Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘Akshaye Khanna ट्रेंडिंग आहे म्हणून…’ किशोरी शहाणेंनी शेअर केला जुना व्हिडिओ

कमबॅक असावं तर अक्षय खन्नासारखं… आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar Movie) चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे… जगभरात १००० कोटींचा टप्पा फक्त २१ दिवसांत पार करत चित्रपटाने इतिहास रचला आहे… शिवाय चित्रपटातील अक्षय खन्नाची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली आहे… सगळीकडेच अक्षयची चर्चा सुरु असताना मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांनी अक्षयसाठी खास पोस्ट केली आहे…. जाणून घेऊयात त्यांच्या या पोस्टबद्दल… (Akshaye Khanna Movies)

तर, अभिनेत्री किशोरी शहाणेंनी मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये कामं केली आहेत… २००६ मध्ये किशोरी यांनी अक्षय खन्नासोबत ‘शादी से पहले’ (Shaadi Se Pehale) या चित्रपटात काम केलं होतं. यात अक्षय खन्ना, आएशा टाकिया, सुनील शेट्टी, आफताब शिवदसानी, मल्लिका शेरावत अशी तगडी स्टारस्टास्ट होती. विशेष म्हणजे या चित्रपटात किशोरींनी अक्षयच्या सासूची भूमिका साकारली होती. याच चित्रपटातील मजेशीर सीन सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Bollywood News)

किशोरी यांनी अक्षयसोबतचा व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे की, “कारण अक्षय खन्ना ट्रेंडिंग आहे म्हणून… आमचा एक मजेशीर सीन आठवला. आम्ही ‘शादी से पहले’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. किशोरीने शेअर केलेल्या व्हिडिओवर लोकांनी कमेंट्स केल्या असून दोघांच्या कामाचं कौतुक चाहत्यांनी केलं आहे… (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : “आम्हाला हातात धड चमचा धरता येत नव्हता, तेव्हापासून त्यांनी…”; Sachin Pilgoankar यांच्या ट्रोलिंगवरुन भडकली क्रांती रेडकर

================================

दरम्यान, किशोरी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्या हिंदी मालिका विश्वात विशेष सक्रिय आहेत. किशोरी बॅक टू बॅक विविध मालिकांमध्ये झळकल्या असून सध्या त्या ‘माना के हम यार नही’ मालिकेत काम करत आहेत. शिवाय, किशोरी त्यांच्या मालिकेच्या सेटवरुन ट्रेण्डींग रिल्सही करताना दिसतात… तर दुसरीकडे, अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच अक्षय खन्ना ‘महाकाली’ (Mahakali) या चित्रपटात दिसणार आहे… तसेच, अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ (Drishyam 3) चित्रपटात तो दिसणार नसल्याचंही म्हटलं जात आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!