Skip to content Skip to sidebar Skip to footer

Nana Patekar-Anil Kapoor : १० वर्षांनी पुन्हा एकदा उदयभाई आणि मजनू एकत्र येणार!

‘हेरा फेरी’, ‘चुप चुपके’, ‘गोलमाल’ अशा बॉलवूडमधल्या कॉमेडी चित्रपटांनी आपल्या खळखळून हसवलं आहे. आणि याच यादीत एक महत्वाचा चित्रपट येतो तो म्हणजे वेलकम (Welcome). नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांनी साकारलेले मजनू आणि उदयभाई ही पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष घर करुन आहेत. आणि आता लवकरच ही उदयभाई आणि मजनूची जोडी पुन्हा एकदा आपल्याला भेटायला येणार आहे. २०१५ मध्ये आलेल्या ‘वेलकम बॅक’ (Welcome Back) या चित्रपटानंतर जवळपास १० वर्षांनीनाना पाटेकर आणि अनिल कपूर एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. (Bollywood)

२००७ मध्ये वेलकम चित्रपट रिलीज झाला होता. या अॅक्शन-कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांची पसंती मिळवली. यानंतर ‘वेलकम बॅक’ हा चित्रपट आला यात देखील मजनू आणि उदयभाईने कमाल केली. त्यानंतर या कॉमेडी फ्रेजायझीचा तिसरा भाग ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome To The Jungle) या लवकरच रिलीज होणार आहे. मात्र, या भागात नाना पाटेकर आणि अनिल कपूर दिसणार नाही. मग आता प्रश्न पडला असेल की नेमकी कोणत्या चित्रपटात ते दोघे एकत्र येणार आहेत. (Nana Patekar & Anil Kapoor)

तर, मिळालेल्या माहितीनुसार वेलकम चित्रपटाचा चौथा भाग ‘वेलकम ४’ (Welcome 4) लवकरच येणार असून यात नाना पाटेकर अनिल कपूर आणि परेश रावल ही ओरिजनल स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा डॉन उदय शेट्टीच्या भूमिकेत नाना पाटेकर, मजनूच्या भूमिकेत अनिल कपूर आणि डॉ. घुंघरुच्या भूमिकेत परेश रावल (Paresh Rawal) दिसतील. (Welcome movie franchise)

================================

हे देखील वाचा : Big Boss Marathi 6  : रुचिता घराबाहेर गेल्यानंतर विशाल घरच्यांवर भारी पडणार? राखीच्या ‘त्या’ कृतीने किंचाळली तन्वी

================================

आता पहिल्या भागात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) ही जोडी होती. दुसऱ्या भागात जॉन अब्राहम आणि श्रुती हसन होते, तिसऱ्या बागात तर भली मोठी स्टारकास्ट आहे ज्यात रवीना टंडन, दिशा पाटणी या अभिनेत्री असणार आहेत. मात्र, आता वेलकम ४ मध्ये कोणती जोडी झळकणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. खरं तर जर का ‘वेलकम’ची ओरिजनल कास्ट पुन्हा दिसणार असेल तर प्रेक्षकांना पुन्हा अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफला एकत्र पाहायला नक्कीच आवडेल. (Akshay Kumar)

नाना पाटेकर असो किंवा अनिल कपूर ३० वर्षांपेक्षा अधिक काळ ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. दोघांनी अनेक हिट चित्रपट आजवर दिले आहेत आणि त्यात ‘वेलकम’ चित्रपटाचं नाव आवर्जून घ्यायला हवंच. २००७ मध्ये रिलीज झालेला वेलकम चित्रपट त्या वर्षात कर्मशिअल सुपरहिट चित्रपट ठरला होता. ३२ ते ४८ कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने देशात ७०.१३ कोटी आणि जगभरात ११९ कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली होती. (Welcome Movie Box Office Collection)

नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांनी ‘वेलकम’ या यशस्वी फ्रेंचायझीपूर्वी १९८९ मध्ये ‘परिंदा’ (Parinda Movie) या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्रित काम केलं होतं. विधू विनोद चोप्रा यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात माधुरी दीक्षित, अनुपम खेर, सुरेश ऑबरॉय, अच्युत पोतदार अशी मातब्बर कलाकार मंडळी होती. अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या अॅमेझॉन प्राईमवर त्यांचा ‘सुभेदार’ (Subhedar Movie) हा चित्रपट रिलीज झाला आहे. या व्यतिरिक्त ते अल्फा या यशराज फिल्म्सच्या पहिल्या फिमेल स्पाय युनिवर्स चित्रपटात झळकणार आहेत.

तर, नाना पाटेकरांचा ‘ओ रोमिओ’ (O Romeo) हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी रिलीज झाला होता. यात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका होत्या. आणि येत्या काळात ते ओटीटीवर पदार्पण करणार असून अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर त्यांची ‘संकल्प’ (Sankalp Web Series) ही पहिली वेब सीरीज ११ मार्च रोजी रिलीज होणार आहे. (News in Entertainment)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!