Skip to content Skip to sidebar Skip to footer

Big Boss Marathi 6 : आईचं पत्र वाचायला न मिळाल्यामुळे अनुश्रीचा अश्रुंचा बांध फुटला!

Big Boss Marathi Season 6 च्या सहाव्या सीझनमधील सदस्यांना घरात घेऊन ५० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. इंटरनेट, फोन किंवा सोशल मिडिया शिवाय इतके दिवस राहणं आणि त्यात आपल्या घरच्यांपासून लांब असणं फार कठिण बाब आहे. परंतु, घरातील प्रत्येक सदस्यांनी इमोशनली स्ट्रॉंग राहात प्रत्येक दिवस घालवला आहे. मात्र, आता बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क आला असून यात प्रत्येक सदस्याला घरच्यांनी पाठवेली पत्र वाचण्यासाठी समोरच्या स्पर्धकाला नॉमिनेट करायचं आहे आणि पर्यायाने त्यांचं पत्र फाडून टाकायचं आहे. हा इमोशनल टास्क अनुश्री माने (Anushree Mane) आणि संस्कृती साळूंखे (Sanskruti Salunkhe) यांच्यात पार पडला यावेळी त्यांच्यात नेमकी काय नोकझोक झाली जाणून घेऊयात…

सोशल मिडियावर नॉमिनेशन टास्कचा (Nomination Task From Big Boss Hosue) प्रोमो रिलीज केला आहे. यात अनुश्रीच्या हातात संस्कृतीचं पत्र आहे आणि संस्कृतीच्या हातात अनुश्रीच्या आईने पाठवलेलं पत्र आहे. मात्र, संस्कृती पहिला बजर दाबून अनुश्रीला नॉमिनेट करते असं तरी व्हिडिओतून दिसत आहे. आणि नॉमिनेट झाल्यामुळे अनुश्रीला आईचं पत्र वाचता येत नाही व त्यामुळे तिच्या अश्रुंचा बांध फुटलेला दिसतो. मला आईचं पत्र हवंय, मला या घरात नाही राहायचंय असं म्हणत अनुश्री रडताना दिसली. तर दुसरीकडे मला आणखी एक संधी हवी होती असं म्हणतात संस्कृती दिसली. आईचं पत्र वाचायला न मिळाल्यामुळे अनुश्रीने पुढे सगळ्या नॉमिनेशन टास्कमध्ये संस्कृतीला नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला आहे. (Entertainment News)

दरम्यान, या इमोशनल नॉमिनेशन टास्कमध्ये बिग बॉसने अशा कंटेस्टंटच्या जोड्यांची निवड केली आहे ज्याचं बॉंडिग या घरात फार छान आहे. उदा. सागर-प्राजक्ता, राकेश-दीपाली, तन्वी प्रभू. त्यामुळे आता कोणत्या सदस्यांना घरच्यांची पत्र वाटता येणार आणि कुणाला नाही हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. आत्तापर्यंत फक्त सागर कारंडेला त्याच्या मुलीने पाठवलेलं पत्र वाचायला मिळालं. (Big Boss Marathi 6)

================================

हे देखील वाचा : Nana Patekar-Anil Kapoor : १० वर्षांनी पुन्हा एकदा उदयभाई आणि मजनू एकत्र येणार!

================================

तसेच, नवव्या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार? फिनालेच्या जवळ येऊन कोणत्या स्पर्धकाचा गेम होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. इतकंच नाही तर विशालची टोळी फुटल्यामुळे आता त्याचा गेम विक होणार की इंडिव्हिजुअली तो स्ट्रॉंग खेळणार याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. घरात सध्या टोळीतली दोनचं सदस्य आहेत अनुश्री आणि विशाल. पण आता दुराव्यांनंतर अनुश्री आणि विशाल पुन्हा एकत्र येत सदस्यांचा गेम पालटणार का हे देखील पाहावं लागेल. (Vishal Kotian & Ruchita Jamdar)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!