिसाद जरी असला तरी तमिळ वर्जनसाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे धुरंधर २ च्या अॅडवान्स बुकिंग कलेक्शनने शाहिद कपूरच्या ओ रोमिओ या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनलाही मागे टाकलं आहे. ‘ओ रोमिओ’ने (O Romeo) ९ कोटी कमवत ओपनिंग केली होती.

दरम्यान, ५ डिसेंबर २०२५ ला रिलीज झालेल्या ‘धुरंधर’ने (Dhurandhar) जगभरात १३०० कोटी आणि देशात ८३० कोटींचा टप्पा पार केला होता. इतकंच नाही तर रणवीर सिंगच्या करिअरमधील हा पहिला चित्रपट ठरला ज्याने ५०० कोटींचा टप्पा तर पार केलाच पण ८०० कोटी क्लबची देखील बॉलिवूडमध्ये सुरुवात केली. धुरंधरने पहिल्या दिवशी २८ कोटी कमवत ओपनिंग केली होती. मात्र, ‘धुरंधर २’ ची क्रेझ पाहता हा चित्रपट पहिल्याच दिवशी ६०-७० कोटींपर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. जरं का असं झालं तर रजनीकांत यांच्या ‘कुली’ (Coolie) चित्रपटाचा ‘धुरंधर २’ (Dhurandhar 2) पहिल्या दिवसाचा रेकॉर्ड मोडून काढेल हे नक्की. (Ranveer Singh Movies Box Office Collection)

================================

हे देखील वाचा : रॉकिंग स्टार यशच्या Toxic ची रिलीज डेट बदलली; ‘धुरंधर २’ला रान मोकळं मिळणार?

================================

‘धुरंधर २’ चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जून रामपाल, संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पहिल्या भागात रेहमान डकैतचा मृत्य झाल्यामुळे आता अक्षय खन्ना दुसऱ्या भागात असेल की नाही याची उस्तुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच, या आधी यशचा ‘टॉक्सिक : अ फेरीटेल फॉर ग्रॉनअप्स’ (Toxic : A Fairytale For Grown Ups) हा चित्रपट देखील १९ मार्चला रिलीज होणार होता. मात्र, जगातील युद्धजन्य परिस्थिती पाहता टॉक्सिकने रिलीज डेट आता ४ जून २०२६ केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरचा मोठा क्लॅश होता होता राहिला. १९ मार्चच्या मागे पुढे कुठलाच मराठी, हिंदी किंवा साऊथचा बिग बजेट चित्रपट रिलीज होणार नसल्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर फक्त ‘धुरंधर २’ चीच हवा असणार यात शंका नाही. (Entertainment Trending News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!