Skip to content Skip to sidebar Skip to footer

Sunil Tawde यांना ‘झेंडा’ चित्रपटावेळी सिक्युरिटी का घ्यावी लागली?

विनोदी असो किंवा खलनायक प्रत्येक भूमिका ज्यांनी चोख पार पाडली ते म्हणजे अभिनेते Sunil Tawde... ‘दशावतार’ चित्रपटात त्यांनी साकारेलल्या पोलिसाची भूमिका विशेष गाजली… मालिका, नाटक चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं… परंतु, झेंडा या २००९ मध्ये आलेल्या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली.. इतकी की त्यांना चक्क स्वत:साठी पोलिस सिक्युरिटी ठेवावी लागली होती.. काय होता नेमकी किस्सा जाणून घेऊयात…

सुनील तावडे यांनी ‘आरपार’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ‘झेंडा’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल भाष्य केलं.. सुरुवातीला झेंडा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना त्यांनी नारायण राणे यांची भूमिका केली आहे असं वाटलं आणि नवा वाद निर्माण झाला होता.. परंतु, आपल्या भूमिकेविषयी बोलताना तावडे म्हणाले की, “नारायण राणे साहेब मोठे आहेत, कारण त्यांच्याकडे जाणं, त्यांची भूमिका करणं आपल्याला नाही जमायचं. ती मोठी लोकं आहेत”. (Marathi Movie News)

पुढे झेंडाच्या वादाबद्दल सुनील म्हणाले की, “एकेदिवशी माझ्या एका मित्राने मला सांगितलं. की तुझ्या भूमिकेमुळे वाद सुरु झाला आहे, काही ठिकाणी चित्रपटाचे शो बंद पाडले आहेत… त्यामुळे तुला तुझ्या सिक्युरिटीचा बंदोबस्त करावा लागेल…तेव्हा माझा मित्रच पोलीस स्टेशनचा इन्चार्ज होता, तो म्हणाला ओके आणि मला सिक्युरिटी मिळाली. त्यानंतर मग माझी मुलाखत घेतली कुठल्यातरी चॅनलने, त्यावेळी मी ती खास सिक्युरिटी असल्याचं सांगितलं होतं. माझ्या पचनीच पडलं नव्हतं की एका  नटाला सिक्युरिटी असू शकते. पण खरं सांगायचं तर लोकांचं प्रेम फार महत्वाचं असतं”.. (Sunil Tawde & Zenda Movie)

मराठीत आजवर बरेच पॉलिटीकल ड्रामा फिल्म्स आल्या. सामना, सिंहासन हे तर मेकर्सचे आयडॉल चित्रपट आहेत.. याच रांगेत २००९ मध्ये झेंडा चित्रपट आला… विशेष म्हणजे गायक आणि संगीतकार अवधुत गुप्ते यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं… संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर, पु्ष्कर श्रोत्री, राजश श्रुंगारपुरे, सिद्धार्थ चांदेकर, तेजश्री प्रधान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या..(Zenda movie cst)

‘झेंडा’ चित्रपटाचं कथानक काहीसं बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाशी मिळतं जुळतं असल्याचं प्रेक्षकांचं मत होतं… मराठा समाजाच्या भवितव्यासाठी लढणाऱ्या लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा लढा या चित्रपटात दाखवण्यात आला होता… खरं तर पॉलिटिकल चित्रपट करणं फार जोखमीचं काम आहे. कारण, काही घटना जरी सत्य परिस्थितीवर आधारित असतील तरी त्यात कुठलाही वाद निर्माण होणार नाही किंवा कुणाच्या बावना दुखावल्या जाणार नाहीत याचा फार सखोलपणे विचार करावा लागतो… (Political Drama movies)

================================

हे देखील वाचा : Ajinkya Raut-Advayi ही नवी जोडी ‘आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे’मधून येणार भेटीला

================================

दरम्यान, सुनील तावडे यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘खबरदार’, ‘जबरदस्त’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘मलाल’, ‘जत्रा’, ‘झपाटलेला २’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं असून ‘माझा होशील ना’ या मालिकेतही त्यांनी काम केलं आहे. सुनील तावडे लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. येत्या काळात सुनील यांच्याकडून अधिकाधिका मनोरंजन व्हावं हिच प्रेक्षकांची अपेक्षा आहे… (Sunil Tawde Movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!