
Big Boss Marathi 6 सीझन फक्त खाण्याचा आणि चोरीचा सीझन; प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी
Big Boss Marathi चा ६वा सीझन आता दहाव्या आठवड्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. घरातील प्रत्येक सदस्य आपलं घरातील अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक टास्कमध्ये स्वत:ला सिद्ध करताना दिसत आहेत. परंतु, तेच सदस्य प्रेक्षकांना फार Entertain करत नाहीत असं दिसल्यामुळे घरात एन्ट्री झाली होती पहिल्या वाईल्ड कार्डची ती म्हणजे Rakhi Sawant हिची. तिने घरात एन्ट्री करताच त्सुनामी आली होती. तिने सदस्यांच्या नाकात दम केला होताच तितक्यात घरात १ नाही तर ३ वाईल्ड कार्ड स्पर्धकांची देखील एन्ट्री झाली. मात्र, प्रेक्षक आता त्यांच्यावरच फार संतापले आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या नव्या एपिसोडच्या प्रोमोमुळे प्रेक्षक चांगलेच भडकले असून राग व्यक्त करत आहेत. (Big Boss Marathi New Promo)
तर झालं असं की, घरात ब्रॉन्झ आणि गोल्डन रेशन कार्डर्साठी टास्क झाला. यात संकेत, विशाल, राखी, अनुश्री, संस्कृती यांना गोल्डन रेशनकार्ड मिळालं आणि तन्वी, दीपाली, सागर, प्रभू, रेवा आणि राकेश यांना ब्रॉन्झ रेशनकार्ड मिळालं. गोल्डन रेशनधारकांना खायच्या उत्तम गोष्टी आल्या ज्यात द्राक्ष आली. आणि यावरुनच घरात मोठा मुद्दा झाला. राखीने ब्रॉन्झ रेशनधारकांना द्राक्ष खात चिडवलं, यावर दिपालीने तिला कोल्ह्याला द्राक्ष आंबट असा टोमणा मारला. हाच प्रोमो कलर्सने सोशल मिडियावर शेअर केला असून प्रेक्षकांना फार निगेटीव्ह कमेंट यावर आल्या आहेत. (Deepali Sayed & Rakhi Sawant)

दरम्यान, या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत बिग बॉस सीझन ६ फारच बोअर करतोय असं म्हटलं आहे. काहींनी तर हा सीझन फक्त खाण्याचाच आहे असं म्हटलंय, तर संकेत पाठकचा (Sanket Pathak) गेम काहीच नाही असं म्हणत प्रेक्षकांनी संकेतला टार्गेट केलं आहे. इतकंच नाही, तर घरात पॉवर की सोबत राशनची देखील चोरी होत होती त्यामुळे यंदाचं सीझन हे चोरीसाठी फेमस होणार असा टोमणाही लोकांनी मारला आहे. त्यामुळे आधीच्या मराठी बिग बॉसच्या सीझनला जसा प्रेक्षकांना प्रतिसाद मिळाला होता तसा सहाव्या सीझनला मिळत नाही आहे हे लोकांच्या कमेंट्समधून क्लिअर होत आहे.
================================
================================
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये नवव्या आठवड्यात प्राजक्ता शुक्रे हिचा घरातला प्रवास संपला होता. आता या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी विशाल, राकेश, संस्कृती, दिपाली, रेवा, सागर आणि प्रभू नॉमिनेट झाले आहेत. संकेत हा कॅप्टन असल्यामुळे इम्युनिटी मिळवून थेट अकराव्या आठवड्यात पोहोचला आहे. आणि तन्वी आणि अनुश्री (Tanvi Kolte & Anushree Mane) आपल्या खेळामुळे नॉमिनेट होण्यापासून वाचल्या आहेत. आता या ७ जणांपैकी कुणाचा प्रवास संपणार आणि कोण फिनालेच्या जवळ पोहोचणार हे पाहण्याची सगळ्यांचीच उस्तुकता वाढली आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi